मलायका अरोरा नेहमी सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसाठी फिटनेस टिप्स देत असते.. आता मलायकाने त्वचेसाठीही काही व्यायाम सांगितले आहेत. मलायका म्हणते की हे ३ व्यायाम म्हणजे ग्लोईंग, चमकदार त्वचा (skin care tips) मिळविण्यासाठीचे नैसर्गिक उपाय आहेत.. चेहरा चमकदार, तजेलदार होण्यासाठी बऱ्याचजणी चेहऱ्यावर कॉस्मेटिक्सचा मारा करत असतात. कॉस्मेटिक्समुळे चेहऱ्याची गुणवत्ता सुधारते. पण हा परिणाम काही खूप दिवस टिकून राहत नाही. म्हणूनच हा नैसर्गिक आणि दिर्घकाळ टिकणारा उपाय (natural solution for glowing skin) करून बघा.. चेहरा होईल तजेलदार आणि टवटवीत....
ग्लोईंग स्किन मिळविण्यासाठी कोणते ३ व्यायाम नियमितपणे केले पाहिजेत, याविषयीची पोस्ट मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. थोडंसं प्रेम आणि हे ३ व्यायाम याच्या जोरावर ग्लोईंग स्किन कशी मिळवायची, हे मलायका या व्हिडिओतून सांगते आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून हा नैसर्गिक उपाय सगळ्यांनाच आवडतो आहे...
चमकदार त्वचा मिळविण्यासाठी करा हे ३ व्यायाम
१. बलून पोझ (baloon pose)
चेहऱ्याच्या त्वचेमध्ये व्यवस्थित रक्ताभिसरण व्हावे, यासाठी बलून पोझ करावी. कारण या पोझमध्ये चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. रक्ताभिसरण व्यवस्थित झालं की आपोआपच त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि त्वचा चमकदार होते.. बलून पोझ करण्यासाठी ओठ बंद करा. दोन्ही गाल फुगवून मोठे करा. १० ते १५ सेकंदांसाठी ही पोझ कायम ठेवा. ही पोझ नियमितपणे केल्यास नक्कीच त्वचेत फरक जाणवू लागेल.
२. फेस टॅपिंग पोझ (face tapping)
Face Tapping Pose अतिशय सोपी आहे. या पद्धतीमध्ये तुमच्या हाताच्या बोटांनी चेहऱ्यावर, गळ्यावर हळूवार हातांनी थापटायचं.. दररोज एखादा मिनिट चेहऱ्यावर टॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह अधिक वेगवान होतो. यामुळे त्वचेवर ग्लो तर येतोच पण चेहऱ्यावर एजिंग इफेक्ट, सुरकुत्या (prevents ageing and wrinkles) दिसण्याचे प्रमाणही कमी होते.
३. फिश पोझ (fish pose)
फिश पोझ करण्यासाठी सगळ्यात आधी ओठ बंद करा. यानंतर दोन्ही गाल तोंडात, आतल्या बाजूने ओढायचा प्रयत्न करा. यानंतर ओठांची, गालांची अशीच अवस्था कायम ठेवून मान वर करा आणि नजर वर छताकडे केंद्रित करा. ही आसनस्थिती ३० ते ४० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. या व्यायामामुळे तुमच्या गळ्याचे, जॉ लाईनचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे ज्यांना डबलचीन चा त्रास असतो, त्यांचा हा त्रास कमी होतो. तसेच जॉ लाईन आणि हनुवटी टोन्ड होण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो.