उन्हाळ्यात त्वचेचं ऊन, धूळ, घाम यामुळे खूप नुकसान झालेलं असतं. यामुळे त्वचेशी निगडित अनेक समस्या ( skin problems) उद्भवतात. अशा वेळी त्वचेला आरोग्यदायी थंडावा हवा असतो. यासाठी स्वयंपाकघरातला चटणीसाठी म्हणून आणलेला पुदिना (mint for beauty) हा उत्तम पर्याय आहे. पुदिन्यात दाह आणि सूजविरोधी, जिवाणुविरोधी घटक असतात. तसेच पुदिन्यात त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करणारे ॲण्टि एजिंग गुणधर्म असतात. सौंदर्य समस्या घालवण्यासाठी पुदिन्याचे विविध फेसपॅक (mint face pack) तयार करता येतात. पण कमी वेळात चेहेऱ्यावर परिणामकारक चमक येण्यासाठी, चेहेरा ताजा आणि टवटवीत दिसण्यासाठी पुदिन्याच्या फेसपॅकपेक्षाही पुदिन्याचं फेशियल (mint facial) परिणामकारक ठरतं. घरच्याघरी केल्या जाणाऱ्या परिणामकारक फेशियलमध्ये पुदिन्याच्या फेशियलचाही (how to do mint facial) समावेश आहे.
Image: Google
कसं करायचं पुदिन्याचं फेशियल?
1. पुदिना फेशियल करताना त्वचा स्वच्छ करण्यासाठी 15-20 पुदिन्याची पानं, 2 मोठे चमचे गुलाब पाणी, 1 छोटा चमचा लिंबाचा रस, 1 छोटा चमचा कोरफड गर/ जेल आणि 1 छोटा चमचा नारळाचं पाणणी घ्यावं. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पुदिन्याची पानं घालावीत. हे पाणी उकळून घ्यावं. नंतर ते गाळून घ्यावं. या पाण्यात गुलाब पाणी, लिंबाचा रस, कोरफड गर आणि नारळ पाणी घालावं. सर्व नीट मिसळून घ्यावं. कापसाच्या बोळ्यानं हे पाणी चेहेऱ्यास लावून त्वचा स्वच्छ करावी.
2. चेहेरा माॅश्चराइज करण्यासाठी 1 छोटा चमचा दुधाची साय, 1 छोटा चमचा लिंबाचा रस, 1 छोटा चमचा पुदिन्याचा रस घ्यावा. या तिन्ही गोष्टी एकत्र करुन त्याने चेहेरा माॅश्चराईज करावा. चेहेऱ्याला हा लेप 10 मिनिटं लावून ठेवावा. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
3. त्वचा माॅश्चराइज झाल्यानंतर स्क्रब करावं. स्क्रब करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात पुदिना पावडर भेटते ती वापरावी. स्क्रब करण्यासाठी 1 चमचा पुदिना पावडर आणि 1 चमचा मध घ्यावं. हे मिश्रण चेहेऱ्यावर हलका मसाज करत लावावं. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
4. त्वचा अशी मुळापासून स्वच्छ झाली की चेहेऱ्यास वाफ घ्यावी. वाफ घेण्यासाठी पाणी, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि 15-20 पुदिन्याची पानं घ्यावीत. पाणी गरम करावं. त्यात पुदिन्याची पानं आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालावी. डोक्यावरुन रुमाल ओढून 5 मिनिटं चेहेऱ्यावर वाफ घ्यावी. सर्वात शेवटी चेहेऱ्याला पुदिना फेस पॅक लावावा.
5. पुदिना फेस पॅक करण्यासाठे 1 छोटा चमचा पुदिना पावडर, 1 छोटा चमचा चंदन पावडर, 1 छोटा चमचा मध, 1 मोठा चमचा गुलाब पाणी आणि चिमूटभर हळद घ्यावी. हे सर्व जिन्नस एकत्र करुन लेप चेहेऱ्यास लावावा. 20 मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहेरा रुमालानं टिपून घ्यावा. चेहेऱ्यास फेस सिरम किंवा माॅश्चराइजर लावावं.
Image: Google
पुदिन्याचं फेशियल केल्याने काय फायदा होतो?
1. पुदिन्याचं फेशियल केल्यानं त्वचेस थंडावा मिळतो. चेहेरा ताजा टवटवीत होतो. चेहेऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. चेहेऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
2. पुदिन्यातील घटक ॲस्ट्रिजेण्टसारखे काम करतात. ते त्वचेच्या रंध्रातून घाण काढतात. चेहेऱ्याच्या त्वचेखालील रक्तप्रवाह वाढतो. चेहेऱ्यावर सुरकुत्या पडत नाही.
3. पुदिन्यात असलेल्या ॲण्टिऑक्सिडण्ट्समुळे डोळ्याखालील काळी वर्तुळ जातात.
4. पुदिन्यात ॲण्टिसेप्टिक घटक असतात. यामुळे चेहेऱ्यावर डाग पडत नाही. मुरुम पुटकुळ्या येत नाही. उन्हानं त्वचेचं होणारं नुकसान टळतं.