Lokmat Sakhi >Beauty > दंड, हाताची बोटं काळवंडली? १० रूपयात पार्लरसारखं मेनिक्युअर घरीच करा-ग्लोईंग दिसेल त्वचा

दंड, हाताची बोटं काळवंडली? १० रूपयात पार्लरसारखं मेनिक्युअर घरीच करा-ग्लोईंग दिसेल त्वचा

Manicure at home naturally : एकदा त्वचा काळी पडली की कितीही उपाय केले तरी त्वचेचा रंग उजळत नाही.  (How to Give Yourself a Natural Manicure)

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:08 AM2023-05-23T11:08:09+5:302023-05-23T17:31:26+5:30

Manicure at home naturally : एकदा त्वचा काळी पडली की कितीही उपाय केले तरी त्वचेचा रंग उजळत नाही.  (How to Give Yourself a Natural Manicure)

Manicure at home naturally : The Perfect DIY Manicure in just 10 rupees | दंड, हाताची बोटं काळवंडली? १० रूपयात पार्लरसारखं मेनिक्युअर घरीच करा-ग्लोईंग दिसेल त्वचा

दंड, हाताची बोटं काळवंडली? १० रूपयात पार्लरसारखं मेनिक्युअर घरीच करा-ग्लोईंग दिसेल त्वचा

सध्या उन्हाळ्याच्या दिवसात  मान, हात, पाय आणि चेहराही खूपच काळा पडतो. एकदा त्वचा काळी पडली की कितीही उपाय केले तरी त्वचेचा रंग उजळत नाही.  (How to Give Yourself a Natural Manicure) सुर्याची किरणं पडल्यानं त्वचेचा रंग बदलतो. फेशियल, ब्लीच, मसाज यांसारख्या ट्रिटमेंट्स घेऊनही रंग उजळत नाही. अशावेळी कमीत कमी खर्चात काही घरगुती उपाय तुमचं काम अधिक सोपं करू शकता. त्वचेवरचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी  कितीही प्रयत्न केले तरी फायदा होत नाही. (Manicure at home naturally)

एका  खोलगट टपात गरम पाणी घेऊन त्यात लिंबू पिळा. लिंबू पिळल्यानंतर त्यात शॅम्पू घाला, बेकिंग सोडा घाला.  हे साहित्यात घातल्यानं व्यवस्थित ढवळून घ्या आणि पाण्यात हात ५ चे १० मिनिटांसाठी बुडवून ठेवा.  नंतर एका वाटीत कोलगेट घेऊन त्यात नारळाचं तेल घाला. या तेलानं स्टेप पाय स्टेप हातांची मसाज करा.  सगळ्यात आधी दंडाच्या मसाज करा नंतर बोटांपर्यंत या. या मिश्रणानंतर मसाज केल्यानंतर हात स्वच्छ धुवून टाका. (The Perfect DIY Manicure in just 10 rupees)

मेनिक्युअर का करावं?

आपण आपल्या हातांचा वापर नेहमीच करतो. ज्यामूळे धूळ आणि घाण हातांवर लागते.  नियमित साबणानं हात धुवून  हात स्वच्छ होत असले तरी नखांच्या आत साचलेली घाणं बाहेर काढणं कठीण होतं. मेनिक्युअरमुळे नखांमध्ये जमा झालेली घाण दूर होते. यामुळे संक्रमणाचा धोका टळतो आणि मॅनिक्युअरनं नखांमध्ये लपलेली घाण आणि किटाणू दूर होण्यास  मदत होते. मेनिक्यूअर  करणं शरीरासाठी उत्तम ठरतं कारण यामुळे रक्तभिसारण सुधारतं आणि बोटं आणि मनगटाचे स्नायूही चांगले राहतात.

नियमित मसाज शरीराला रिलॅक्स ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. आजकालच्या  धकाधकीच्या आयुष्यात मसाज केल्यानं ताण-तणाव कमी होण्यास मदत होते आणि संपूर्ण शरीराला आराम मिळतो. आरामदायक मसाजमध्ये स्क्रबिंग आणि एक्सफोलिटिंगचा समावेश असतो. ज्यामुळे हात मऊ राहतात. 

१५ दिवसांत केसांची चांगली वाढ होईल; फक्त झोपताना १ उपाय करा, दाट-लांब केसांचा फॉर्म्यूला

मेनिक्युअर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसं की नेल पॉलिश रिमुव्हरचा उपयोग केल्यानं हाताला मॉईश्चरायजर लावणं विसरू नका. अन्यथा त्वचा डिहायड्रेट होऊ शकते. २ आठवडे किंवा त्यापेक्षा अधिकवेळा नेल पेंट तशीच राहू दिल्यास त्याचा रंग बदलू शकतो.   

Web Title: Manicure at home naturally : The Perfect DIY Manicure in just 10 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.