Join us  

मेकअप ब्रश ठरू शकतो चेहऱ्यावरील पिंपल्सचे कारण, पहा ब्रश स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 4:29 PM

How to clean Makeup Brushes झोपण्यापूर्वी आपण आठवणीने मेकअप काढण्यासाठी चेहरा धुतो. तसेच प्रत्येक वापरानंतर मेकअप ब्रश साफ करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

चेहऱ्यावर मेकअप लावण्यासाठी मेकअप ब्रशचा वापर केला जातो. मेकअप लावण्यासाठी विविध ब्रशेस बाजारात उपलब्ध असतात. ज्याने आपण मेकअप करतो. त्या विशिष्ट ब्रशमुळेच मेकअप योग्यरीत्या चेहऱ्यावर लावला गेला जातो. परंतु, मेकअप ब्रशची योग्य काळजी न घेतल्यास चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात. दररोज मेकअप ब्रशेस स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. झोपण्यापूर्वी आपण आठवणीने मेकअप स्वच्छ करण्यासाठी चेहरा धुतो. तसेच प्रत्येक वापरानंतर मेकअप ब्रश साफ करणे देखील महत्त्वाचे आहे. काही ब्रशेस अतिरिक्त वापर केल्यामुळे त्याच्यावर मेकअपचे जाड थर निर्माण होतात. अशा प्रकारे ब्रिस्टल्स एकत्र चिकटतात. हे घाणेरडे मेकअप ब्रश आपल्या त्वचेसाठी हानिकारक आहे. अशा परिस्थितीत मेकअप ब्रश रोज का स्वच्छ करावे हे जाणून घ्या.

मुरुम टाळण्यासाठी

बहुतांश महिलांची त्वचा ही तेलकट असते. काहींच्या चेहऱ्यावर डेड स्किनचे प्रमाण अधिक असते. त्यावरच आपण मेकअप लावतो. जेव्हा आपण सतत वापरलेला ब्रश वापरतो. तेव्हा चेहऱ्यावर मुरुमांचा धोका अधिक वाढतो. कारण आपण त्या ब्रशने कंसीलर, पावडर, ब्लश, फाऊंडेशन इत्यादी मेकअपच्या वापरासाठी घेतो. आणि तीच प्रक्रिया पुन्हा होत असल्याने. चेहऱ्यावर पुरळ, मुरूम उठण्याची शक्यता असते.

ब्रशचे आयुष्य वाढवण्यासाठी

जर आपल्याला ब्रशला अधिक महिने किंवा वर्ष टिकवून ठेवायचं असेल. तर ब्रशला एका वापरानंतर धुवून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. जितक्या वेळा आपण ब्रशला धुवाल तितके जास्त काळ ते टिकतील. त्यासाठी मेकअपचा वापर केल्यानंतर ब्रश धुवावे.

संसर्ग टाळण्यासाठी

 

घाणेरडे ब्रश विषाणूजन्य रोगांवर वर्चस्व गाजवू शकतात. आपण घाणेरडे मेकअप ब्रश वापरत असल्यास किंवा ते एखाद्या सोबत शेअर केल्यास, इतर जंतू त्वचेला धोका देऊ शकतात. आपले आयशॅडो मेकअप ब्रश आणि लिप ब्रश शेअर केल्याने स्किन प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे इतरांना ब्रश देण्यापूर्वी तो स्वच्छ धुवून द्यावे.

महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स

रोज नाही जमल्यास आठवड्यातून अथवा महिन्यातून एकदा मेकअप ब्रशला चांगले साफ करून घेणे महत्त्वाचे आहे.

ब्रश साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करू शकता. गरम पाण्याचा वापर शक्यतो टाळावा. गरम पाण्याने धुतल्याने ब्रशेसच्या ब्रिस्टल्स तुटण्याची शक्यता असते.

ब्रशेसच्या ब्रिस्टल्स शक्यतो हाताने धुवावे. जेणेकरून त्यातील मेकअप योग्यरीत्या निघतो. आणि ब्रिस्टल्स तुटण्याची शक्यता कमी होते.

ब्रश सुकविण्यासाठी टॉवेलऐवजी क्लींजिंग ऑइल स्टिक वापरणे अधिक सुरक्षित आहे. अन्यथा, ब्रशच्या ब्रिस्टल्समध्ये बुरशी निर्माण होण्याची शक्यता असते.

मेकअप ब्रशचे ब्रिस्टल्स स्वच्छ करण्यासाठी नेहमी सौम्य शॅम्पूचा वापर करावा. हातांच्या साहाय्याने ब्रशेसना मसाज करून स्वच्छ करा, अन्यथा ब्रिस्टल्समध्ये खडबडीतपणा येऊ शकतो.

लिपस्टिक ब्रशला धुणे तितकेच महत्त्वाचे

काही महिला लिपस्टिक लावण्यासाठी लिपस्टिक ब्रश वापरतात. लिपस्टिक ब्रश अतिशय मऊ आणि पातळ असतो, जो वारंवार धुतल्यास खराब होण्याची भीती असते. म्हणूनच त्याच्या साफसफाईसाठी मऊ कापड वापरणे योग्य मानले जाते. ते स्वच्छ न केल्याने संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे वेळोवेळी ब्रश स्वच्छ करणे महत्वाचे आहे.

टॅग्स :मेकअप टिप्सत्वचेची काळजी