Lokmat Sakhi >Beauty > झारा आणि चमचा वापरुन काढा सुंदर मेहंदी! झटपट लावा मेहंदी- सुरेख डिझाइन्स पाहतच रहाल 

झारा आणि चमचा वापरुन काढा सुंदर मेहंदी! झटपट लावा मेहंदी- सुरेख डिझाइन्स पाहतच रहाल 

Mehndi Designs, Tricks And Tips: मेहंदी काढताना आकार व्यवस्थित जमत नसतील, तर या काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स (Tips For Mehndi) वापरून बघा. कमी वेळात अगदी सुरेख मेहंदी काढता येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 02:01 PM2022-08-23T14:01:01+5:302022-08-23T14:02:56+5:30

Mehndi Designs, Tricks And Tips: मेहंदी काढताना आकार व्यवस्थित जमत नसतील, तर या काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स (Tips For Mehndi) वापरून बघा. कमी वेळात अगदी सुरेख मेहंदी काढता येईल.

Mehendi designs using skimmer and spoon, Draw mehndi just in 10 minutes, Unique ideas for mehndi designs | झारा आणि चमचा वापरुन काढा सुंदर मेहंदी! झटपट लावा मेहंदी- सुरेख डिझाइन्स पाहतच रहाल 

झारा आणि चमचा वापरुन काढा सुंदर मेहंदी! झटपट लावा मेहंदी- सुरेख डिझाइन्स पाहतच रहाल 

Highlightsएकतर अशा पद्धतीने आकार काढणे सोपे जाते. शिवाय मेहंदी पटापट काढून होते आणि पारंपरिक नक्षींपेक्षा किंवा अरेबियन नक्षींपेक्षा या नक्षी आणखी वेगळ्या, नव्या प्रकारच्या वाटतात.

मेहंदी म्हणजे अनेक जणींची अगदी आवडती गोष्ट. एकदा हातावर मेहंदी काढली की नंतर पुढचे २- ३ दिवस तरी तिचा सुवास मनाला एक वेगळाच फ्रेशनेस देऊन जातो. आता तर सणवार सुरू होत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा मेहंदी काढावी (simple tips for mehendi designs) लागते. सवय तुटल्याने आता अनेकींना असं वाटतं की मेहंदी काढताना हात वळतच नाहीत, त्यामुळे आकार व्यवस्थित, हवे तसे जमत नाहीत. म्हणून मग मनासारखी डिझाईन काढता येतच नाही. तुमचीही अशीच तक्रार असेल तर मेहंदी काढण्याची ही नवी स्टाईल एकदा बघाच..(Mehendi designs using skimmer and spoon)

 

मेहंदी काढण्याच्या या नव्या पद्धतीमध्ये आपल्याला झारा, चमचा अशा स्वयंपाक घरातल्या गोष्टी वापरून मेहंदी काढायची आहे. एकतर अशा पद्धतीने आकार काढणे सोपे जाते. शिवाय मेहंदी पटापट काढून होते आणि पारंपरिक नक्षींपेक्षा किंवा अरेबियन नक्षींपेक्षा या नक्षी आणखी वेगळ्या, नव्या प्रकारच्या वाटतात. त्यामुळे कधी तरी सुटसुटीत किंवा पटापट होणारी मेहंदी काढायची असेल, तर अशा पद्धतीने मेहंदी काढून बघा. आता ही पहिली पद्धत बघा. यामध्ये झाऱ्याचा वापर करून मेहंदी काढली आहे. यासाठी खूप काही वेगळं केलेलं नाही. झाऱ्या हातावर ठेवून आधी त्यावरचे जे ठिपके आहेत, त्यावरून हातावर मेहंदीचे ठिपके काढून घेतले. नंतर ते आणखी दाट केले. टुथपिकचा वापर करून मग त्याचं छान फुल बनवलं. आणि मग त्याला जोडून वेगवेगळ्या नक्षी काढल्या. 

 

अशाच पद्धतीने चमच्याचा वापर करूनही खूपच सुंदर मेहंदी काढता येते. यासाठी आपला छोटा पोहे खाण्याचा चमचा हातावर ठेवा आणि चमच्याच्या भाेवतीने ठिपके काढा.

पंजाबी ड्रेसवर स्टायलिश जॅकेट, फॅशनचा नवा ट्रेण्ड, बघा जॅकेटचे ८ स्मार्ट सुंदर प्रकार

टुथपिकने हे ठिपके पसरवले की त्यापासून सुंदर पानाचा आकार तयार होईल. आजूबाजूला फुलं आणि थोडी नक्षी काढली की झाली एकदम हटके स्टाईल मेहंदी आणि ती ही अवघ्या १० ते १५ मिनिटांत. 

 

Web Title: Mehendi designs using skimmer and spoon, Draw mehndi just in 10 minutes, Unique ideas for mehndi designs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.