त्वचा जितकी निरोगी व डाग विरहित असेल तितकेच सौंदर्य खुलून येते, असं म्हणतात. कोणताही सण, समारंभ, कार्यक्रम असेल तर अशावेळी आपण सुंदर दिसावे यासाठी अधिक प्रयत्न करतो. चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या, पुरळ, मुरुम, रुक्ष निस्तेज त्वचा, कोरडेपणा असेल तर चेहरा सुंदर दिसत नाही. चेहेरा सुंदर, स्वच्छ व फ्रेश दिसण्यासाठी फेशियल केलं जातं. चेहऱ्याला चमक आणण्यासाठी फेशियल ही एक महत्त्वाची पद्धत मानली जाते(Medi-facial – The new age way to treat your skin).
आपल्यापैकी बऱ्याचजणी दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करुन घेतात. फेशियल करताना क्लीन्जिंग, स्क्रबिंग, स्टीम आणि फेस पॅक या चार टप्प्यांचा समावेश असतो. काहीजणी स्पा, पार्लरमध्ये जाऊन बेसिक फेशियल करून घेतात. परंतु आता काळानुरूप फेशियल करण्याचे प्रकार देखील बदलत जात आहेत. गोल्ड फेशियल, फ्रूट फेशियल, पर्ल फेशियल, चॉकलेट फेशियल असे फेशियलचे अनेक प्रकार आपल्याला माहित असतात. परंतु सध्या मेडी फेशियलचा (Medi-Facial) एक नवा ट्रेंडच सुरु झाला आहे. (Know step by step about Medi-Facial Treatment)फरिदाबादच्या रिव्हाइव्ह स्किन, हेअर अँड नेल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक आणि स्किन एक्स्पर्ट डॉ. संदीप बब्बर यांनी या नव्या मेडी फेशियलच्या प्रकाराविषयी अधिक माहिती दिली आहे(What is Medi-Facial ? & it's benefits).
मेडी - फेशियल म्हणजे नेमकं काय ?
मेडी - फेशियल (Medi-Facial)हे वैद्यकीय दर्जाचे फेशियल आहे, जे नियमित केल्या जाणाऱ्या फेशियलपेक्षा जास्त प्रभावी असते. मेडी फेशियल हे विशिष्ट त्वचा स्थिती किंवा त्वचा विकारांवर उपचार करण्यासाठी डिझाइन केले गेलेले आहे. याचबरोबर जवळजवळ सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हे फेशियल सुरक्षित असते. योग्य उपकरणे आणि तंत्रांचा वापर करून मेडी-फेशियल केवळ प्रमाणित आणि अनुभवी त्वचा तज्ज्ञांच्या क्लिनिकमध्येच केले पाहिजे. ज्यामध्ये मायक्रोकरंट्स, डर्माप्लॅनिंग, फोटो रिजुव्हनेशन, एलईडी थेरपी, पील्स, मायक्रोडर्माब्रेशन आणि बरेच काही समाविष्ट असते.
महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...
चॉकलेट खा आणि चेहऱ्यालाही लावा ! १ चमचा कोको पावडर आणेल चेहऱ्यावर चमचमता आनंदी ग्लो...
त्वचेच्या खास करून कोणत्या समस्यांसाठी मेडी - फेशियल फायदेशीर ठरते ?
मेडी - फेशियल कोरडी आणि सैल त्वचा यासारख्या अनेक समस्यांवर उपचार करण्यात मदत करण्यास उपयुक्त ठरते. मेडी - फेशियल केल्याने त्वचा तरुण, चमकदार आणि हायड्रेट होते. सूर्य किरणांमुळे त्वचेचे होणारे नुकसान, पिगमेंटेशनची समस्या आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी मेडी - फेशियल अधिक चांगले मानले जातात.
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फॉलो करा नाइट हेअर केअर रुटीनचे ५ नियम..केसांचे सौंदर्य टिकेल कायम..
मेडी - फेशियल कोणी करावे ?
आपण आपल्या त्वचेच्या विशिष्ट समस्यांना दूर करण्याचा विचार करत असल्यास, लग्नासारखा मोठा खास कार्यक्रम असल्यास आपण मेडी - फेशियल करण्याला प्राधान्य द्यावे. मेडी - फेशियल करण्यासाठी वेळ कमी लागतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत. ते त्वचेचा टोन आणि पोत सुधारतात आणि लगेचच उजळ दिसणारी त्वचा देतात जी अधिक चांगली दिसते. याचबरोबर त्वचेची स्थिती जसे की मुरुम, मुरुमांच्या खुणा, बारीक रेषा आणि रंगद्रव्य सुधारण्यास मदत करतात.
फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?
दूध नासले तर फेकू नका, घरच्याघरी करा त्वचेसाठी खास सिरम - चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...
मेडी - फेशियल करण्याचे फायदे कोणते ?
१. लूज पडलेली त्वचा घट्ट होते.
२. त्वचेला मॉइश्चराईज करते.
३. मूड सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त.
४. एक्सफोलिएटेड, मऊ आणि कोमल त्वचा प्रदान करते.
५. वृद्धत्वाची चिन्हे कमी करते.
६. त्वचेचा पोत गुळगुळीत होतो.