Lokmat Sakhi >Beauty > संक्रांत स्पेशल: बेसन वापरून घरच्याघरी करा फेशियल, चेहरा उजळून जाईल- त्वचेवर येईल तेज

संक्रांत स्पेशल: बेसन वापरून घरच्याघरी करा फेशियल, चेहरा उजळून जाईल- त्वचेवर येईल तेज

Home Remedies For Glowing Skin: संक्रांतीसाठी (Makar Sankranti 2025) चेहऱ्यावर छानसा ग्लो पाहिजे असेल तर घरच्याघरी फक्त बेसन वापरून पुढे सांगितलेल्या पद्धतीने फेशियल करून पाहा..(how to use besan for radiant glowing skin?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2025 17:17 IST2025-01-09T17:17:08+5:302025-01-09T17:17:52+5:30

Home Remedies For Glowing Skin: संक्रांतीसाठी (Makar Sankranti 2025) चेहऱ्यावर छानसा ग्लो पाहिजे असेल तर घरच्याघरी फक्त बेसन वापरून पुढे सांगितलेल्या पद्धतीने फेशियल करून पाहा..(how to use besan for radiant glowing skin?)

Makar Sankranti special facial at home, how to use besan for radiant glowing skin | संक्रांत स्पेशल: बेसन वापरून घरच्याघरी करा फेशियल, चेहरा उजळून जाईल- त्वचेवर येईल तेज

संक्रांत स्पेशल: बेसन वापरून घरच्याघरी करा फेशियल, चेहरा उजळून जाईल- त्वचेवर येईल तेज

Highlightsबेसन वापरून घरच्याघरी त्वचेवर फेशियल केल्याप्रमाणे ग्लो कसा आणता येऊ शकतो, याविषयी......

संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिवशी महिला मंदिरात एकत्र जमून एकमेकींना वाण देतात, घरी हळदी- कुंकू समारंभ होतो, शिवाय तिळगूळ घेण्यासाठी नातलग, मित्रमंडळी यांच्याकडे जाणेयेणेही होतेच. त्यासाठी छान पारंपरिक पद्धतीने नटून थटून अनेकजणी तयार होतात. पण असा सगळा थाट करण्यापुर्वी चेहऱ्याची थोडी काळजी घेणे म्हणजेच क्लिनअप, फेशियल करणे गरजेचे असते (Makar Sankranti special facial at home). कारण चेहरा छान स्वच्छ केला तरच त्यावर मेकअप व्यवस्थित बसतो. पण अनेकींना वेळेअभावी पार्लरमध्ये जाणे शक्य होत नाही (Home Remedies For Glowing Skin). म्हणूनच हरबरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन वापरून घरच्याघरी एका सोप्या पद्धतीने क्लिनअप किंवा फेशियल करून पाहा.. चेहरा एकदम स्वच्छ होऊन त्यावर छान चमक येईल.(how to use besan for radiant glowing skin?)

 

त्वचा चमकविण्यासाठी बेसनचा वापर कसा करावा?

बेसन वापरून घरच्याघरी त्वचेवर फेशियल केल्याप्रमाणे ग्लो कसा आणता येऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बेसन वापरण्याच्या ३ पद्धती सांगितल्या आहेत.

स्वयंपाकघरातलं गॅस सिलेंडर किती दिवस पुरेल हे कसं ओळखायचं? ३ टिप्स- वेळीच घ्या अंदाज 

१. चेहऱ्यावर ब्लिचिंग केल्याप्रमाणे सुंदर सोनेरी चमक हवी असेल तर एका वाटीमध्ये २ चमचे बेसन पीठ घ्या. त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस टाका आणि कच्चं दूध टाकून त्याचा लेप करा. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे त्वचेवर तसाच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावर छान सोनेरी चमक येईल. 

 

२. दुसरा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे बेसन घ्या. त्यामध्ये २ चमचे दही टाकून त्याची एक पेस्ट तयार करा. आता हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा.

डाएटींग तर करता पण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही कसं ओळखावं? एक्सपर्ट सांगतात ३ टिप्स..

त्यानंतर १० मिनिटांनी चेहऱ्याला बोटाच्या टोकांनी हळूवारपणे गोलाकार मसाज करा आणि चेहरा धुवून टाका. हा उपाय त्वचेसाठी स्क्रबप्रमाणे काम करतो. यामुळे त्वचेवरची डेडस्किन आणि टॅनिंग निघून जाते आणि त्वचा छान स्वच्छ दिसते.

 

३. त्वचेवरचे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट कमी करायचे असतील तर एका वाटीमध्ये १ चमचा बेसन घ्या. त्यामध्ये १ चमचा चंदन पावडर आणि १ चमचा तांदळाचे पीठ टाका.

उरलेला भात वापरा, घरभर दिसणारी झुरळं होतील गायब! पाहा एक भन्नाट आणि सोपा उपाय

त्यात चिमूटभर हळद आणि चमचाभर दही टाकून मिश्रण कालवून घ्या. हा लेप तुमच्या त्वचेला लावा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेवर खूप छान चमक येईल. 


 

Web Title: Makar Sankranti special facial at home, how to use besan for radiant glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.