Lokmat Sakhi >Beauty > क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?

क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?

What Is A Hydra Facial & What Are The Benefits? : आता पर्यंत आपण फेशियल ऐकले होते पण सध्या हायड्रा फेशियलचा ट्रेंड आहे, काय त्याचे फायदे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2023 05:55 PM2023-07-04T17:55:18+5:302023-07-04T18:12:26+5:30

What Is A Hydra Facial & What Are The Benefits? : आता पर्यंत आपण फेशियल ऐकले होते पण सध्या हायड्रा फेशियलचा ट्रेंड आहे, काय त्याचे फायदे?

Marathi Actress Kranti Redkar Shared Hydra Facial Video For Glowing Skin Know Its Benefits. | क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?

क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?

कोणताही खास प्रसंग किंवा सणवार, घरगुती फंक्शन म्हटले की घरातील महिला आवर्जून फेशियल, ब्लिच करतातच. फेशियल केल्याने चेहऱ्यावर विशेष चमक येते. सुंदर दिसण्यासाठी अनेक स्त्रिया आपल्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी दर महिन्याला पार्लरमध्ये  महागड्या ट्रिटमेंट्स करण्यावर जास्त भर देतात. काही महिला तर दर महिन्याला आपले पार्लरमध्ये जायचे रुटीन अतिशय काटेकोरपणे फॉलो करताना दिसतात. आपण सुंदर दिसावे यासाठी स्त्रिया फेशियल, क्लिनअप, ब्लिच, वॅक्सिंग, आयब्रो अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. फेशियल ही एक स्किनकेअर ट्रिटमेंट् आहे ज्यात, विविध उत्पादने आणि तंत्रांचा वापर करुन मृत त्वचा आणि अशुद्धता एक्सफोलिएशनद्वारे काढून टाकली जाते. त्याचबरोबर त्वचेला फेसमास्क आणि क्रिमने हायड्रेशन केले जाते. 

बदलत्या काळानुसार वाढते प्रदूषण, रोजची धावपळ यामुळे होणारे त्वचेचे नुकसान भरुन काढण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावीच लागते. त्वचेला दर अमूक काही दिवसांनी खोलवर स्वच्छ करणे आवश्यक असते यात शंका नाही. यासोबतच त्वचेला योग्य ते पोषण मिळणेही खूप महत्त्वाचे आहे. फेशियल या दोन्ही गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करतात. काहीवेळा अनेक सेलिब्रिटीज आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी अनेक नवनवीन पर्यायांचा वापर दिसतात. याच पर्यायांचा मग ट्रेंड होतो. अनेकदा सर्वच बॉलिवूड सेलिब्रिटी लुकसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल करतात. सध्या बाजारात हायड्रा फेशियलचे क्रेज पाहायला मिळते. पण हायड्रा फेशियल (Hydra Facial) म्हणजे नक्की असत तरी काय ? पाहूयात(Marathi Actress Kranti Redkar Shared Hydra Facial Video For Glowing Skin Know Its Benefits).

हायड्रा फेशियल म्हणजे काय ?

हायड्रा फेशियल या प्रकारात हायड्रा-डर्माब्रेशन प्रक्रिया आहे. यामुळे आपल्या त्वचेचा पोत सुधारतो. हायड्रा फेशियलसाठी ३० मिनिटांचा कालावधीत लागतो. या फेशिअलमध्ये त्वचा स्वच्छ करण्यास मदत होते. त्वचा हायड्रेट करण्यासाठी पेटंट तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. हायड्रेटिंग फेशिअलमध्ये वापरलेल्या प्रोडक्टमुळे आपली त्वचा अधिक चांगली दिसू लागते. अगदी पहिल्याच फेशिअल ट्रिटमेंटनंतर आपली त्वचा अधिक चांगली खुलून दिसू लागते. 

हायड्रा फेशियल नेमके कसे केले जाते :- 

१. फेशिअलची पहिली पायरी असते ती म्हणजे क्लिन्झिंगची. त्यामुळे सगळ्यात आधी आपला चेहरा विशिष्ट क्लिनझरच्या मदतीने स्वच्छ केला जातो. चेहरा क्लिन केल्यानंतर चेहऱ्यावर साचलेली अतिरिक्त धूळ काढून टाकली जाते, शिवाय आपल्या चेहऱ्यावरील पोअर्स ओपन होतात. 

२. क्लिन्झिंगनंतरची दुसरी महत्वाची पायरी म्हणजे ‘स्क्रबिंग’ हायड्रेटिंग फेशिअल करताना किंवा कोणतेही फेशिअल करताना आपण निवडलेला स्क्रब हा नेहमी माईल्ड असावा. कारण जर स्क्रब खरखरीत असेल त्यामुळे आपली त्वचा अधिक कोरडी होण्याची शक्यता असते.

३. माईल्ड स्क्रब केल्यानंतर वाफ दिली जाते. चेहऱ्याला वाफ दिल्यामुळे त्वचेच्या पोअर्समध्ये अडकेले व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स पोअर्समधून बाहेर येण्यास मदत मिळते.

चेहऱ्यावर करा बटाटा आइस क्यूबची जादू, चेहऱ्यावर येईल कधीही न आलेली सुंदर चमक...

४. या पुढे केला जातो तो म्हणजे मसाज. चेहऱ्यासाठी मसाज हा फारच आवश्यक असतो. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते. हायड्रेटिंग फेशिअलमध्ये हायड्रेटिंह फेसऑईलचा उपयोग केला जातो. हातावर थोडेसे तेल घेऊन साधारण १० मिनिटे तरी मसाज करण्यात येतो. 

५. हायड्रेटिंग फेशिअल हे सगळ्यांसाठी असले तरी देखील यामध्ये वापरण्यात येणारा मास्क हा आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडला जातो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा प्रकार ओळखून त्याला योग्य असेल अशा मास्कची निवड करण्यात येते. 

६. मास्क काढून टाकल्यानंतर आपला चेहरा टवटवीत आणि तजेलदार दिसण्यासाठी चेहऱ्याला हायड्रेटिंग सीरम लावले जाते आणि चेहऱ्यावरील तजेलदारपणा लॉक केला जातो. 

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

चहा केल्यावर गाळण्यातील चहापत्ती फेकून देता? १ सोपा उपाय, त्वचा आणि केस होतील सुंदर...

हायड्रा फेशियल करण्याचे फायदे :- 

१. त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
२. जळजळ कमी करण्यासाठी कार्य करते.
३. स्किन टिश्यू दुरुस्त करते आणि त्वचा चमकदार बनवते.
४. त्वचेच्या नवीन पेशी वाढवतात.
५. कोलेजन उत्पादन वाढवते. त्यामुळे त्वचा घट्ट होते.
६. काळ्या वर्तुळांची समस्या कमी होते. कोरड्या आणि निस्तेज त्वचेला नवजीवन मिळते.

Web Title: Marathi Actress Kranti Redkar Shared Hydra Facial Video For Glowing Skin Know Its Benefits.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.