Join us

तांदळाच्या पिठापासून बनवा ५ फेसपॅक, चेहरा करेल ग्लो, स्किन होईल तुकतुकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2023 18:51 IST

Rice Flour for Skin Care तांदळाच्या पिठाचे अनेक फायदे आहेत, चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आपण याचा वापर करू शकता..

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक उत्पादनांचा वापर करतो. चेहरा तजेलदार दिसण्यासाठी आपण महागड्या प्रोडक्ट्ससह घरगुती उपायांचा देखील वापर करतो. काही लोकांना महागडे प्रोडक्ट्स सूट करतात तर काहींना नाही.

काहींच्या चेहऱ्यावर केमिकलचे साईडइफेक्ट्स स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे महागड्या प्रोडक्ट्सचा वापर न करता आपण घरगुती उपायांचा वापर करून देखील चेहऱ्याची निगा राखू शकता. आज आपण तांदळाच्या पिठापासून ५ प्रकारच्या फेसपॅक संदर्भात जाणून घेणार आहोत.

तांदळाच्या पिठाचे फेसपॅक

- तांदळाचे पीठ खूप फायदेशीर मानले जाते. त्यातील पोषक घटक त्वचेला चमकदार बनवते. यासह डेड स्किन काढण्यास देखील मदत करते. त्यामुळे घरगुती साहित्यांचा वापर करून आपण तांदळाच्या पिठापासून ६ घरगुती फेसपॅक बनवू शकता.

- त्वचेला चमकदार बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा ग्रीन टी, तांदळाचं पीठ, लिंबाचा रस मिसळा. मिश्रण तयार झाल्यानंतर पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा. असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील यासह बारीक रेषाही दिसणार नाहीत.

- चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा दूध, तांदळाचे पीठ आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र मिसळा. मिश्रण तयार झाल्यानंतर पॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. याने त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल.

- पिगमेंटेशन दूर करण्यासाठी एका बाऊलमध्ये तांदळाच्या पिठात ताजी मलई, 1 चिमूटभर हळद मिसळा. मिश्रण एकत्र केल्यानंतर चेहरा आणि मानेला लावा. मिश्रण सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून एकदा ही प्रक्रिया करा.

- चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा तांदूळ, गव्हाचे पीठ आणि टोमॅटोचा रस मिसळा. मिश्रण चेहऱ्यावर चांगले लावा. २० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने चेहरा मऊ आणि तजेलदार दिसेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी