Join us  

मीरा राजपूत सांगतेय, हळद - बेसनाच्या स्क्रबचे सिक्रेट! कडाक्याच्या थंडीतही दिसेल तिच्या चेहऱ्यावर असते तशी चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 1:34 PM

Mira Rajputs 3 Ingredient Face Scrub : Try these homemade scrub at home to achieve fresh & glowing skin in winter : Mira Rajput Kapoor's 3 ingredient quick face scrub for a glowing skin : स्क्रबिंग करण्यासाठी कशाला हवेय महागडे स्क्रब, वापरुन पाहा मीरा राजपूतचे होममेड नॅचरल स्क्रब...

ऋतू कोणताही असो आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. वेळच्यावेळी फेशियल, स्क्रब, क्लिनअप करुन आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. आपल्या त्वचेवर जमा झालेली धूळ, डेड स्किन किंवा त्वचेतील इतर घाण वेळीच काढून टाकणे आवश्यक असते. त्वचा खोलवर आतून स्वच्छ करण्यासाठी आपण त्वचेला स्क्रबिंग करण्याचा पर्याय निवडतो. स्क्रबिंग केल्यावर आपली त्वचा अ‍ॅक्टिव्ह होते आणि इतर स्किन प्रॉडक्ट्स  त्वचेत शोषून घेऊ शकते(Mira Rajputs 3 Ingredient Face Scrub).

वाढत प्रदूषण, सन टॅनिंग अशा गोष्टींमुळे आपली स्किन टॅन होऊन जाते. तसेच ब्लॅकहेडची समस्या देखील अनेकांना सतावत असते. अशावेळी आपण  स्क्रबिंग करतो. स्क्रबिंग केल्यामुळे स्किन टॅनिंग, ब्लॅक हेड्स दूर होण्यास मदत होते आणि स्किन उजळते. त्यामुळे त्वचेला स्क्रबिंग करणे खूप गरजेच असत. स्क्रबिंग करण्यासाठी आपण बाहेर विकत मिळणाऱ्या वेगवेगळ्या स्क्रबिंग प्रॉडक्ट्सचा वापर करतो. परंतु या विकतच्या महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा आपण घरात उपलब्ध असणाऱ्या नॅचरल पदार्थांचा वापर करून स्क्रब म्हणून करु शकातो. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput Kapoor) सांगतेय तिच्या होममेड नॅचरल स्क्रबची सिक्रेट रेसिपी( Try these homemade scrub at home to achieve fresh & glowing skin in winter).

साहित्य :- 

१. बेसन - २ टेबलस्पून २. हळद - १ टेबलस्पून ३. दुधाची साय - १ टेबलस्पून 

हिवाळ्यात हातापायांवर सुरकुत्या, त्वचा रखरखीत दिसते? करा हळदीचा १ घरगुती उपाय, थंडीत त्वचा होईल मुलायम

केसांना 'या' ३ पद्धतींनी एलोवेरा जेल लावा, कोंडा-केसगळती या समस्यांवर पाहा कोरफड करते कशी जादू..

हे घरगुती स्क्रब तयार करण्यासाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात हळद, दुधाची साय घालावी. आता हे सगळे जिन्नस एकत्रित मिक्स करुन घ्यावेत. अशाप्रकारे झटपट तयार होणारे घरगुती स्क्रब वापरण्यासाठी तयार आहे. मीरा हे स्क्रब आठवड्यातून किमान एक ते दोन वेळा वापरण्याचा सल्ला देते. हे तयार घरगुती स्क्रब त्वचेवर लावून हलक्या हातांनी २ ते ३ मिनिटे मसाज करुन घ्यावा. त्यानंतर १० मिनिटे हे स्क्रब त्वचेला तसेच लावून ठेवावे. मग १० मिनिटांनंतर ओल्या स्पंजच्या मदतीने हे स्क्रब पुसून घ्यावे आणि पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्यावी. 

कोरड्या-काळ्यानिळ्या पडलेल्या नखांवर चमकच नाही? ‘हे’ ५ उपाय करा- नखं दिसतील गुलाबी सुंदर...

घरगुती हळद बेसनाचे स्क्रब वापरण्याचे फायदे :- 

१. हळद :- हळदीमध्ये अँटी-सेप्टिक, अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, पुरळ व त्यांचे काळे डाग अशा त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते.  

२. बेसन :- बेसन त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यासाठी फायदेशीर ठरते. याचबरोबर, त्वेचेचा तेलकटपणा दूर करण्यास मदत करते :- 

३. दुधाची साय :- दुधाची साय नैसर्गिकरीत्या त्वचेचे पोषण करते, त्वचेला एक्सफोलिएट करते. यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमीरा राजपूत