Lokmat Sakhi >Beauty > २ चमचे सायीचा स्पेशल फेस पॅक, काही मिनिटांत नव्या नवरीसारखा ग्लो येईल चेहरा

२ चमचे सायीचा स्पेशल फेस पॅक, काही मिनिटांत नव्या नवरीसारखा ग्लो येईल चेहरा

Malai face masks to get flawless skin साधा वाटणारा फेसपॅकही चेहऱ्यावर जादू करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 04:52 PM2023-05-18T16:52:22+5:302023-05-18T18:31:13+5:30

Malai face masks to get flawless skin साधा वाटणारा फेसपॅकही चेहऱ्यावर जादू करु शकतो.

Malai face masks to get flawless skin | २ चमचे सायीचा स्पेशल फेस पॅक, काही मिनिटांत नव्या नवरीसारखा ग्लो येईल चेहरा

२ चमचे सायीचा स्पेशल फेस पॅक, काही मिनिटांत नव्या नवरीसारखा ग्लो येईल चेहरा

बरेच जण सौंदर्य वाढवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन तासंतास घालवतात. ज्यासाठी लोकं जास्त पैसे देखील मोजतात. चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या प्रॉडक्ट्सचा वापर करून चेहऱ्यावर नवे तेज आणण्याचा प्रयत्न करतात. पण या उपायामुळे देखील चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही. सध्या उन्हाळयाचे दिवस सुरु आहे.

उन्हात बाहेर गेल्यानंतर साहजिक स्किन टॅनिंगची समस्या वाढते. यासह पुरळ, मुरुमांचे डाग, स्किन कोरडी पडणे, अशा समस्या छळतात. यावर उपाय म्हणून आपण घरगुती मलईचा देखील वापर करू शकता. दुधाची साय नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करते. या फेस पॅकमुळे मुरुमांचे डाग, कोरडी त्वचा व डेड स्किनपासून सुटका मिळेल. ज्यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार दिसेल(Malai face masks to get flawless skin).

मलाई फेस पॅक करण्यासाठी लागणारं साहित्य

फ्रेश मलई

हळद

मान काळी दिसते, हाताचे कोपरे काळवंडले? ३ उपाय - काळेपणा होईल कमी झ्टपट

मध

अशा पद्धतीने करा फेस पॅक

मलई फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक छोटी वाटी घ्या. त्यात दोन चमचे फ्रेश मलाई व चिमूटभर हळद घाला. हे साहित्य एकत्र मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्यात अर्धा चमचा मध घाला. व मिश्रण मिक्स करून पेस्ट तयार करा. अशा प्रकारे मलई फेस पॅक तयार आहे.

कांद्याची टरफलं कचरा म्हणून फेकू नका, ५ मिनिटांत करा झटपट हेअर डाय! केस काळेभोर होतील

फेस पॅक लावण्याची योग्य पद्धत

मलई फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हा फेस पॅक बोटांवर घ्या, व संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर निदान १५ मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. १५ मिनिटानंतर आपला चेहरा धुवा आणि पूर्णपणे स्वच्छ करा. यानंतर, कॉटन किंवा मऊ कापडाने चेहरा पुसून कोरडा करा. शेवटी फेसवॉशच्या मदतीने चेहरा धुवून स्वच्छ करा. आपण हा फेस पॅक आठवड्यातून ३ वेळा वापरू शकता.

Web Title: Malai face masks to get flawless skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.