Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्याला तेज नाही, थकल्यासारखे दिसता? १ चमचा मलईत हा पदार्थ मिसळून लावा, चमकतील गाल

चेहऱ्याला तेज नाही, थकल्यासारखे दिसता? १ चमचा मलईत हा पदार्थ मिसळून लावा, चमकतील गाल

Malai For Glowing Skin (Skin Care Tips) : दूधाची मलई चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचेवर निखार येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 08:47 AM2024-06-28T08:47:00+5:302024-06-28T08:50:02+5:30

Malai For Glowing Skin (Skin Care Tips) : दूधाची मलई चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचेवर निखार येतो.

Malai For Glowing Skin And Turmeric For Golden Glow Glowing Skin Home Remedies | चेहऱ्याला तेज नाही, थकल्यासारखे दिसता? १ चमचा मलईत हा पदार्थ मिसळून लावा, चमकतील गाल

चेहऱ्याला तेज नाही, थकल्यासारखे दिसता? १ चमचा मलईत हा पदार्थ मिसळून लावा, चमकतील गाल

मऊ, मुलायम त्वचेसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन केअर उत्पादनांचा आधार घेतात. काही स्किन केअर उत्पादनांचा खास परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. (Skin Care Tips) काही घरगुती पदार्थ चेहऱ्याला लावून तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता. यामुळे त्वचेला भरपूर फायदे मिळतात. दूधाची मलई चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचेवर निखार येतो. (Malai And Turmeric For Golden Glow Glowing Skin Home Remedies)

सुंदर त्वचेवर मलई कशी लावावी

दूध उकळल्यानंतर जी मलई निघते त्याचे अनेक फायदे मिळतात. या मलईत लॅक्टीक एसिड, फॅट्स आणि प्रोटीन्स असतात. ही मलई चेहऱ्याला लावल्याने स्किनचा पोत सुधारतो याशिवाय सुरकुत्या फाईन लाईन्स कमी होतात.

मलई आणि हळद

मलई हळदीबरोबर तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. ज्यामुळे चेहाऱ्यावर चमक येते. मलईत हळद मिसळून चेहऱ्याला लावा. एका वाटीत एक चमचा मलई आणि २ चुटकी हळद मिक्स करून घ्या. हातांवर घेऊन चेहऱ्यावर मळून घ्या.  ज्यामुळे चेहऱ्याचे डेड स्किन सेल्स निघून जातील  आणि स्किनमधील मळ सहज निघेल, टॅनिंग देखिल कमी होईल. 

मलई आणि मध

चेहऱ्यावर मलई आणि मध एकत्र लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो आणि स्किन चकचकीत मुलायम दिसते. मधामुळे त्वचेला मॉईश्चर मिळते. 

मलई आणि एलोवेरा

स्किनला सुदींग इफेक्ट्स देण्यासाठी एलोवेरा फायदेशीर ठरतो. एलोवेरामुळे त्वचेला एंटी इंफ्लेमेटरी गुण मिळतात. मलईत एलोवेरा जेल घालून हलक्या हाताने मसाज करा. नंतर ५ मिनिटं लावून चेहरा व्यवस्थित साफ करा. आठवड्यातून एकदा हा उपाय तुम्ही करू शकता. 

केळी आणि मलई

केळी आणि मलईचा फेसपॅक बनवून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. नियमित स्वरूपात तुम्ही या पॅकचा वापर करू शकता. ज्यामुळे चेहऱ्यावर तेज येते . हा पॅक तयार करण्यासाठी एक पिकलेली केळी, २ चमचे मलई, एक चमचा दूध घ्या. हा पॅक जवळपास ४५ मिनिटं लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Web Title: Malai For Glowing Skin And Turmeric For Golden Glow Glowing Skin Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.