Join us  

एक नाजूक सुंदर पौष्टिक ड्रायफूट, त्याचा हा लेप चेहेऱ्याला 'कमळा'ची नजाकत देतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 5:37 PM

मखान्यात असलेल्या अनेकविध गुणधर्मांमुळे चेहेर्‍यावरील मुरुम पुटकुळ्या, चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या यासारख्या किचकट समस्याही मखान्याच्या उपायाने दूर होतात. चेहेर्‍यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी मखाना फेस पॅक उत्तम उपाय ठरतो.

ठळक मुद्देदूध, मध, कोरफड या तीन घटकांचा उपयोग करुन फेस पॅक करुन ते चेहेर्‍यास लावले तर त्यामुळे चमकदार आणि मऊसूत त्वचा मिळवता येते.चेहेरा निस्तेज आणि कोमेजलेला दिसत असेल तर मध आणि मखान्याचा लेप लावावा. यामुळे त्वचा तरुण आणि चमकदारही होते.चेहेर्‍यावर मुरुम पुटकुळ्या असतील तर कोरफडीचा गर आणि मखाना यांचा लेप हा उत्तम उपाय आहे.

आपण आहारात समाविष्ट करत असलेले अनेक घटकांचा उपयोग दुहेरी स्वरुपात होतो. स्वयंपाकघरातले बहुतांश अन्न घटक हे सौंदर्य उपचारांसाठी वापरले जातात. नैसगिक सौंदर्य घटक म्हणून ते ओळखले जातात. मखाने हा पदार्थ आपल्या भरपूर ओळखीचा झाला आहे. उपवासाला चालणारा मखाना चटपटीत स्वरुपात सर्वांनाच आवडतो. मखान्यात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, तंतुमय घटक, लोह आणि झिंक यासारखे पोषक घटक असल्यानं मखाने खाणं शरीरासाठी पोषक मानलं जातं. पण मखान्याचा उपयोग जसा खाऊन होतो तसा तो चेहेर्‍यास लावूनही होतो. मखान्यात असलेल्या अनेकविध गुणधर्मांमुळे चेहेर्‍यावरील मुरुम पुटकुळ्या, चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या यासारख्या किचकट समस्याही म्खान्याच्या उपायाने दूर होतात. चेहेर्‍यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी मखाना फेस पॅक उत्तम उपाय ठरतो.दूध, मध, कोरफड या तीन घटकांचा उपयोग करुन फेस पॅक करुन ते चेहेर्‍यास लावले तर त्यामुळे चमकदार आणि मऊसूत त्वचा मिळवता येते. आपल्या त्वचेच्या समस्या ओळखून त्यानुसार मखान्याचा लेप निवडता येतो.

 

दूध आणि मखान्याचा लेप

चेहेर्‍यावर सुरकुत्या असतील तर दूध आणि मखान्याचा लेप वापरला तर फायदा होतो. हा लेप तयार करण्यासाठी पंधरा वीस मखाने अर्धा कप दुधात काही तास भिजवून ठेवावेत. ते दुधात भिजून नरम झाले की भिजवलेल्या दुधासोबतच ते वाटावेत. तयार पेस्टमधे एक चमचा लिंबाचा रस घालावा आणि आपल्या चेहेरा आणि मानेला व्यवस्थित लावावा. लेप थोडा सुकला की त्यानेच चेहेर्‍यावर हळुवार मसाज करावा. पंधरा मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

 

मध आणि मखान्याचा लेपचेहेरा निस्तेज आणि कोमेजलेला दिसत असेल तर मध आणि मखान्याचा लेप लावावा. यामुळे त्वचा तरुण आणि चमकदारही होते. हा लेप तयार करण्यासाठी मखाने दुधात भिजत घालावेत. ते भिजले की त्याची पेस्ट करावी. या पेस्टमधे एक चमच गुलाब पाणी आणि एक चमचा मध घालावं. हा लेप चेहेर्‍याला आणि मानेला लावावा. तो वाळला की हलका मसाज करावा आणि थंड पाण्यानं चेहेरा धुवावा.

कोरफड आणि मखाना लेपचेहेर्‍यावर मुरुम पुटकुळ्या असतील तर कोरफडीचा गर आणि मखाना यांचा लेप हा उत्तम उपाय आहे. आधी पंधरा वीस मखाने घ्यावेत. ते कोरडेच मिक्सरमधे वाटून घ्यावेत. मखान्याच्या पिठात थोडा कोरफडीचा गर किंवा तयार जेल घालावं. पिठ आणि गर हे एकजीव करावं. तयार पेस्ट ही चेहेर्‍यास लावावी. हा लेप पंधरा वीस मिनिटं सुकू द्यावा. आणि मग थंड पाण्यानं चेहेरा धुवावा. हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावला तर चेहेर्‍यावर चांगले परिणाम दिसतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्स