Join us

थ्रेडिंग-वॅक्सिंगचा त्रास कशाला? दुधात मिसळा '४' गोष्टी; अनावश्यक केस होतील गायब-चेहरा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2024 11:27 IST

Milk face pack to remove facial hair naturally at home : चेहऱ्यावरचे बेबी हेअर काढण्यासाठी थ्रेडिंग-वॅक्सिंगचा त्रास सहन करू नका..

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छोटे-छोटे केस असतात (Beauty). काही स्त्रियांच्या चेहऱ्यावर ते केस दिसत नाही पण काहींच्या चेहऱ्यावर ते केस लगेचच दिसून येतात. अशा परिस्थितीत महिला त्यांना दूर करण्यासाठी विविध उपाय करतात (Skin Care Tips). काही महिला ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करतात. तर काही जण स्किन केअर उत्पादनांचा वापर करून केस काढतात.

पण बऱ्याचदा केमिकलयुक्त उत्पादनांमुळे चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला हानी पोहोचते. अशावेळी नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून आपण चेहऱ्यावरचे केस काढू शकतात. कच्च्या दुधात काही गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा क्लिन होईल, शिवाय नैसर्गिक चमक येईल(Milk face pack to remove facial hair naturally at home).

चेहऱ्यावरचे अनावश्यक केस काढण्यसाठी दुधाचा करा असा वापर

लागणारं साहित्य

दूध

हळद

साखर

अर्ध्या लिंबूने सहज निघेल पायाचे टॅनिंग, फक्त लिंबाला ३ गोष्टी लावून रगडा, पाहा चमक

मध

कॉफी

बेसन

अशा पद्धतीने तयार करा हेअर रिमुव्हल क्रीम

सर्वप्रथम, एका भांड्यात एक कप दूध घ्या. त्यात एक चमचा हळद, एक चमचा साखर, अर्धा चमचा मध घालून मिक्स करा. गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा कॉफी आणि एक चमचा बेसन घालून मिक्स करा. अशा प्रकारे हेअर रिमुव्हल पेस्ट वापरण्यासाठी रेडी.

फक्त ३० मिनिटात डाळी भिजवून करा क्रिस्पी मेदूवडे; दाक्षिणात्य चवीचे मेदूवडे हवेत तर..

अशा प्रकारे करा हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर

सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर चेहऱ्यावर ब्रशने क्रीम लावून पसरवा. १० मिनिटानंतर सुती कापडाने क्रीम उलट्या दिशेने पुसून काढा. यामुळे अनावश्यक केस यासह डेड स्किन देखील निघून जाईल. थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगचा त्रास न होता, आपण या नैसर्गिक क्रीमच्या मदतीने चेहरा क्लिन होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी