वयानुसार चेहे र्याची त्वचा ही सैल पडते आणि चेहेर्यावर सुरकुूत्या दिसायला लागतत. पण महिला ज्याप्रमाणे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे सैल पडलेल्या आपल्या चेहेर्याच्या त्वचेकडेही दुर्लक्ष करतात आणि मग ही सैल त्वचाच चेहेर्यावरच्या सुरकुत्यांना कारणीभूत ठरते. चेहेर्याची त्वचा घट्ट असेल तर सुरकुत्या पडत नाहीत. सुरकुत्या न पडण्यासाठी चेहेर्याची त्वचा घट्ट ठेवणे हाच उत्तम उपाय आहे.
चेहेर्याची त्वचा सैल का पडते?
- वयानुसार त्वचेच्या आरोग्याकडे, देखभालीकडे लक्ष न दिल्यास
- संप्रेरकांमधे अर्थात हार्नोन्समधे असमतोल निर्माण झाल्यास
- जास्त वेळ उन्हात राहिल्यास आणि उन्हात राहाताना तीव्र सूर्यप्रकाशापासून स्वत:चं नीट संरक्षण न केल्यास चेहेर्याची त्वचा काळी पडण्यासोबतच , ती सैल पडते आणि सुरकुत्या पडतात.
- वाढलेलं वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमधेही त्वचा सैल होते.
- वजन कमी करण्यासाठी खाणं कमी केलं जातं. पौष्टिक घटक जर शरीरास मिळाले नाही तर त्वचेचं पोषण कमी होऊन त्वचा सैल पडते. तिच्यातला जिवंतपणा हरवतो.
- अनेकदा आजारातून बरं होतांनाही त्वचा सैल पडते.
चेहेर्याची त्वचा घट्ट करणारे लेप आणि मसाज
त्वचेच्या पोषणाकडे आपण किती लक्ष देतो यावर आपल्या त्वचेचं आरोग्य अवलंबून असतं. त्वचा ढीली पडणं म्हणजेच त्वचेचं पोषण नीट न होण्याचं लक्षण आहे. रोजच्या धावपळीत चेहेर्याला क्रीम लावण्यापलिकडे अनेकजणी आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाही. पण ही काळजी न घेणंच त्वचा सैल पडण्याचं मुख्य कारण ठरतं. यासाठी वेळात वेळ काढून आपल्या त्वचेचं पोषणं होईल याकडे लक्ष द्यायला हवं.
- त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी पुदिन्याची पानं उपयोगी पडतात. पुदिन्याची पानं पान्यात टाकून ती उकळून त्या पाण्यानं चेहेर्यास वाफ घ्यावी. चेहेर्याला त्वचेस उपयुक्त बदाम किंवा तीळ अशा पौष्टिक तेलानं किंवा नैसर्गिक तत्त्वं असलेल्या क्रीमनं त्वचेची हलक्या हातानं मसाज करणं आवश्यक असतं. त्वचेला नियमितपणे मसाज केल्यास त्वचा घट्ट राहाते, सुरकुत्या असतील तर त्याही निघून जातात. त्वचेचा मसाज केल्यानं त्वचा घट्ट होण्यासोबतच त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो. मसाज करताना चेहेरा कसाही चोळून चालत नाही. मसाज करण्याची शास्त्रीय पध्दत असते. तिचा अवलंब करणं आवश्यक आहे. मसाज हा नेहेमी खालून वर करावा ,मसाज करताना चेहेर्यावर बोटं गोल गोल फिरवावीत. मसाज हा रगडल्यासारख्या केल्यामुळेही त्वचा ढीली पडते.
- मीठ, हळद आणि मेथी पावडर प्रत्येकी एक एक चमचा घ्यावी. आंघोळीच्या पाच मिनिटं आधी पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट साबणाप्रमाणे चेहेर्यासोबतच संपूर्ण शरीराला हलक्या हातानं रगडून लावावी. पाच मिनिटं ती तशीच राहू द्यावी. आंघोळीनंतर चेहेर्यास मॉश्चरायझर लावावं. दर चार दिवसांनी हा प्रयोग केल्यास चेहेर्यासोबतच संपूर्ण शरीराची त्वचा निरोगी आणि मऊ राहाते.
- अंड्याचा पांढर्या भागात प्रथिनं असतात. हे प्रथिनं आपल्या त्वचेचा सैल पडण्यापासून बचाव करतात. सोबतच आपल्या त्वचेच्या पेशीही निर्माण होतात. त्वचेचा पोत सूधारतो. यासाठी अंड्यातील पांढरा भाग आणि मध एकत्र करावं. आणि हे मिश्रण लेपासारखं चेहेरा आणि मानेस लावावं. थोड्या वेळानंतर चेहेरा गार पाण्यानं स्वच्छ करवा. चेहेर्याची त्वचा घट्ट ठेवण्य़ासाठी महिन्यातून तीन वेळा हा उपाय करावा.
- कॉफी मधील कॅफिन हे तत्त्वं आपल्या त्वचेच आद्र्रता राखण्यात, त्वचा मऊ आणि घट्ट ठेवण्यास मदत करतात. कॉफी बिया वाटून त्याची बनवलेली पावडर आपल्या त्वचेचं एक्सफोलिएशन करुन त्वचा स्वच्छ करते. कॉफीत असलेल्या अँन्टि ऑक्सिडण्टसमूळे त्वचेचं वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते. यासाठी कॉफी पावडर खोबर्याचं तेल आणि दालचिनी आनि ब्राऊन शुगर एकत्र करुन ते चेहेर्यास मसाज करत लावावं. आणि थोड्या वेळानं चेहेरा स्वच्छ धुवावा.
- त्वचेला तेलाचा मसाज करावा. मसाज करण्यासाठे ऑलिव्ह तेल वापरावं. कारण ऑलिव्ह तेलात ई आणि अ जीवनसत्त्वं असतं. शिवाय हे तेल त्वचेचं वयही रोखतं.
- रोजमेरी ऑइल आणि काकडीचा रस हे दोन घटक त्वचा तरुण राखतात आणि त्वचा घट्ट ठेवतात. रोजमेरी ऑइलमुळे त्वचेचा पोत सुधारतो, त्वचेखालचा रक्तप्रवाह सुरळित होतो. या तेला अँण्टिऑक्सिडण्टस असल्यानं त्वचेची वय होण्याची प्रक्रिया थांबते, किंवा लांब ढकलली जाते.
- त्वचा घट्ट ठेवण्यासाठी कोरफड जेल हा उत्तम उपाय आहे. यात मेलिक अँसिड असतं. या अँसिडमुळे त्वचेची लवचिकता वाढते. म्हणून कोरफड जेलनं आठवड्यातून तीन ते चार वेळा मसाज करावा.
- चमचाभर मधात लिंबाचा रस मिसळून ते चेहेर्यास लावलं तर त्वचा घट्ट होते आणि उजळतेही.