Lokmat Sakhi >Beauty > पुदिना फेसपॅक! पुदिन्याचे ८ जबरदस्त उपयोग, तुमच्या त्वचेला बनवतील अधिक सुंदर आणि मुलायम

पुदिना फेसपॅक! पुदिन्याचे ८ जबरदस्त उपयोग, तुमच्या त्वचेला बनवतील अधिक सुंदर आणि मुलायम

How To Use Pudina or Mint For Skin: पुदिना ज्याप्रमाणे खाद्य पदार्थांची चव वाढवतो, त्याचप्रमाणे तुमच्या त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरतो. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 02:53 PM2022-09-14T14:53:35+5:302022-09-14T14:54:11+5:30

How To Use Pudina or Mint For Skin: पुदिना ज्याप्रमाणे खाद्य पदार्थांची चव वाढवतो, त्याचप्रमाणे तुमच्या त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरतो. 

Mint face pack for skin, 8 Benefits of mint or pudina face pack for your skin | पुदिना फेसपॅक! पुदिन्याचे ८ जबरदस्त उपयोग, तुमच्या त्वचेला बनवतील अधिक सुंदर आणि मुलायम

पुदिना फेसपॅक! पुदिन्याचे ८ जबरदस्त उपयोग, तुमच्या त्वचेला बनवतील अधिक सुंदर आणि मुलायम

Highlightsक्लिन्झर, ॲस्ट्रिंजंट, टोनर, मॉईश्चरायझर अशा अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो.

खाद्य पदार्थांमध्ये जेव्हा आपण पुदिना (pudina) घालतो, तेव्हा त्या पदार्थांची चव आणि सुवास निश्चितच अधिक वाढतो. त्याच पद्धतीने पुदिना त्वचेच्या अनेक समस्या सोडवून सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरतो. पुदिन्यामध्ये (mint face pack) भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्याचप्रमाणे त्यात मेंथॉल आणि ॲण्टीबॅक्टेरियल घटकही मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व गुणधर्म त्वचेसाठी उपुयक्त असतात. त्यामुळेच क्लिन्झर, ॲस्ट्रिंजंट, टोनर, मॉईश्चरायझर अशा अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. (How to use pudina for skin?)

 

पुदिना फेसपॅकमुळे त्वचेला होणारे फायदे 
१. पुदिन्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरचे टॅनिंग म्हणजेच काळवंडलेपणा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक उजळ दिसते.

केस खूपच पातळ झाले? केमिकल्स असणारे हेअर प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा करा ५ घरगुती उपाय

२. पुदिन्यामध्ये असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे आणि सॅलिसायलिक ॲसिडमुळे त्वचेवरील काळे डाग कमी होतात.

३. पुदिन्यातील व्हिटॅमिन ए त्वचेतले अतिरिक्त तेल शोषून घेते. त्यामुळे पिंपल्स तसेच ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असा त्रास कमी होतो.

४. पुदिन्यामध्ये ॲण्टी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे त्वचेवर पुरळ, रॅश आली असेल तरीही पुदिन्याचा फेसपॅक उपयुक्त ठरतो.

 

५. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी पुदिना उपयुक्त ठरतो.

६. पुदिन्यामध्ये नैसर्गिक स्वरुपातले ॲस्ट्रिंजंट असते. त्यामुळे त्वचेतल्या छिद्रांमधील घाण स्वच्छ करून त्वचा नितळ करण्यासाठी पुदिन्याची मदत होते.

पिंपल्स, काळे डाग आणि डार्क सर्कल्स घालविण्याचा सोपा उपाय, करा केळीच्या सालींचा ‘असा’ उपयोग

७. पुदिन्यात असणो ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात.

८. पुदिन्याच्या वापरामुळे त्वचेतला रक्तप्रवाह अधिक सुरळीत आणि वेगवान होतो. तसेच त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते.

 

त्वचेसाठी कसा करायचा पुदिन्याचा वापर
पुढील प्रकारे तुम्ही पुदिन्याचे वेगवेगळे फेसपॅक बनवू शकता.
१. काकडीची एक लहानशी स्लाईस, १०- १२ पुदिन्याची पाने, अर्धा टेबलस्पून मध.

२. कुस्करलेलं केळ २ टेबलस्पून आणि १०- १२ पुदिन्याची पाने 

३. एक टेबलस्पून लिंबाचा रस आणि पुदिन्याच्या १० ते १२ पानांचा रस

४. १ टेबलस्पून ओट्स, १० ते १२ पुदिन्याची पाने, १ टीस्पून मध, २ टीस्पून दूध आणि काकडीचा छोटासा तुकडा

५.  १ टेबलस्पून मुलतानी माती, १० ते १२ पुदिन्याच्या पानांच्या रस, अर्धा टेबलस्पून मध आणि अर्धा टेबलस्पून दही.  

 

Web Title: Mint face pack for skin, 8 Benefits of mint or pudina face pack for your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.