Lokmat Sakhi >Beauty > घरच्याघरी बनवा 3 प्रकारचे कोल्ड क्रीम; फक्त 3 तेल, उत्तम क्रीम तयार 

घरच्याघरी बनवा 3 प्रकारचे कोल्ड क्रीम; फक्त 3 तेल, उत्तम क्रीम तयार 

विकतच्या कोल्ड क्रीम वापरुन त्वचेचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचाच धोका सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. थंडीत त्वचा सुरक्षित ठेवण्यासोबतच त्वचेचं पोषण करण्यासाठी घरघ्याघरी कोल्ड क्रीम तयार करुन वापरणं हा सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे. सौंदर्यतज्ज्ञ घरच्याघरी कोल्ड क्रीम तयार करण्याचे 3 प्रकार सांगतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 04:34 PM2022-01-28T16:34:03+5:302022-01-28T18:39:35+5:30

विकतच्या कोल्ड क्रीम वापरुन त्वचेचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचाच धोका सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. थंडीत त्वचा सुरक्षित ठेवण्यासोबतच त्वचेचं पोषण करण्यासाठी घरघ्याघरी कोल्ड क्रीम तयार करुन वापरणं हा सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे. सौंदर्यतज्ज्ञ घरच्याघरी कोल्ड क्रीम तयार करण्याचे 3 प्रकार सांगतात. 

Make 3 types of cold cream at home; In just 3 oils, prepare the best cream | घरच्याघरी बनवा 3 प्रकारचे कोल्ड क्रीम; फक्त 3 तेल, उत्तम क्रीम तयार 

घरच्याघरी बनवा 3 प्रकारचे कोल्ड क्रीम; फक्त 3 तेल, उत्तम क्रीम तयार 

Highlightsकोरफडीचा गर वापरुन कोल्ड क्रीम केल्यास ते फ्रिजमधे एक ते दोन आठवडे ठेवावं आणि मग त्वचेवर वापरावं.घरच्याघरी तयार केलेलं कोल्ड क्रीम वापरल्यास त्याचा फायदा थंडीत त्वचा सुरक्षित राहाते आणि त्वचेचं आवश्यक पोषण होतं. कोल्ड क्रीम वापरण्याचे त्वचेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करुन घरच्या घरी तयार केलं जाणारं कोल्ड क्रीम हा चांगला पर्याय असल्याचं सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. 

हिवाळ्यात थंडं वातावरणामुळे त्वचा निस्तेज आणि रुक्ष होते. त्वचेत असलेली नैसर्गिक आर्द्रता वातवरणामुळे कमी होते. म्हणूनच हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठे कोल्ड क्रीम वापरले जातात. पण कोल्ड क्रीममुळे त्वचेशी निगडित समस्या निर्माण होण्याचं प्रमाणही खूप आहे. विकतच्या कोल्ड क्रीममधे रासायनिक घटक असतात, हे रासायनिक घटक त्वचेसाठी हानिकारक असतात. त्वचा खराब करण्यास हेच घटक कारणीभूत ठरतात. पण म्हणून कोल्ड क्रीम वापरायचीच नाही का? तर घरच्या घरी तयार केलेलं कोल्ड क्रीम वापरल्यास त्याचा चांगला परिणाम होत असल्याचं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात.

Image: Google

कोल्ड क्रीम घरच्या घरी सहज तयार करता येतं असल्याचं  नवी दिल्लीतील नोएडा  येथील 'श्री राम सिंह हाॅस्पिटल ॲण्ड हार्ट इन्स्टिट्यूटच्या सल्लागार डर्मेटोलाॅजिस्ट आणि डायरेक्टर ऑफ स्किन लेजर सेंटर डाॅ. टी.ए राणा म्हणतात. तसेच घरच्याघरी कोल्ड क्रीम तयार करण्याच्या पध्दती आणि घरी तयार केलेले कोल्ड क्रीम वापरण्याचे फायदे सांगतात.  

 

Image: Google

कोरफडीचं कोल्ड क्रीम

कोरफडीचा वापर करुन कोल्ड क्रीम करताना विटॅमिन ई ऑइल, टी ट्री ऑइल, बदामाचं तेल आणि मेण या
घटकांची गरज असते. कोल्ड क्रीमसाठी बी वॅक्स मेण वापरावं असं डाॅ. राणा म्हणतात. बी वॅक्समुळे कोल्ड क्रीम आणि लोशन यात फरक  निर्माण होतो. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोल्ड क्रीम महत्त्वाचं असतं. 

Image: Google

कोरफडीचा उपयोग करुन कोल्ड क्रीम करताना आधी एका भांड्यात बी वॅक्स आणि बदामाचं तेल एकत्र करुन ते भांडं गॅसवर ठेवावं. गॅस मंद आचेवर असावा. जेव्हा मेण पूर्णत: वितळतं तेव्हा गॅस बंद करावा. मिश्रण थंडं होवू द्यावं,  नंतर त्यात विटामिन ई ऑइल, कोरफड जेल आणि टी ट्री ऑइल  या तिन्ही गोष्टी एकत्र कराव्यात. हे सर्व नीट मिसळावं. त्यासाठी मिक्सर किंवा ब्लेण्डरचा उपयोग करता येतो. हे मिश्रण नीट एकत्र झाल्यावर ते तसंच ठेवावं. मिश्रण तयार झाल्या झाल्या कधीही त्याचा त्वचेवर थेट उपयोग करु नये. हे मिश्रण फ्रिजमधे ठेवावं. दोन आठवड्यानंतर या कोल्ड क्रीमचा वापर सुरु करावा. 

