Join us  

Makeup Tips For Hiding Wrinkles Under Eyes : डोळ्यांखालच्या सुरकुत्यांमुळे म्हातारे दिसता? करा खास उपाय, सुरकुत्या दिसणारच नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2022 1:48 PM

Makeup Tips For Hiding Wrinkles Under Eyes: मेकअपच्या काही सोप्या ट्रिक्स वापरुन डोळ्यांखालच्या सुरकुत्या आपण कशा लपवू शकतो हे आपण आज पाहणार आहोत.

ठळक मुद्देआईब्रो दाट आणि उंच असतील तर नकळत आपल्या डोळ्यांचे सौंदर्य खुलते. त्यामुळे ब्रशने आईब्रो सेट करणे महत्त्वाचे आहे.काजळ, लायनर, आयशॅडो, मस्कारा लावताना ब्युटी टिप्स लक्षात ठेवा

वयाची तिशी पार करत नाही तोच आपल्या डोळ्याखाली सुरकुत्या यायला लागतात आणि आपण वय झालेले नसतानाही वयस्कर दिसायला लागतो. कधी शरीरात एखादा घटक कमी असल्याने तर कधी अनुवंशिकता, वाढते वय, कधी कामाचा अतिरिक्त ताण तर कधी अपुरी झोप यांमुळे येणाऱ्या या सुरकुत्या आल्या की लवकर जात नाहीत. (Makeup Tips For Hiding Wrinkles Under Eyes) सुरकुत्या पडण्याची सुरुवातच डोळ्यांपासून होत असल्याने या सुरकुत्या झाकण्यासाठी काही ना काही उपाय करणे आवश्यक असते. पण नेमके काय उपाय करायचे हे आपल्याला माहित नसते. पार्लरमध्ये केल्या जाणाऱ्या पीआरपी ट्रीटमेंट, पील ट्रीटमेंट असतात, पण अशा केमिकल ट्रीटमेंट कऱण्यापेक्षा मेकपने आपण या सुरकुत्या झाकू शकतो. मेकअपच्या काही सोप्या ट्रिक्स वापरुन डोळ्यांखालच्या सुरकुत्या आपण कशा लपवू शकतो हे आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे ऑफीसला जाताना किंवा अगदी एखाद्या समारंभाला जाताना डोळ्यांच्या बाजुच्या सुरकुत्या लपवण्यासाठी कोणते उपाय करायचे ते सांगताहेत प्रसिद्ध ब्य़ूटी एक्सपर्ट पूनम शुक्ला...

(Image : Google)

१. चांगल्या उत्पादनांची निवड करा

आपल्या डोळ्याच्या आजुबाजूची त्वचा अतिशय पातळ असते. याठिकाणी आपण खूप हेवी प्रॉडक्टसचा वापर केला तर त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होण्याऐवजी वाढू शकतात. त्यामुळे लोकल कंपन्यांची प्रॉडक्ट खरेदी करण्यापेक्षा ब्रँडेड आणि वजनाला हलकी अशी उत्पादने डोळ्यांच्या आजुबाजूला असलेल्या सुरकुत्यांसाठी केव्हाही चांगली. 

२. टेक्श्चर आणि शेडची योग्य निवड करा 

आपण डोळ्याखाली खूप मेकअप केला आहे असे वाटू द्यायचे नसेल तर मॅट फिनीश कॉस्मॅटीक्सचा वापर करा, त्यामुळे सुरकुत्या चांगल्याप्रकारे झाकल्या जाण्यास मदत होईल. आपल्याला डोळ्यांच्या आजुबाजूला सुरकुत्या असतील तर शक्यतो ग्लिटरची मेकअप उत्पादने वापरणे टाळावे. ग्लिटर एरवी चांगले दिसत असले तरी सुरकुत्या असतील तर आपला लूक सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता जास्त असते. 

३. आईब्रो परफेक्ट शेडमध्ये ठेवा

डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यामध्ये आईब्रोजचा मोठा सहभाग असतो. आईब्रो दाट आणि उंच असतील तर नकळत आपल्या डोळ्यांचे सौंदर्य खुलते. त्यामुळे ब्रशने आईब्रो सेट करणे महत्त्वाचे आहे. इतकेच नाही तर आयब्रो फिकट असतील तर आपल्या केसांच्या रंगाप्रमाणे काळी किंवा ब्राऊन रंगाची आईब्रो पेन्सिल वापरुन आईब्रो खुलवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नकळत तुमच्या सुरकुत्यांकडे लक्ष न जाता आईब्रोकडे जाईल आणि डोळे छान दिसण्यास मदत होईल. 

(Image : Google)

४. काजळ, आय शॅडो, लायनर आणि मस्कारा लावताना

आपण डोळ्यांचा मेकअप करताना काजळ, आयलायनर, आयशॅडो आणि मस्कारा या सगळ्याचा आवर्जून वापर करतो. पण याठिकाणची स्कीन नाजूक असल्याने मॅट फिनिश लायनर आणि मस्काऱ्याचा वापर करायला हवा. तर काजळ एकदम डोळ्याच्या कडांना न लावता डोळ्यांच्या खाली आणि जाडसर लावावे. त्यामुळे नकळत डोळ्यांचा आकार मोठा दिसतो आणि सुरकुत्या झाकल्या जाऊ शकतात. आय शॅडो लावताना आधी प्रायमर लावून त्यावर ग्रे, ग्रीन, ब्राऊन, वाईन अशा डार्क रंगाचे आय शॅडो वापरा त्यामुळे सरुकुत्या झाकल्या जाऊ शकतात.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमेकअप टिप्स