उन्हाळा म्हटलं की घाम येणार, व घामामुळे संपूर्ण शरीर चिपचिपित होते. एवढंच नाही तर, मेकअप देखील खराब होते. आवडता आऊटफिट कॅरी केल्यानंतर हवा तसा मेकअप आपण करतो. पण घामामुळे मेकअप टिकत नाही. पूर्ण चेहरा खराब दिसतो. उन्हाळ्यात स्किन खूप ऑईली होते. घामामुळे फाउंडेशन मेल्ट होते. ज्यामुळे मेकअप पॅच तयार होतात.
आयलायनर यासह काजळ देखील पसरते. उन्हामुळे मेकअप खराब होऊ नये म्हणून या ५ टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे मेकअप खराब होणार नाही. दीर्घकाळ टिकून राहेल. व चेहरा देखील फ्लॉलेस - फ्रेश दिसेल(Makeup gets spoiled in summer, so follow these effective tips).
योग्य मॉइश्चरायझर वापरा
काही लोकं मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावणे टाळतात. काही लोकांना असे वाटते की, मॉइश्चरायझर लावल्यामुळे स्किन चिकट होते, असा विचार करून अनेक लोक उन्हाळ्यात मॉइश्चरायझर वापरणे सोडून देतात. पण हे चुकीचे आहे. जर उन्हाळ्यात स्किन ऑईली होत असेल तर, लाइट मॉइश्चरायझर लावा. आपण जेल बेस्ड मॉइश्चरायझर देखील वापरू शकता.
केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? नियमित खा ४ फळं, केस होतील लांब - होईल योग्य वाढ
सनस्क्रीन वापरा
उन्हाळ्यात सनस्क्रीन लावण्याचा सल्ला मिळतो. सनस्क्रीन लावल्याने स्किन हायड्रेट राहते. व टॅन देखील होत नाही. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका. जर आपण सनस्क्रीन न लावता मेकअप करत असाल तर, स्किन टॅनिंगची शक्यता वाढते.
प्रायमर लावा
फ्लॉलेस मेकअप हवं असल्यास चेहऱ्यावर प्रायमरचा वापर करा. उन्हाळ्यात हे मेकअपला पॅची होण्यापासून वाचवते. तसेच हे लावल्यामुळे त्वचेवर मेकअप जास्त काळ टिकतो.
महिन्यातून कितीवेळा केसांना मेहंदी लावावी? पाहा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत
कमी मेकअप करा
उन्हाळ्यात हेवी फाउंडेशन लावू नका. याऐवजी टिंटवाले मॉइश्चरायझर किंवा कंसिलर लावू शकता. उन्हाळ्यात हेवी मेकअप करणे टाळा.
न्यूड शेड वापरा
उन्हाळ्यात डार्क शेड फारच हेवी वाटतात. घामामुळे हेवी मेकअप खराब होण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात लाईट मेकअप करा. ओठांवर तसेच पापण्यांवर न्यूड शेडचा वापर करा. या मेकअप ट्रिकमुळे क्लासी लूक मिळेल.