Join us  

सुश्मिता सेनला आवडणारे मलाई फेस स्क्रब, नितळ त्वचेसाठी तिचा खास पारंपरिक असरदार उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 1:26 PM

Malai Scrub For Glowing Skin: मिस युनिव्हर्स तथा अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिने तिच्या सौंदर्याचं रहस्य नुकतंच सांगितलं आहे.. खूप काही नाही फक्त तुमच्या स्वयंपाक घरातली मलाई थोडी ट्रिकी पद्धतीने वापरा असं ती सांगते आहे..

ठळक मुद्देसायीमध्ये त्वचेला पोषण देणारे अल्फा हायड्रोक्झी ॲसिड, खनिजे, व्हिटॅमिन्स आणि काही हेल्दी फॅट्स असतात.

सुश्मिता सेन नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. कधी ब्रॉयफ्रेंडसोबतचं ब्रेकअप तर कधी कुणासोबत जोडलं गेलेलं तिचं नाव. तर बऱ्याचदा तिच्या मुलींशी तिचं असलेलं नातं, हा देखील कौतूकाचा विषय ठरत असतो. चित्रपट सृष्टीपासून दूर राहूनही सुश्मिताची क्रेझ काही कमी होत नाही. यामागे बरीच कारणं असली तरी तिचं सौंदर्य (secret of Sushmita Sen's glowing beauty) हा देखील नेहमीच एक कौतूकाचा विषय असतो. सुश्मिता तिचं सौंदर्य जपण्यासाठी नेमकं काय करते, याविषयीची माहिती नुकतीच Vogue यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.(How to do malai scrub)

 

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की चेहऱ्याचं सौंदर्य जपण्यासाठी सुश्मिताचा अधिकाधिक कल हा नैसर्गिक उत्पादने (natural remedies for beauty) वापरण्याकडे असतो. केमिकल्स असणारे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा आपल्या घरात उपलब्ध असणारे पदार्थ सौंदर्यासाठी वापरणे तिला अधिक आवडते. त्यामुळेच या वयातही तिची त्वचा अधिक तुकतुकीत आणि तजेलदार आहे. अर्थात मेकअपमुळे तिची त्वचा आहे त्या पेक्षा अधिक छान दिसते, हे अगदी खरं. पण मेकअप व्यवस्थित बसण्यासाठीही चेहऱ्याचा पोत उत्तम असणं गरजेचं आहे. आणि तेच नैसर्गिक पदार्थांपासून मिळतं, असं सुश्मिताचं म्हणणं आहे. त्वचेच्या सौंदर्यासाठी फ्रुट फेशियल आणि मलाई स्क्रब असा उपचार ती करते. 

 

सौंदर्यासाठी मलाई वापरण्याचे फायदे - भारतीय स्वयंपाक घरात अगदी सहज आढळून येणारा हा पदार्थ. मलाई म्हणजे दुधावरची साय. सायीमध्ये त्वचेला पोषण देणारे अल्फा हायड्रोक्झी ॲसिड, खनिजे, व्हिटॅमिन्स आणि काही हेल्दी फॅट्स असतात. या सगळ्या घटकांचा त्वचेवर खूपच गुणकारी परिणाम होतो. त्वचेला एकप्रकारची रिफ्रेशमेंट देण्याचे काम हे सगळे घटक करतात. 

 

कसं करायचं मलाई स्क्रब- मलाई स्क्रब तयार करण्यासाठी साय आणि बेसन हे दोनच पदार्थ लागणार आहेत. यासाठी एका वाटीत एक टेबलस्पून बेसन घ्या. त्यात साय टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. मलाई स्क्रब झालं तयार. या मिश्रणात तुम्ही चिमुटभर हळद टाकली तरी चालेल.

एंजेलिना जोली ते आलिया भट... देखण्या अभिनेत्रींच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट आहे व्हिटॅमिन सी, वाचा त्याचे फायदे- स्क्रब करण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा थोडा ओलसर करून घ्या. त्यानंतर आपण तयार केलेलं स्क्रब हातावर घेऊन चेहऱ्यावर गोलाकार दिशेने चोळा. खूप जोरजोरात रगडून मसाज करू नये. संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित स्क्रबिंग झालं की ५ ते ७ मिनिटे चेहरा तसाच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.- हा उपाय केल्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते तसेच त्वचा अधिक उजळ आणि चमकदार वाटते.- काळवंडलेली मान, हात, पाय यांच्यावरही तुम्ही हा उपाय करू शकता.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसुश्मिता सेनहोम रेमेडी