लांब, घनदाट, सुंदर केस कोणाला नको. प्रत्येक मुलीची इच्छा असते, की तिचे केस काळेभोर आणि लांबसडक असावेत. पण बिघडलेली जीवनशैली आणि केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केसांचे प्रचंड नुकसान होते. केसात कोंडा, केस गळणे, कमी वयात केस पांढरे होणे, यासह केसगळतीच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. या समस्येपासून फक्त महिलाच नसून पुरुषवर्ग देखील त्रस्त आहे (Hair Care Tips).
बऱ्याचदा केस इतके गळतात, की टक्कल पडण्याची भीती निर्माण होते. जर आपल्याला केस गळतीपासून सुटका हवी असेल तर, फक्त खोबरेल तेल पुरेसे नसून, घरगुती तेल तयार करा. या तेलामुळे नक्कीच केसांची सुंदर वाढ होईल(Make your Own Hair Growth Oil at Home).
केसांच्या वाढीसाठी तयार करा घरगुती तेल
केसांना लांबसडक, काळेभोर आणि केस गळती रोखण्यासाठी आपण एक घरगुती तेलाचा वापर करून पाहू शकता. यासाठी एका लोखंडी कढईत एक कप मोहरीचे तेल घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात मेथी दाणे, रीठा, आणि कढीपत्ता घालून मिक्स करा. त्यात आपण आवळा आणि कोरफडीचा देखील वापर करू शकता. ५ ते १० मिनिटांसाठी साहित्य तेलात शिजवून घ्या. नंतर तेलाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व तेल गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवा.
केसांवर घरगुती तेलाचा वापर कसा करावा?
तिशीनंतर महिलांनी घ्यावी केसांची ‘अशी’ काळजी, नाहीतर केसांचा होतो झाडू-दिसतात बेजान
सर्वप्रथम, केस विंचरून घ्या. नंतर तळहातावर तेल घेऊन केसांच्या मुळांना लावा. ५ ते ६ तासानंतर माईल्ड शाम्पूने केस धुवून घ्या. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.
केसांसाठी घरगुती तेलाचे फायदे
मेथी दाणे-मेथीमध्ये असणारे प्रोटीन, विटामिन - सी हे स्कॅल्प हेल्दी ठेवतात. शिवाय केस अधिक घनदाट आणि लांबसडक करण्यास मदत करतात. याशिवाय मेथी दाण्यात लोह आढळते, ज्यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन फ्लोमध्ये राहते.
ब्रायडल गोल्डन ग्लो हवाय? मग मधात मिसळा २ गोष्टी; दिसाल इतके सुंदर की..
रीठा-आयुर्वेदात रीठ्याला खूप महत्व आहे. रीठ्यामध्ये भरपूर लोह असते, जे केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे ठरते. याशिवाय यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्याच्या मदतीने केसांच्या सर्व समस्या दूर होतात.
कडीपत्ता- कडीपत्ता केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह इतर पौष्टीक घटक आढळतात. ज्याचा थेट फायदा केसांना होतो.