Image: Google

खोबऱ्याच्या तेलाचं कोल्ड क्रीम

खोबऱ्याच्या तेलाचं कोल्ड क्रीम तयार करताना खोबऱ्याच्या तेलासोबतच बदामाचं तेल, ऑलिव्ह तेल आणि ई जीवनसत्त्वं ऑइल, बी वॅक्स आणि व्हॅनिला ऑइल या घटकांची आवश्यकता असते. 

एका भांड्यात खोबऱ्याच्या तेलासोबतच बदामाचं तेल, ऑलिव्ह ऑइल आणि विटामिन ई एकत्र करावं. हे नीट मिसळल्यावर त्यातच मेण घालावं. मेण विरघळेपर्यंत हे मिश्रण हलवावं. ते वितळलं की गॅस बंद करुन मिश्रण थंडं होवू द्यावं. 

मिश्रण थंड झाल्यावर त्यात व्हॅनिला ऑइल घालावं. ते नीट मिसळल्यावर भांड्यातलं सर्व मिश्रण एका बाटलीत भरावं. या कोल्ड क्रीमचा वापर त्वचेवर लगेच करता येतो.

Image: Google

बदामाच्या तेलाचं कोल्ड क्रीम

हे कोल्ड क्रीम तयार करताना बदामाच्या तेलासोबतच कोरफडीचा ज्यूस, खोबऱ्याचं तेल, शिया बटर, कोकोआ बटर आणि इसेन्शिअल ऑइल या घटकांची गरज असते. 

एका भांड्यात खोबऱ्याचं तेल आणि बदामाचं तेल गरम करावं. त्यात शिया बटर आणि कोकोआ बटर घालावं. हे सर्व नीट एकत्र करावं.  मिश्रण थंड होवू द्यावं. नंतर या मिश्रणात कोरफडीचा रस आणि इसेन्शियल ऑइल घालून सर्व नीट एकत्र करावं. तयार मिश्रण नंतर जारमधे घालून ठेवावं. या कोल्ड क्रीमचा वापर रात्री झोपण्याआधी चेहरा, हातापायाच्या त्वचेवर लावावं.

Image: Google

घरच्या घरी केलेलं कोल्ड क्रीम वापरल्यास..

1. घरच्याघरी तयार केलेलं कोल्ड क्रीम वापरल्यास ते त्वचेसाठी सुरक्षित असतं, घरी तयार केलेल्या कोल्ड क्रीममधे रासायनिक घटक नसतात. 

2. घरी तयार करता येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या कोल्ड क्रीममधे नैसर्गिक घटकांचा वापर केलेला असतो. या नैसर्गिक घटकांचा चांगला परिणाम त्वचेवर होतो. त्वचेत नैसर्गिक आर्द्रता निर्माण होण्यास हे घटक मदत करतात. 

3. सुर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्याची क्षमता घरी तयार केलेल्या कोल्ड क्रीममधे असते. 

4. विकतचे कोल्ड क्रीम वापरल्यास त्याचा त्वचेवर दूरगामी परिणाम होतो. त्वचा रुक्ष, कोरडी होण्याची शक्यता असते. पण घरी तयार केलेल्या कोल्ड क्रीमचा थंडीत वापर केल्यास त्वचा रुक्ष होण्याची समस्या उद्भवत नाही. 

Image: Google

5. घरी तयार केलेलं कोल्ड क्रीम वापरल्यास त्वचा मऊ, आर्द्र होण्यासोबतच चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यासारख्या सौंदर्य समस्याही क्रीममधील नैसर्गिक घटकांच्या गुणधर्मांमुळे दूर होतात. 

6. थंडीत त्वचा फाटते. विशेषतं टाचांना भेगा पडतात. किंवा बोटांना पुढच्या भागावर भेगा पडतात. घरी तयार केलेल्या कोल्ड क्रीमचा चांगला परिणाम म्हणजे या भेगा मऊ होण्यासोबतच बऱ्याही होतात आणि तेथील त्वचा मऊ मुलायम होते. 

7. घरच्या घरी तयार केलेली कोल्ड क्रीम त्वचेवर लावल्यानंतर त्वचा ओढल्यासारखी दिसत नाही. 

8. कोरड्या आणि थंडं हवामानामुळे कोरड्या झालेल्या त्वचेला खूप खाज येते. पण घरी तयार केलेली कोल्ड क्रीम हिवाळ्यात वापरल्यास त्वचा कोरडी होऊन खाजण्याची समस्या दूर होते. 

Web Title: Make 3 types of cold cream at home; In just 3 oils, prepare the best cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.