आजकाल आपण कुठे बाहेर जायचे असल्यास किंवा साधं ऑफिसला जायचं म्हटलं तरी मेकअप करून जातो. मेकअप करताना आपण चेहेऱ्याचा सर्वप्रथम विचार करतो. ओठ हा सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असल्याने हे ओठ छान असावेत यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. ओठांना आकर्षक करण्यासाठी आपण त्यावर आवर्जून लीप बाम, लिपस्टीक आणि लीप लायनर लावतो. हे प्रॉडक्ट्स दिसायला खूप छान दिसत असले तरी याच्या सतत वापरामुळे हळूहळू ओठ खराब होतात. अनेकदा ओठ काळे होऊ लागतात किंवा वारंवार कोरडे पडू लागतात. अशा परिस्थितीत आपण स्वत: घरच्या घरी लिप बाम तयार करु शकता.(How To Make Your Own Lip Balms At Home)
घरच्या घरी लीप बाम कसा तयार करता येईल ?
१. बीटरूट लीप बाम - एका छोट्या कंटेनरमध्ये, पेट्रोलियम जेली व मध एकत्रित करून त्यात बीटाचा रस घाला. हे मिश्रण ३० सेकंदांसाठी मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. त्यानंतर हे मिश्रण थोडे हलवून घ्या. पुढील ३० मिनिटांसाठी हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवून द्या. बीटरूट लीप बाम तयार आहे.
२. रोज लीप बाम - एका भांड्यात शिया बटर, बी - वॅक्स, नारळाचे तेल घेऊन ते मिश्रण एकत्रित करून उकळवून घ्या. हे मिश्रण हलवून घ्या, नंतर एका छोट्या कंटेनरमध्ये घेऊन त्यात रोज फ्लेव्हर्डचे इसेन्शियल ऑईलचे ५ थेंब सोडा.
३. शिया बटर लीप बाम - शिया बटर, बी - वॅक्स, नारळाचे तेल एका भांड्यात घेऊन त्यांना एकत्रित उकळवून घ्या. त्यानंतर आच मंद करून मध आणि इसेन्शियल ऑईलचे प्रत्येकी ५ थेंब सोडा. हे मिश्रण हलवून घ्या. गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घ्या.
५. कोको लीप बाम - बी - वॅक्स आणि कोको बटर एकत्रित करून मंद आचेवर ठेवून वितळवून घ्या. नारळाच्या तेलाचे प्रत्येकी ५ थेंब घालून गॅस बंद करा. गॅस बंद करून झाल्यावर हे मिश्रण थंड होताच त्यात इसेन्शियल ऑईलचे काही थेंब सोडा.
६. कोकम बटर लीप बाम - एका भांड्यात पाणी उकळवून घ्या, या उकळत्या पाण्यात कोकम बटर आणि बी - वॅक्स घालून ते वितळून एकत्र होत नाही तोपर्यंत लाकडी चमच्या च्या मदतीने हलवून घ्या. त्यानंतर २ ते ३ मिनिटांनी त्यात शिया बटर घालून घ्या. हे सगळे मिश्रण एकत्रित मेल्ट झाल्यावर गॅस बंद करून त्यात ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घालून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर एका छोट्या डबीत साठवून ठेवा.