Join us  

केसांवर करा 'लाल' पाण्याची जादू! केस गळणं तर थांबेलच- चमकदार होऊन वाढतीलही भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2024 4:24 PM

Magical Red Water Remedy For Silky And Shiny Hair: केसांची चमक गेली असेल, ते खूप गळू लागले असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा... (how to make hair healthy and strong?)

ठळक मुद्दे हा उपाय केल्यामुळे केसांवर छान चमक येईल. केस मुलायम आणि सिल्की होण्यासही मदत होईल.

केस खूप गळत आहेत, अजिबात वाढत नाहीत किंवा खूप ड्राय झाले आहेत, केसांना फाटे फुटू लागले आहेत, अशा केसांच्या बाबतीतल्या समस्या अनेकांना छळतात. सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत तर या समस्या जरा जास्तच वाढलेल्या दिसतात. या दिवसांतल्या दमट, ओलसर हवेमूळे केस खूपच चिकट होतात (natural home made toner for healthy hair). असं काही तुमच्याही केसांच्या बाबतीत झालं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (magical red water remedy for silky and shiny hair). हा उपाय केल्यामुळे केसांवर छान चमक येईल. केस मुलायम आणि सिल्की होण्यासही मदत होईल. (how to make hair healthy and strong?)

 

सिल्की, चमकदार केसांसाठी उपाय

केस छान सिल्की, चमकदार हाेण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ realhubwithjyotisinha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार आपल्याला केसांना लावण्यासाठी आणि केस धुण्यासाठी एक प्रकारचे लाल पाणी तयार करायचे आहे. ते कसे करायचे ते पाहूया..

व्हिटॅमिन डी आणि बी १२ ची कमतरता झटपट भरून काढणारे २ पारंपरिक पदार्थ- बघा सोपा उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे अर्धे बीटरुट, १ टेबलस्पून मेथी दाणे, कडिपत्त्याची १० ते १५ पाने, २ टेबलस्पून रोजमेरीची वाळलेली पाने आणि २ कप पाणी लागणार आहे.

त्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये बारीक चिरलेलं बीट रूट, मेथी दाणे, कडिपत्त्याची पाने आणि रोजमेरीची वाळलेली पाने टाका आणि ते गॅसवर गरम करायला ठेवा.

या पाण्याला १० ते १५ मिनिटे मंद आचेवर चांगलं उकळून घ्या. त्यानंतर पाणी थंड झालं की गाळून घ्या.

 

केसांसाठी लाल पाण्याचा वापर कसा करायचा?

हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर, केसांच्या शेवटच्या टोकांना लावा. त्यानंतर हलक्या हाताने ४ ते ५ मिनिटे डोक्याला मसाज करा. यानंतर साधारण ३० मिनिटांनी केस धुवा.

धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे पती सांगतात हृदयाच्या मजबुतीसाठी ५ व्यायाम- हृदयरोगाचा धोका टळेल

केस धुण्यासाठी १ चमचा शाम्पू घेतला तर ३ चमचे आपण तयार केलेलं लाल पाणी घ्या. पाणी आणि शाम्पू व्यवस्थित एकत्र करा आणि त्या पाण्याने केस धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास केसांमध्ये खूप छान फरक दिसून येईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी