Lokmat Sakhi >Beauty > रात्री झोपण्यापुर्वी 'या' जादुई पाण्याने चेहरा पुसा, चेहऱ्यावरचे डाग जातील- त्वचा होईल चमकदार

रात्री झोपण्यापुर्वी 'या' जादुई पाण्याने चेहरा पुसा, चेहऱ्यावरचे डाग जातील- त्वचा होईल चमकदार

Magical Water Mask For Dry Skin And Reducing Pigmentation: हिवाळ्यात त्वचा कोरडी झाली असेल तर त्यासाठी हा एक खास उपाय करा. (skin care tips for winter)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 03:44 PM2023-12-20T15:44:56+5:302023-12-20T15:46:02+5:30

Magical Water Mask For Dry Skin And Reducing Pigmentation: हिवाळ्यात त्वचा कोरडी झाली असेल तर त्यासाठी हा एक खास उपाय करा. (skin care tips for winter)

Magical water mask for dry skin and reducing pigmentation, How to get rid of dark spots? Home remedies for radiant glow, skin care tips for winter | रात्री झोपण्यापुर्वी 'या' जादुई पाण्याने चेहरा पुसा, चेहऱ्यावरचे डाग जातील- त्वचा होईल चमकदार

रात्री झोपण्यापुर्वी 'या' जादुई पाण्याने चेहरा पुसा, चेहऱ्यावरचे डाग जातील- त्वचा होईल चमकदार

Highlightsनियमित वापर केल्यास अगदी ७ दिवसांतच खूप चांगला परिणाम दिसून येईल. 

हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी पडते. कोरड्या त्वचेवर मग डार्कस्पॉट्स किंवा पिगमेंटेशन खूप उठून दिसतात. यामुळे मग चेहरा खूपच खराब दिसू लागतो. असा त्रास तुम्हालाही होत असेल तर हा जादुई पाण्याचा एक अगदी सोपा उपाय करून पाहा (How to get rid of dark spots?). हा उपाय केल्यामुळे त्वचेला छान पोषण तर मिळेलच पण चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स कमी होण्यासही मदत होईल (Home remedies for radiant glow). त्वचा हायड्रेटेड राहील आणि कोरडी पडणार नाही (skin care tips for winter). अगदी ७ दिवसांतच चेहऱ्यावरचे डार्क स्पाॅट्स किंवा पिगमेंटेशन कमी झालेले दिसतील. त्यासाठी हा वॉटर मास्क कसा करायचा ते पाहूया..(Magical water mask for dry skin and reducing pigmentation)

 

चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट कमी करण्यासाठी वॉटर मास्क 
हा उपाय beautifulyoutips या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे.

साहित्य

१ टीस्पून ग्लिसरीन

१ टीस्पून खोबरेल तेल

फक्त १० रुपयांचा बिस्कीट पुडा आणा- कुकरमध्ये एकदम स्पाँजी केक करा.. बघा रेसिपी 

१ टीस्पून ॲलोव्हेरा जेल

२ टेबलस्पून गुलाब जल

लिंबाचा रस २ टीस्पून

 

कृती

वॉटर मास्क तयार करण्याची कृती अतिशय सोपी आहे.

डाळ- तांदुळात नेहमीच किडे होतात? ५ उपाय करा, किडे- अळ्या अजिबात होणार नाहीत

यासाठी वरील सर्व साहित्य एका डबीमध्ये किंवा स्प्रे बॉटलमध्ये एकत्र करून व्यवस्थित हलवून ठेवा.

हे वॉटर मास्क ७ ते ८ दिवस चांगले राहील.

 

कसे वापरायचे वॉटर मास्क?

वॉटर मास्कचा वापर तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही करू शकता. पण शक्यतो रात्री केल्यास अधिक चांगले. कारण रात्री झाेपण्यापुर्वी जर वॉटरमास्कने चेहरा पुसला तर नंतर चेहऱ्यावर धुळ बसणार नाही.

रोज भात खाल्ला तरी वजन वाढणार नाही- फक्त त्यासाठी 'अशा' पद्धतीने शिजवा भात

रात्री झोपण्यापुर्वी या वॉटर मास्कचे काही थेंब कापसावर घ्या आणि त्याने सगळा चेहरा स्वच्छ पुसून घ्या. यानंतर पुन्हा चेहरा पाण्याने धुण्याची गरज नाही. 

नियमित वापर केल्यास अगदी ७ दिवसांतच खूप चांगला परिणाम दिसून येईल. 

 

Web Title: Magical water mask for dry skin and reducing pigmentation, How to get rid of dark spots? Home remedies for radiant glow, skin care tips for winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.