Lokmat Sakhi >Beauty > भरपूर मेकअप करूनही अभिनेत्री लपवू शकत नाहीत हे ४ स्किन प्रॉब्लेम्स, कारण त्वचेच्या या समस्या...

भरपूर मेकअप करूनही अभिनेत्री लपवू शकत नाहीत हे ४ स्किन प्रॉब्लेम्स, कारण त्वचेच्या या समस्या...

Makeup Can't Hide Every Kind Of Skin Problem : Some Skin Problems Makeup Can't Cover : त्वचेच्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत ज्या मेकअप करूनही लपवता येत नाहीत, ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 18:40 IST2024-12-21T18:37:27+5:302024-12-21T18:40:50+5:30

Makeup Can't Hide Every Kind Of Skin Problem : Some Skin Problems Makeup Can't Cover : त्वचेच्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत ज्या मेकअप करूनही लपवता येत नाहीत, ते पाहा...

Makeup Can't Hide Every Kind Of Skin Problem Some Skin Problems Makeup Can't Cover | भरपूर मेकअप करूनही अभिनेत्री लपवू शकत नाहीत हे ४ स्किन प्रॉब्लेम्स, कारण त्वचेच्या या समस्या...

भरपूर मेकअप करूनही अभिनेत्री लपवू शकत नाहीत हे ४ स्किन प्रॉब्लेम्स, कारण त्वचेच्या या समस्या...

आपल्यापैकी प्रत्येकीला मेकअप करायला आवडतोच. एखादा खास प्रसंग, सणवार, शुभकार्य असले की आपण आवर्जून मेकअप करतोच. मेकअप ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे स्किन प्रॉब्लेम किंवा व्यंग, त्वचेवरील डाग सगळंच लपवून घेते. मेकअप करणे ही एक प्रकारची कलाच आहे, तसेच मेकअप कोणत्याही जादू पेक्षा कमी नाही. मेकअप (Some Skin Problems Makeup Can't Cover) केल्याने क्षणात आपल्याला स्वतःमध्ये खूप बदल करता येऊ शकतात. मेकअप करुन त्वचेच्या रंगात बदल करता येतो, डोळे - ओठ एकूणच सगळ्याच गोष्टी आहेत त्यापेक्षा अधिक आकर्षक करता येतात. मेकअपच्या मदतीने आपण ऐन म्हतारपणी देखील अगदी विशीतल्या तरुणीप्रमाणे दिसू शकतो(Makeup Can't Hide Every Kind Of Skin Problem).

आजकाल आपण अनेक व्हिडीओ किंवा रिल्स पाहिले असतील ज्यात मेकअप करण्यापूर्वी आणि मेकअप केल्यानंतर त्या व्यक्तीच्या दिसण्यात किती फरक येतो हे स्पष्टपणे करून दाखविले जाते. कित्येकवेळा तर मेकअप केल्याने आपला खरा चेहरा लपला जाऊन आपल्याला ओळखणे कठीण होते. एवढंच नाही तर आता एच.डी मेकअप, हायड्रा मेकअप असे अजून वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप आले आहेत जे अधिकच हायफाय आणि महागडे आहेत. मेकअप केल्याने सगळ्या गोष्टी लपवता येतात हे मान्य आहे पण आपल्या त्वचेच्या अशा काही कॉमन समस्या आहेत ज्या कितीही महागडा मेकअप केला तरीही लपवल्या जात नाहीत. अशा नेमक्या कोणत्या समस्या आहेत ज्या मेकअप करूनही लपवता येत नाहीत पाहूयात.

मेकअप करुनही त्वचेच्या या ४ समस्या लपवता येत नाहीत... 

१. डोळ्यांखाली आय बॅग्स :- जसजस वय वाढत त्याचा परिणाम आपल्या त्वचेसोबाबतच डोळे, नाक, ओठ यांसारख्या इतर अवयवांवर देखील होतो. वय वाढल्यावर डोळ्यांखाली डार्कसर्कल्स, सूज येणे किंवा पफीनेस असे अनेक प्रॉब्लेम्स होतात. यापैकी डोळ्यांखाली येणाऱ्या आय बॅग्स मेकअप करूनही लपवता येत नाहीत. यात डोळ्यांखाली भाग हा थोडासा फुगून वर येतो ज्यामुळे डोळ्यांखाली एक प्रकारची गादी तयार झाल्यासारखी दिसते. आपण खालील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या फोटोत पाहू शकता. मेकअप करूनही त्यांच्या डोळ्यांखालच्या आय बॅग्स संपूर्णपणे स्पष्ट दिसत आहेत. 

हिवाळ्यात केसातला कोंडा वाढतो, कपड्यांवर पडतो? वापरा देवघरातील ही पांढरी वस्तू, कोंडा होईल गायब...

२. पिंपल्स टेक्श्चर :- मेकअप सर्वकाही लपवू शकते परंतु जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स आले असतील तर ते मेकअप करूनही लपवणे अवघड होते. पिंपल्स आल्यामुळे त्वचेवर तेवढ्या भागात थोडासा उंचवटा तयार होतो, जो मेकअपच्या मदतीने सहजासहजी लपवणे शक्य होत नाही. करीना कपूर हिने मेकअप करूनही तिच्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स दिसत आहेत. 

३. ओपन पोर्स :- ओपन पोर्स ही त्वचेची सर्वात कॉमन अशी समस्या आहे. आजकाल अनेकजणी या ओपन पोर्सच्या समस्येने हैराण असतात. काहीवेळा कितीही चांगला मेकअप करूनही त्वचेवरील हे ओपन पोर्स लपवता येत नाहीत. खालील फोटोत आपण पाहू शकता सोनाली बेंद्रे यांनी मेकअप करूनही त्यांचे ओपन पोर्स स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे ओपन पोर्स हे देखील मेकअप करुनही लपवता येत नाहीत. 


४. डोळ्यांजवळील फाईन लाईन्स :- वय वाढत जात तस डोळ्यांजवळच्या आसपासच्या भागात वृद्धत्वाच्या खुणा म्हणजेच फाईन लाईन्स दिसू लागतात. या फाईन लाईन्स मेकअप करुन लपवणे शक्य होत नाहीत. आपण कितीही मेकअप केला तरीही एका ठराविक वयानंतर या फाईन लाईन्स दिसून येतात.

भेगा पडल्यानं टाचा दुखतात? शहनाज़ हुसैन सांगतात एक जादुई तेल, टाचा दुखणं थांबेल...

Web Title: Makeup Can't Hide Every Kind Of Skin Problem Some Skin Problems Makeup Can't Cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.