Lokmat Sakhi >Beauty > केस होतील काळेभोर, फक्त मेहेंदीत '१' सिक्रेट पावडर मिसळा- केस गळतीही थांबेल..

केस होतील काळेभोर, फक्त मेहेंदीत '१' सिक्रेट पावडर मिसळा- केस गळतीही थांबेल..

Mehandi Hair Pack Recipe ~ Black & Silky Hair : 'या' धातूच्या तव्यावर मेहेंदी भिजवा, पाहा काळेभोर केसांचं सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 10:00 AM2024-05-29T10:00:23+5:302024-05-29T15:39:40+5:30

Mehandi Hair Pack Recipe ~ Black & Silky Hair : 'या' धातूच्या तव्यावर मेहेंदी भिजवा, पाहा काळेभोर केसांचं सिक्रेट

Mehandi Hair Pack Recipe ~ Black & Silky Hair | केस होतील काळेभोर, फक्त मेहेंदीत '१' सिक्रेट पावडर मिसळा- केस गळतीही थांबेल..

केस होतील काळेभोर, फक्त मेहेंदीत '१' सिक्रेट पावडर मिसळा- केस गळतीही थांबेल..

लांबसडक; घनदाट आणि काळेभोर केस कोणाला नाही आवडत (Hair Care Tips). परंतु, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सध्या केसांचे नुकसान होत चाललं आहे (Beauty Hacks). मुख्य म्हणजे केस गळतात आणि पांढरे होतात (Mehendi for Hairs). केस पांढरे झाल्यानंतर आपण त्याला मेहेंदी लावतो (Hairfall). पण मेहेंदीमुळे केस तात्पुरते काळे होतात. मेहेंदीचा रंग केसांवर अधिक वेळ टिकत नाही. शिवाय केसांना नवी चमक मिळत नाही.

केस पांढरे आणि गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जर आपले केस नैसर्गिकरित्या काळे व्हावे असे वाटत असेल तर, मेहेंदीमध्ये आवळा पावडर मिक्स करा. आवळा पावडरमुळे केस गळती थांबेल. केस नैसर्गिकरित्या काळेभोर दिसतील. शिवाय केसांना नवीन जीवन मिळेल(Mehandi Hair Pack Recipe ~ Black & Silky Hair).

केसांना मेहेंदी कशी लावावी?

लागणारं साहित्य

मेहेंदी पावडर

आवळा पावडर

चहापत्ती

पाणी

अशा पद्धतीने केसांना लावा मेहेंदी

सर्वात आधी लोखंडी तव्यावर ५ चमचे मेहेंदी पावडर घ्या. आपण त्यात आपल्या आवडीनुसार मेहेंदी कलर मिक्स करू शकता. नंतर त्यात २ चमचे आवळा पावडर घालून मिक्स करा.

बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे ५ पदार्थ, हृदय ठेवा ठणठणीत-रक्ताभिसरणही सुधारेल

आता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चहापत्ती घाला. पाणी थोडं आटल्यानंतर गॅस बंद करा. तयार पाणी मेहेंदी पावडरमध्ये घालून मिक्स करा. चहापत्तीच्या पाण्यामुळे केसांना एक रंग मिळतो, जो रंग सहसा लवकर निघत नाही.

३० मिनिटांसाठी मेहेंदीवर झाकण ठेवा. ३० मिनिटानंतर केस विंचरून घ्या, आणि केसांना मेहेंदी लावा. एका तासानंतर पाण्याने केस धुवून घ्या. शाम्पू लावणं टाळा. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण केसांना शाम्पू लावू शकता. या पद्धतीने केसांना मेहेंदी लावल्यास केस काळेभोर होतील.

केसांसाठी आवळ्याचे फायदे

घामामुळे खाज-स्किन इन्फेक्शनचा त्रास! आंघोळीच्या पाण्यात घाला ५ नैसर्गिक गोष्टी - आजार राहतील दूर

आवळा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. जे आरोग्य आणि मुळात केसांसाठी फायदेशीर ठरते. त्यात व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी आणि टॅनिन नावाचे गुणधर्म आहेत. जे केसांच्या निगा राखण्यास मदत करते. यामुळे केस पांढरे होणे, गळणे, केसात कोंडा यांसारख्या समस्या दूर होतात.

केसांना मेहेंदी लावण्याचे फायदे

केसांना रंगवण्यासाठी प्राचीन काळापासून मेहेंदीचा वापर होत आला आहे. मेहंदी हे टॅनिन आणि व्हिटॅमिन ईचे नैसर्गिक स्रोत आहे, जे नैसर्गिकरित्या केसांना मऊ करण्यास मदत करते. इतर कोणत्याही प्रॉडक्ट्सच्या तुलनेत हा सर्वोत्तम हेअर मास्क आहे. यामुळे पांढरे केस काळे होतात. शिवाय केसांना नवी चमक मिळते.

Web Title: Mehandi Hair Pack Recipe ~ Black & Silky Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.