Lokmat Sakhi >Beauty > मीरा कपूर सांगतेय फेशियल ऑइल फॉर्म्युला, 6 पैकी 1 ऑइल निवडा आणि सुंदर दिसा!

मीरा कपूर सांगतेय फेशियल ऑइल फॉर्म्युला, 6 पैकी 1 ऑइल निवडा आणि सुंदर दिसा!

मीरा कपूर म्हणते त्वचेचं पोषण झाल्यास, लाड पुरवल्यास त्वचा राहाते निरोगी. त्यासाठी फेशियल ऑइलचा मसाज महत्त्वाचा. मीरा कपूरच्या यादीत आहे 6 फेशियल ऑइलचा समावेश.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 07:10 PM2022-02-25T19:10:10+5:302022-02-25T19:18:20+5:30

मीरा कपूर म्हणते त्वचेचं पोषण झाल्यास, लाड पुरवल्यास त्वचा राहाते निरोगी. त्यासाठी फेशियल ऑइलचा मसाज महत्त्वाचा. मीरा कपूरच्या यादीत आहे 6 फेशियल ऑइलचा समावेश.

Mira Kapoor tells Facial Oil Formula, Choose 1 Oil Out Of 6 And Look Beautiful! | मीरा कपूर सांगतेय फेशियल ऑइल फॉर्म्युला, 6 पैकी 1 ऑइल निवडा आणि सुंदर दिसा!

मीरा कपूर सांगतेय फेशियल ऑइल फॉर्म्युला, 6 पैकी 1 ऑइल निवडा आणि सुंदर दिसा!

Highlightsत्वचेचा कोरडेपणा तिळाच्या तेलाचा मसाज केल्यानं कमी होतो. पीच केरनेल ऑइलमुळे त्वचेतील आर्द्रता वाढते.फेशियल ऑइलमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निर्मितीस चालना मिळते.

त्वचेची योग्य काळजी घ्यायची असेल तर तज्ज्ञ म्हणतात सीटीएम रुटीन महत्त्वाचं.. सीटीएम म्हणजे क्लीन्जिंग, टोनिंग आणि माॅश्चरायझिंग. पण त्वचेची काळजी घेताना या तीन गोष्टींसोबत आणखी एक गोष्ट करणं महत्त्वाची आहे. ती म्हणजे त्वचेचं पोषण. त्वचेचं पोषण करण्यासाठी फेशियल ऑइल लावणं महत्त्वाच असल्याचं मीरा कपूर सांगते. आपल्या इन्स्टाग्रामवरील फोटो स्टोरीत मीरा कपूर त्वचेचं पोषण करण्याचा, त्वचेचे लाड करण्याचा सल्ला देते. हे लाड करण्यासाठी मीरा कपूर फेशियल ऑइल लावण्यास सांगते.

Image: Google

फेशियल ऑइल लावायचं तर कोणतं या प्रश्नाचं उत्तरही मीरा कपूरनं आपल्या फोटो स्टोरीतून दिलं आहे. यात ती फेशियल ऑइलची एक यादी देते. या यादीत 6 प्रकारचे फेशियल ऑइल आहेत. त्या त्या फेशियल ऑइलच्या वैशिष्ट्यांसह ही यादी असल्यानं ती वाचून आपण आपल्यासाठी कोणतं फेशियल ऑइल निवडायचं हे सहज ठरवू शकतो. 

Image: Google

1. घाण्याचं तिळाचं तेल

तिळाचं तेल त्वचेस ऊबदारपणा देतं. शरीरातील वात दोष घालवण्यासाठी तिळाच्या तेलानं मसाज करण्याचा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देतात. तसेच त्वचेवरचा कोरडेपणाही घाण्याचं तिळाचं तेल मसाजसाठी वापल्यास कमी होतो. ऑइल पुलींगसाठीही या तेलाचा उपयोग होतो. 

Image: Google

2. पीच केरनेल ऑइल

पीच केरनेल ऑइलमुळे त्वचेतील आर्द्रता वाढते. या तेलात ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9, अ आणि ई जीवनसत्त्वं हे त्वचेचं पोषण करणारे घटक यात असतात. त्वचा तेलकट न करता त्वचेचा ओलसरपणा, मऊपणा वाढवण्याचं काम पीच केरनेल ऑइल करतं.  पीच केरनेल ऑइल चेहऱ्याचा मसाज करण्यासाठी वापरल्यास त्वचेची लवचिकता वाढते. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनाही हे तेल फेशिअल ऑइल म्हणून वापरण्याचा सल्ला दिला जातो. 

Image: Google

3. रोजहिप ऑइल

रोजहिप ऑइल जडही नसतं आणि हलकंही. माॅश्चरायझिंगसाठी उपयोगाचं असलेल्या या तेलात अ, क, ई ही जीवनसत्वं असतात. त्वचेवरच्या जखमाही रोजहिप ऑइल मसाजनं भरुन निघतात. 

Image: Google

4. आफ्टर शाॅवर ऑइल

त्वचेस लावताक्षणी शोषलं जातं इतकं आफ्टर शाॅवर ऑइल हलकंफुलकं असतं. त्वचेत पटकन शोषलं गेलं तरी या तेलानं त्वचेत तयार होणारा ओलावा दिवसभर टिकून राहातो. आंघोळ झाल्यानंतर हे तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. 

Image: Google

5. ॲप्रिकाॅट केरनेल ऑइल

त्वचेचे आणि केसांचे लाड पुरवण्यासाठी ॲप्रिकाॅट केरनेल ऑइलनं मसाज करण्याचा सल्ला सौंदर्य तज्ज्ञ देतात.

Image: Google

6. घाण्याचं मोहरीचं तेल

मोहरीचं तेल हे प्रकृतीनं उष्ण असतं. या तेलानं आंघोळीआधी मसाज केल्यास त्वचेखालचा रक्तप्रवाह सुधारतो. या तेलामुळे त्वचेत निर्माण होणारी ऊब टिकून राहाते. आठवड्यातून फक्त दोनदा  या तेलानं मसाज करण्याचा सल्ला दिला जातो. घाण्याचं मोहरीच्या तेलात एखाद दोन लवंगा आणि लसूण पाकळ्या टाकून ते गरम करावं. ते कोमट झाल्यावर पायांना चोळल्यास रक्तप्रवाह सुधारतो. तसेच स्नायुदुखीही बरी होत असल्याचं तज्ज्ञ देतात. 

Image: Google

फेशियल ऑइल वापरण्याचे फायदे

1. फेशियल ऑइलमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म असतात. प्रदूषण, रसायनं यामुळे त्वचेस असणारा एजिंगचा धोका फेशियल ऑइलनं टळतो.

2. त्वचा ओलसर आणि आर्द्र राहिली तरच  ती निरोगी राहाते. फेशियल ऑइलमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निर्मितीस चालना मिळते. त्वचा ताजीतवानी रा
हाते.

3. फेशियल ऑइलमुळे त्वचेवरील मुरुम पुटकुळ्या बऱ्या होतात. त्यामुळे लालसर झालेली त्वचा, त्वचेची होणारी आग बरी होते. मुरुम पुटकुळ्यांनी चेहेऱ्यावर येणारी सूज फेशियल ऑइलमुळे कमी होते. 

4. त्वचेचं पोषण करण्यासोबतच त्वचा हळुवारपणे, कोमलतेने स्वच्छ करण्याची क्षमता फेशियल ऑइलमध्ये असते. 

Web Title: Mira Kapoor tells Facial Oil Formula, Choose 1 Oil Out Of 6 And Look Beautiful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.