Join us

काजळ लावलं की डोळ्यातून पाणी येतं, डोळ्याखाली काळंच काळं? ४ टिप्स, लावा परफेक्ट काजळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 19:28 IST

Makeup tips how to prevent kajal from smudging on eyelids : How to Apply kajal without Smudging : Use This to STOP Your Kajal from Smudging : काजळ लावलं आणि ते चेहऱ्यावर पसरलं तर, लूक खराब होऊ नयेत यासाठी खास टिप्स...

काजळ हे डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्याचा एक महत्वाचा शृंगार आहे. डोळे अधिक आकर्षक दिसावते म्हणून आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधन लावतो. आय शॅडो, आय लायनर, यांसारख्या विविध प्रसाधन साधनांचा आपण रोज वापर करत असतो.आपल्यापैकी काहीजणी सणासमारंभाला जाताना किंवा अगदी ऑफिसला जाताना देखील किमान आयलायनर, काजळ लावतात(Makeup tips how to prevent kajal from smudging on eyelids).

आजच्या काळात मुलींसाठी काजळ लावणे हे एक फॅशन स्टेटमेंट बनले आहे. यामुळे चेहरा खुलून दिसतो.पण दिवसभर काजळ टिकून न राहता ते स्प्रेड झाल्याने डोळ्यांच्या खाली काळे डाग दिसतात. यामुळे सौंदर्य खुलण्याऐवजी अधिकच भयाण दिसते. यासाठीच काजळ चेहर्‍यावर पसरू नये म्हणून या काही खास टीप्स जरूर पाळा. आपण देखील काजल (How to Apply kajal without Smudging) पसरण्याच्या भीतीने ते लावणे टाळत असला, तर चिंता सोडा. अशा काही खास टीप्स समजून घेऊयात की, ज्यामुळे तुमचे काजळ दिवसभर व्यवस्थित टिकून राहील(Use This to STOP Your Kajal from Smudging).

काजळ लावताना डोळ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे ते पसरुन जाऊ नये म्ह्णून टिप्स... 

१. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा स्वच्छ करा :- काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खालचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेकदा तेलकट त्वचा असेल तर त्वचेतून ठराविक वेळाने तेल बाहेर आल्यासारखे होते आणि त्यामुळे त्वचा तेलकट दिसते. असे होऊ नये यासाठी आवरण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर टॉवेलने तो व्यवस्थित कोरडा करुन मगच काजळ लावा. म्हणजे काही काळ तरी काजळ आहे तसे टिकून राहण्यास मदत होईल. 

बबलगम फक्त खाऊ नका, चेहऱ्यालाही लावा! पाहा बबलगम फेसमास्कचा नवा ट्रेंड-तरुणी झाल्या क्रेझी...

२. प्रायमर किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरा :- काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर  तसेच डोळ्यांच्या दोन्ही कडांना कॉम्पॅक्ट पावडर किंवा प्रायमर लावा. यामुळे त्याभागातील मॉईश्चर शोषले जाईल. त्वचेवर मॉइश्चर असेल तर काजळ पसरते, अशावेळी फाऊंडेशन, बीबी क्रिम यांसारख्या गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करा म्हणजे काजळ पसरण्यापासून तुमचा बचाव होईल. काजळ लावल्यानंतर अतिरिक्त पावडर ब्रशने पुसा.

३. योग्य व उत्तम दर्जाच्या काजळ पेन्सिलची निवड करा :- जर तुम्ही निकृष्ट दर्जाचे काजळ पेन्सिल वापरत असाल तर ते डोळ्यांवर दीर्घकाळ टिकवणे कठीण होईल. अशा परिस्थितीत नेहमी वॉटरप्रूफ आणि दीर्घकाळ टिकणारे काजळच वापरावे. लक्षात ठेवा की जेल किंवा काजळ पेन्सिल लिक्विड काजळ पेक्षा जास्त टिकाऊ असते. काजळ हलक्या हातांनी डोळ्यांच्या कडेवर लावा, जेणेकरून ते जास्त पसरणार नाही.  

तरुण होण्यासाठी अनेकजणी करत आहेत ‘बार्बी बोटॉक्स!’; पाहा बाहुलीसारखं दिसण्याचा नवा भलताच ट्रेंड...

४.काजळ सेट होण्यासाठी वेळ द्या :- लिपस्टिक सेट व्हायला ज्याप्रमाणे वेळ लागतो त्याचप्रमाणे काजळ सेट व्हायलाही थोडा वेळ लागतो. त्यामुळे काजळ लावल्यानंतर लगेच आय मेकअप करू नका. पाच ते दहा मिनिटं थांबा आणि मग आय शॅ़डो, मस्कारा, आय लायनर या गोष्टी लावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सडोळ्यांची निगामेकअप टिप्स