Join us  

मलायका अरोरा ते हिना खान चेहऱ्याला लावतात खोबरेल तेल; चेहरा चमकदार - फायदे 7

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 1:06 PM

वाढेलेले वय तर दिसणार नाहीच पण त्वचाही उजळेल, बॉलिवूड अभिनेत्रींचा फेवरिट उपाय...

ठळक मुद्देत्वचा मुलायम होण्याबरोबरच मॉइश्चरायझर म्हणूनही होतो उपयोगसहज उपलब्ध असणाऱ्या तेलाने आपणही मसाज करुन बघूया

बॉलिवूड अभिनेत्रींची त्वचा नितळ आणि चमकदार असते, हे पाहून आपलीही त्वचा अशी असावी असे आपल्याला वाटते. वय वाढले तरी त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत की एक डागही दिसत नाही. मग यासाठी त्या नेमके काय करत असतील असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर अनेक बॉलिवूड अभिनेत्री चेहऱ्याचा ग्लो टिकून राहण्यासाठी घरगुती उपाय करत असल्याचे दिसते. कधी त्या आईने सांगितलेले घरगुती उपाय करतात तर कधी घरच्या घरी फेस पॅक करुन तो चेहऱ्याला लावतात. त्यामुळे आपणही बाजारात मिळणारी महागडी उत्पादने वापरणे आणि सतत पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा सौंदर्यासाठी हे घरच्या घरी करता येणारे उपाय नक्कीच करु शकतो. 

(Image : Google)

खोबरेल तेल हे केसांना लावण्यासाठी असते हे आपल्याला माहित आहे. पण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हे तेल चेहऱ्यालाही लावतात. त्यामुळे त्यांची त्वचा अधिक चमकदार आणि सुरकुत्या विरहीत दिसते. प्रदूषण, ताणतणाव आणि वाढलेले वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी करीना कपूर, अनुष्का शर्मा आणि हिना खान यांच्याबरोबरच मलाइका अरोरा या अभिनेत्री चेहऱ्याला खोबरेल तेल लावतात. मलाइका आणि करीना यांचे वय ४५ हून जास्त असूनही त्यांची त्वचा ३० वर्षाच्या तरुणीला लाजवेल इतकी सुंदर आहे. याचे कारण आहे त्या नियमित लावत असलेले खोबरेल तेल. अनुष्का शर्मा आणि करीना कपूर नियमितपणे आपल्या चेहऱ्याला सीरमऐवजी खोबरेल तेलाने मसाज करतात. त्वचा मऊ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होत असल्याचे अनुष्काने व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तर मलाइका अरोराचे अरस्पानी सौंदर्य आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. खोबरेल तेल हे माझ्या आवडीच्या स्कीन केअर प्रॉडक्टपैकी एक आहे. घरगुती घरगुती स्क्रबमध्येही ती खोबरेल तेलाचा उपयोग करत असल्याचे ती सांगते. 

चेहऱ्याला खोबरेल तेल लावण्याचे फायदे 

१. खोबरेल तेलात अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी ते चांगला उपाय ठरते. 

२. कोल्ड प्रेस पद्धतीने तयार केलेल्या खोबरेल तेल म्हणजे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा खजिना असतो. त्यामुळे केसांप्रमाणेच त्वचेचेही पोषण होण्यास खोबरेल तेलाची मदत होते. 

३. त्वचेचा मसाज करण्यासाठी खोबरेल तेल पूर्वीपासूनच उपयुक्त मानले जाते. थंडीच्या दिवसांत तर कोरड्या पडलेल्या त्वचेचे चांगल्या पद्धतीने पोषण होण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरते. 

(Image : Google)

४. खोबरेल तेलात असलेले ई जीवनसत्त्व त्वचेतील पेशी तरुण राहण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हे तेल नियमितपणे चेहऱ्याला लावल्याने तुमची त्वचा लवकर सुरकुतत नाही आणि तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसता. 

५. अनेकदा प्रदूषण, हवामानातील बदल, ताणतणाव, आहारातून मिळणाऱ्या पोषणाची कमतरता यांमुळे चेहऱ्यावरील चमक कमी होते आणि चेहरा रुक्ष दिसतो. पण ही गेलेली चमक वाढविण्यासाठी खोबरेल तेलाचा अतिशय चांगला फायदा होतो.

६. खोबरेल तेलात मॉइश्चरायझिंग घटक असल्याने त्वचा मुलायम राहावी यासाठी या अभिनेत्री तेलाचा वापर करतात. 

७. रात्री झोपताना चेहरा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने धुवून चेहरा आणि मानेला ५ मिनीटे खोबरेल तेलाचा मसाज अवश्य करा. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यासही मदत होते. सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा चमकदार दिसतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीबॉलिवूडमलायका अरोराकरिना कपूरअनुष्का शर्मा