Lokmat Sakhi >Beauty > मीरा राजपूत सांगते सौंदर्याचं 'एलईडी' रहस्य.. एलईडी फेस मास्क, हे नक्की असतं काय ?

मीरा राजपूत सांगते सौंदर्याचं 'एलईडी' रहस्य.. एलईडी फेस मास्क, हे नक्की असतं काय ?

निस्तेज त्वचा ताजीतवानी करण्यासाठी, त्वचा तरुण दिसण्यासाठी एलईडी फेस मास्क हे उपयुक्त ब्यूटी टूल असल्याचं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात. हे एलईडी फेस मास्क नेमकं आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 07:56 PM2022-02-10T19:56:02+5:302022-02-10T20:07:37+5:30

निस्तेज त्वचा ताजीतवानी करण्यासाठी, त्वचा तरुण दिसण्यासाठी एलईडी फेस मास्क हे उपयुक्त ब्यूटी टूल असल्याचं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात. हे एलईडी फेस मास्क नेमकं आहे काय?

Mira Rajput tells about 'LED' Beauty Secrets .. LED Face Mask is effective tool of Modern Beauty | मीरा राजपूत सांगते सौंदर्याचं 'एलईडी' रहस्य.. एलईडी फेस मास्क, हे नक्की असतं काय ?

मीरा राजपूत सांगते सौंदर्याचं 'एलईडी' रहस्य.. एलईडी फेस मास्क, हे नक्की असतं काय ?

Highlightsनिस्तेज त्वचेला नाविन्य आणि चमक देण्याचं काम एलईडी फेस मास्क करतं.केवळ त्वचेच्या समस्या असतील तरच एलईडी फेस मास्कचा उपयोग केला जावा हा काही नियम नाही.खराब त्वचा दुरुस्त करुन त्वचेवरचे घाव एलईडी फेस मास्कदावेरे बरे केले जातात.

मीरा राजपूतने आपल्या स्किन केअर रुटीनबद्दल बोलताना एलईडी फेस मास्कचा उल्लेख केला. एका विशिष्ट वर्गात एलईडी फेस मास्क ही स्किन केअरशी निगडित संकल्पना प्रचलित असली तरी सर्वसामान्य महिला आणि मुलींसाठी एलईडी फेस मास्क ही नवीन संकल्पना आहे.  त्वचा सुरक्षित ठेवणारं, सौंदर्य वाढवणारं, त्वचेच्या अनेक समस्या सोडवणारं माॅर्ड कूल टूल म्हणून एलईडी फेस मास्कची ओळख आहे. 

Image: Google

त्वचेची काळजी घेण्यासाठी, सौंदर्य वाढवण्यासाठी केवळ ब्यूटी प्रोडक्टच नाही तर ब्यूटी टूल देखील वापरले जातात.  एलईडी फेस मास्क या साधनाचा वापर स्किन केअर ट्रीटमेण्टसाठी त्वचारोग तज्ज्ञ आणि सौंदर्य तज्ज्ञ करतात. महिला आणि मुलींसाठी सौंदर्य आणि फिटनेसबाबत आदर्श ठरलेली मीरा राजपूत ही आपण त्वचा चांगली ठेवण्यासाठी एलईडी फेस मास्क वापरत असल्याचं सांगते.  त्वचा तज्ज्ञ डाॅ. निवेदिता दादू एलईडी फेस मास्क हे सौंदर्य उपकरण काळजी घेण्यास फायदेशीर कसं हे सविस्तर सांगतात. निस्तेज त्वचा ताजीतवानी करण्यासाठी, त्वचा तरुण दिसण्यासाठी, सौंदर्य पूरक त्वचेतील कोलॅजनची निर्मिती वाढवण्यासाठी एलईडी फेस मास्क हे उपयुक्त असल्याचं डाॅ.  निवेदिता सांगतात. 

Image: Google

एलईडी फेस मास्कचे फायदे काय?

1.  निस्तेज त्वचेला नाविन्य आणि चमक देण्याचं काम एलईडी फेस मास्क करतं. त्वचेवर सुरकुत्या पडून चेहऱ्यावर वय दिसतं. ही समस्या घालवण्यासाठी एलईडी फेस मास्क हे साधन फायदेशीर मानलं जातं. त्वचेवरील डाग, खड्डे घालवून त्वचेचा पोत यामुळे सुधारतो. 

2.  ल्यूमिनसेंट फेस मास्क वापरुन त्वचा चमकदार होते. त्वचा ऊन, प्रदूषण, मानसिक चिंता यामुळे खराब होते. त्वचेवर जखमा होतात. खराब त्वचा दुरुस्त करुन त्वचेवरचे घाव एलईडी फेस मास्कदावेरे बरे केले जातात. त्वचेवरची सूजही यामुळे कमी होते. एलईडी फेसमास्कद्वारे रोसैसिया, एक्झिमा, सोरायसिस आणि घामोळ्यासारखे त्वचा विकार बरे होतात.

Image: Google

3.  केवळ त्वचेच्या समस्या असतील तरच एलईडी फेस मास्कचा उपयोग केला जावा हा काही नियम नाही. त्वचा तरुण सतेज आणि तरुण ठेवण्यासाठी , आकर्षक करण्यासाठी एलईडी फेसमास्कचा उपयोग केला जातो. 

4. चेहऱ्यावरचे मुरुम , पुटकुळ्या, डाग, काळी वर्तुळ घालवण्यासाठी एलईडी फेस मास्कचा वापर प्रभावी ठरतो.

Image: Google

एलईडी फेस मास्कची उपचार पध्दती

एलईडी फेस मास्क हे सौंदर्य उपकरण त्वचेची काळजी घेण्यात प्रभावी असलं तरी त्याचा  वापर सर्रास होत नाही. याचं कारण ही उपचारपध्दती महागडी आहे. ती सगळ्यांनाच परवडते असं नाही. पण आपल्या त्वचेची काळजी घेताना जे जास्त पैसे खर्च करु शकता त्यांना ही परवडणारी स्किन केअर ट्रीटमेण्ट आहे. एलईडी फेस मास्क प्रभावी ठरतं कारण वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश लहरींचा वापर केला जातो. या प्रकाश लहरी त्वचेत खोलवर शिरुन वेगवेगळे परिणाम प्राप्त करुन देतात.

Image: Google

एलईडी फेस मास्कमधे लाल रंगाच्या प्रकास लहरींचा फायदा त्वचेवरील सूज, एजिंगच्या समस्या दूर करण्यासाठी होतो. हिरव्या रंगाच्या प्रकाश लहरी चेहऱ्यावरील डाग, काळपटपण, डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी उपयुक्त  असतात. निळ्या रंगाच्या प्रकाश लहरींमुळे मुरुम पुटकुळ्या या समस्या कमी होतात. तसेच निळ्या रंगाच्या प्रकाश लहरींमुळे त्वचेतील सीबम ग्रंथीला आलेली सूज घालवतात, त्वचेतील अतिरिक्त तेल निर्मिती रोखतात. एलईडी फेस मास्कमधील पिवळा प्रकाश त्वचेतील कोलॅजनच्या निर्मितीस चालना देतो. या पिवळ्या प्रकाश लहरींचा उपयोग चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी होतो. 


 

Web Title: Mira Rajput tells about 'LED' Beauty Secrets .. LED Face Mask is effective tool of Modern Beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.