Join us  

ना कोणतं तेल लावायचं ना हेअरमास्क, बसल्याबसल्या १ उपाय करा- केस गळणं कायमचं बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2024 9:10 AM

Best Solution For Hair Growth: केस गळणं नैसर्गिक पद्धतीने बंद करायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.

ठळक मुद्देया उपायादरम्यान आपण ॲक्युप्रेशर पद्धतीने डोक्याच्या काही पॉईंट्सवर दाब देणार आहोत. ज्याचा आरोग्यावर आणि केसांच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येतो.

काही जणींचे केस खूप गळतात. ज्या वेगाने केस गळत आहेत, तो वेग तसाच राहिला तर अगदी काही दिवसांत टक्कल पडेल की काय अशी भीती त्यांना वाटते. काही जणींच्या केसांना मुळीच वाढ नसते. केसांच्या या समस्यांसाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं तेल लावतो. काही जणी शाम्पू बदलून पाहतात तर काही जणी केसांवर वेगवेगळे हेअरमास्क ट्राय करून बघतात. पण हे असे सगळे कुटाणे करण्याचा कंटाळा आला असेल तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून बघा (hair growth by massaging pressure points). या उपायादरम्यान आपण ॲक्युप्रेशर पद्धतीने डोक्याच्या काही पॉईंट्सवर दाब देणार आहोत. ज्याचा आरोग्यावर आणि केसांच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येतो. (best solution to control hair loss)

 

केस गळणं थांबविण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी उपाय

केस गळणं थांबविण्यासाठी तसेच केसांची चांगली वाढ व्हावी, यासाठी कोणता घरगुती उपाय करायचा, याविषयीची माहिती theyoginiworld या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये आपल्या डोक्यातले जे ४ मर्म बिंदू असतात, त्यांच्यावर हलकासा दाब देऊन त्यांना मसाज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे ४ बिंदू कोणते ते पाहा.

सहलीला जायचंय पण प्रवासात मळमळ- उलट्यांचा त्रास? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते सोपा उपाय

१. त्या बिंदूपैकी सगळ्यात पहिला बिंदू आहे अधिपती मर्म. तिथपर्यंत जाण्यासाठी तुमच्या भुवयांच्या वर तुमच्या हाताची चार बोटं ठेवा. त्यावर दुसऱ्या हाताची ४ बोटं ठेवा.

तुम्हाला घ्यायची का स्वत:च्या नावाची साडी पिन आणि ब्रोच? बघा कस्टमाईज फॅशनचा नवा ट्रेण्ड

शेवटच्या बोटाच्या मधोमध जो बिंदू असतो तो आहे अधिपती बिंदू. त्यावर तुमच्या दोन्ही हातांचे पहिले बोट ठेवा आणि १ मिनिटासाठी क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने फिरवत मसाज करा.

 

२. त्याच्या पुढच्या बिंदुपर्यंत जाण्यासाठी अधिपती बिंदूवर तुमचा तळहात ठेवा. त्यानंतर शेवटचे बोट जिथे असेल त्याच्या मधोमध जो पॉईंट असेल त्यावर पुन्हा एकदा तुमच्या दोन्ही हातांचे पहिले बोट ठेवा आणि १ मिनिटासाठी क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने फिरवत मसाज करा.

बघा हे काय चाललंय!! चक्क इडली- सांबारचं आईस्क्रीम केलं आणि पुन्हा.... बघा व्हायरल व्हिडिओ 

३. दोन्ही भुवयांच्या मधोमध असणारा तिसरा बिंदू. त्या भागातही वरील पद्धतीनेच बोटाच्या टोकाने मसाज करा.

४. शेवटच्या चौथ्या बिंदूपर्यंत जाण्यासाठी मानेवरची जी हेअरलाईन आहे तिच्यावर तुमच्या हाताची ४ बोटे ठेवा. वरचे बोट जिथे असेल त्याच्या मधोमध जो पाॅईंट असेल त्याला मसाज करा. नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केस गळती कमी होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी