Join us  

केसांची वेणी अगदी खराटा झाल्यासारखी दिसते? अर्धा कांदा -वाटीभर मेथ्यांचा पाहा 'हा ' खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2024 5:48 PM

Managing Hair Fall: DIY Methi And Onion Hair Mask To Say Goodbye To Hair Fall : गळणाऱ्या केसांसाठी मेथी-कांद्याचा नवा उपाय

केस गळतीमुळे आज प्रत्येक जण त्रस्त आहेत. हवामान, खाण्याच्या सवयींमध्ये बदल, केसांची योग्य निगा न राखणे आणि केसात कोंडा यामुळे केस हमखास गळतात (Hair care Tips). केसांच्या समस्येवर काही जण घरगुती तर काही ब्यूटी ट्रिटमेण्टचा वापर करून पाहतात (Hairfall Problems). पण बहुतांश ब्यूटी उत्पादनांमध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो. ज्यामुळे केसांचे अधिक नुकसान होते (Home remedy for hairs).

त्याऐवजी नैर्सगिक उपाय केव्हाही उत्तम. जर आपणही केस गळतीमुळे त्रस्त असाल तर, मेथी दाणे आणि कांद्याचा सोपा उपाय करून पाहा. घरगुती साहित्यात हेअर मास्क तयार करा. यामुळे नक्कीच केसांना फायदा होईल. शिवाय केसांची नैसर्गिक वाढ होईल(Managing Hair Fall: DIY Methi And Onion Hair Mask To Say Goodbye To Hair Fall).

मेथी दाणे - कांद्याचा हेअर मास्क

मेथी दाणे आणि कांद्याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वात आधी, एक वाटी मेथी दाणे पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी भिजलेल्या मेथी दाण्याची पेस्ट तयार करा. नंतर का मध्यम आकाराच्या कांद्याचा अर्धा तुकडा बारीक करा आणि त्याचा रस तयार करा. कांद्याचा रस गाळून घ्या.

किती 'तास' केसांना खोबरेल तेल लावावं? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात केस गळती रोखण्यासाठी..

एका बाऊलमध्ये मेथी दाण्याची पेस्ट आणि कांद्याच्या रस घेऊन मिक्स करा. तयार पेस्ट केसांच्या मुळांना आणि स्काल्प लावा. तासाभरानंतर शाम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा या मास्कचा वापर आपण करू शकता.

केसांसाठी मेथी दाण्याचे फायदे

मेथी दाणे केसांसाठी एनर्जी बूस्टरसारखे काम करतात. मेथीच्या दाण्यांमध्ये लेसिथिन असते जे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. शिवाय यात फॉलिक ॲसिड, जीवनसत्त्वे ए, के आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे केसांना फायदा होतो.

केसांचा भांग रुंद, पांढरे केस झाले? होमिओपॅथी तज्ज्ञांनी सांगितलं खोबरेल तेलाचा 'असरदार' उपाय

केसांसाठी कांद्याच्या रसाचे फायदे

कांद्यामध्ये सल्फर भरपूर असते जे केस गळणे आणि तुटणे यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. यासह यात फॉलिक ॲसिड, सल्फर आणि व्हिटॅमिन सी असते. यात अँटीफंगल गुणधर्मही असते. ज्यामुळे स्काल्प क्लिन राहते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स