पन्नाशीतही विशीतल्या तरुणींना लाजवेल असं अभिनेत्री म्हणजेचं मलायका अरोरा (Malaika Arora) हिचं सौंदर्य. मलायकाचं सौंदर्य, तिची अदा, तिचे लांबसडक केस फार आकर्षक वाटतात (Hair care Tips). मलायकाचा जसा फिटनेस चर्चेत असतो, त्याचप्रमाणे तिच्या ब्यूटी आणि केसांबद्दलही चर्चा होते. पन्नाशीतही मलायकाचे लांबसडक केस कसे? असा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडतो (Beauty Tips).
फिटनेससाठी मलायका योग आणि व्यायाम करताना आपण पाहिलं असेल. ती व्यायामाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात शेअर करतच असते. पण ती आपल्याला केसांबद्दल क्वचित सांगताना दिसली असेल. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने केसांची निगा राखण्यासाठी नक्की काय करावे? याबद्दल सांगितलं आहे(Malaika Arora's Homemade Hair Oil Recipe for Thick and long Hairs).
मासिक पाळी येतच नाही दोन दोन महिने? जीवनशैलीत आजच करा ५ बदल; पीरियड्स येतील वेळेवर
मलायका केसांची निगा राखण्यासाठी नक्की काय करते?
- केसांच्या उत्तम वाढीसाठी मलायका ऑइल चंपी करण्याचा सल्ला देते. ती घरगुती तेलाचा वापर करते. ज्यामुळे मलायकाचे केस कायम घनदाट दिसतात.
- मलायकाचा फेवरीट हेअर ऑइल तयार करण्यासाठी एका डब्यात एक कप खोबरेल तेल घ्या. त्यात ऑलिव्ह ऑइल, ४ चमचे एरंडेल तेल, २ चमचे मेथी दाणे, कडीपत्ता घालून मिक्स करा.
- मिक्स केल्यानंतर डब्याला झाकण लावा. २- ३ दिवसांसाठी तसेच ठेवा. ३ दिवसानंतर आपण या तेलाचा वापर करू शकता.
मुलींना घरात कोंडून घालण्यापेक्षा आईबाबांनी त्यांना शिकवायला हव्या ५ गोष्टी; मुलगी होईल खंबीर..
- तेलाचा वापर करण्यापूर्वी एका बाऊलमध्ये काढून थोडे गरम करा. नंतर स्काल्पला लावून समाज करा. ४५ मिनिटं किंवा १ तासानंतर शाम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून २ वेळा आपण या तेलाचा वापर करू शकता.
- खोबरेल तेल, मेथी दाणे आणि एरंडेल तेलातील गुणधर्म केसांच्या उत्तम वाढीस मदत करते. शिवाय केस गळतीही थांबते.