Join us

वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोराचे केस आहेत जाड आणि लांब- त्यासाठी करते 'हे' २ उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2024 09:20 IST

Hair Care Tips By Malaika Arora: दाट, लांब केसांसाठी मलायका अरोरा नेमके काय उपाय करते, याची माहिती तिनेच एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे. बघा ती करते ते खास उपाय...(hair care tips by Malaika Arora)

ठळक मुद्देकेसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. तसेच केस वाढण्यासही मदत होते. 

मलायका अरोराचा फिटनेस हा जसा चर्चेचा विषय असतो तसेच तिच्या त्वचेचे सौंदर्य आणि तिचे केस हा देखील तिच्या चाहत्यांसाठी एक उत्सूकतेचा विषय आहे. मलायकाचा फिटनेस, वाढत्या वयाच्या कोणत्याही खाणाखुणा नसलेली सुंदर त्वचा आणि तिचे दाट केस हे सगळं तिने कसं काय मिळवलं आणि टिकवून ठेवलं हा प्रश्न अनेकांना पडतो (Malaika Arora reveals her hair care secret). आता फिटनेस टिकविण्यासाठी तर ती नियमितपणे योगा करते, हे आपल्याला माहितीच आहे (Malaika Arora's hair care routine). आता केसांच्या सौंदर्यासाठी ती काय करते, याविषयी तिने स्वत:च दिलेली ही माहिती बघा...(hair care tips by Malaika Arora)

दाट- लांब केसांसाठी मलायका अरोरा करते २ सोपे उपाय

 

पहिला उपाय

मलायकाने जे काही २ उपाय सांगितले आहेत, त्यातला पहिला उपाय तिने तेलाविषयी सांगितला आहे. तिच्या केसांसाठी ती स्वत:च घरच्याघरी एक खास पद्धतीचं तेल तयार करते. तुम्हालाही केसांसाठी ती सांगते आहे त्या पद्धतीने तेल तयार करायचं असेल तर त्यासाठी एका काचेच्या बरणीमध्ये खोबरेल तेल, कॅस्टर ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल प्रत्येकी १- १ कप असं सम प्रमाणात घ्या. 

बांगडी हातात घट्ट अडकून बसली? ३ सोप्या टिप्स- एका मिनिटात बांगडी अलगद निघून येईल

त्यानंतर त्यामध्ये ३ ते ४ चमचे मेथी दाणे आणि कडिपत्त्याची पानं टाकून ठेवा. बाटलीचं झाकण लावून ठेवा आणि साधारण २ दिवसांनी ते तेल तसंच वापरायला सुरुवात करा. इतर कोणत्याही घरगुती तेल करण्याच्या पद्धतीपेक्षा मलायकाने सांगितलेली ही पद्धत खूप सोपी आहे. त्यामुळे ट्राय करून पाहायला हरकत नाही.

 

दुसरा उपाय

मलायका वरीलप्रमाणे तयार केलेलं तेल तर लावतेच, पण त्यासोबतच आठवड्यातून एकदा ती एक खास उपायही करते. आठवड्यातून एकदा ती तिच्या केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावून मसाज करते.

ओपन पोअर्स वाढल्याने चेहरा खूपच वयस्कर दिसतो? ४ सोप्या टिप्स- ओपन पोअर्स कमी होतील

यामुळे डोक्याच्या त्वचेला पोषण मिळून तिथल्या त्वचेखाली रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. तसेच केस वाढण्यासही मदत होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समलायका अरोराकेसांची काळजीहोम रेमेडी