Join us  

कुठलाच मेकअप न करता मिस इंग्लंड स्पर्धेत पोहचली मेलिसा, ती विचारते मेकअप कम्पल्सरी कोणी केला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 2:13 PM

मेलिसा रौफ (Melisa Raouf) या 20 वर्षीय तरुणीनं मिस इंग्लड 2022 (Miss England 2022) ची अंतिम फेरी विदाउट मेकअप (make up free) गाठली आहे. आपण स्पर्धेच्या अंतिम फेरीतही विदाउट मेकअपच उतरणार असल्याचं ती आत्मविश्वासानं सांगते. मिस इंग्लड सौंदर्य स्पर्धेच्या शतकांच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत असल्याचं मिस इंग्लड स्पर्धेच्य आयोजकांचं म्हणणं आहे.

ठळक मुद्देमेलिसा रौफ ही राज्यशास्त्राचा अभ्यास करणारी विद्यार्थिनी आहे. एखाद्याला जर आपली त्वचा सुंदर वाटत असेल तर तिच्यावर मेकअप करण्याचं दडपण का असावं असा प्रश्न मेलिसा विचारते. माझी त्वचा सुंदर असल्याची जाणीव मला नुकतीच झाल्यानं आपण मिस इंग्लड 2022 स्पर्धेत विना मेकअप उतरण्याचं ठरवलं असं मेलिसा सांगते. 

सौंदर्य  स्पर्धांमध्ये बाह्य सौंदर्याचा कस लागतो. अशा स्पर्धेत मेकअपच खूप बारकाईनं विचार करावा लागतो. पण सौंदर्यस्पर्धेत उतरलेली स्पर्धक (beauty contestant)  मेकअप न करता स्पर्धेत उतरण्याचा निर्धार करते तेव्हा.. मेकअपशिवाय सौंदर्यस्पर्धेत स्पर्धक उतरुच कशी शकते असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. त्याच्या उत्तरासाठी मिस इंग्लड 2022 (Miss England 2022)  या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली मेलिसा रौफ काय म्हणते हे अवश्य वाचायला हवं. मेलिसा रौफनं (Melisa Raouf)  मिस इंग्लड 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीत विना मेकअप उतरण्याचा (make up free)  निर्धार केला आहे.  मिस इंग्लड सौंदर्य स्पर्धेच्या  शतकांच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत असल्याचं मिस इंग्लड स्पर्धेच्य आयोजकांचं म्हणणं आहे. 

Image: Google

मेलिसा राॅफ ही लंडनमध्ये राहाणारी असून ती राज्यशास्र या विषयाचा अभ्यास करणारी 20 वर्षांची विद्यार्थिनी आहे. मिस इंग्लडच्या इंस्टाग्रामवर मेकअप विना फायनल गाठलेल्या मेलिसा राॅफचं छायाचित्रं असून ही मेकअप फ्री मेलिसा राॅफ सांगा सुंदर दिसत नाही का? या आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे.  इंडिपेंडण्ट या वर्तमानपत्राला मुलाखत देताना मेलिसा म्हणते की मला विना मेकअप सौंदर्य स्पर्धेला सामोरं जावून बाह्य सौंदर्यपेक्षाही आंतरिक सौंदर्याकडे जगाचं लक्ष वेधायचं आहे. आज वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलींच्या मनावर मेकअप करण्याचा मोठा दबाव आहे.  या दबावाखाली मुली मेकअप करत आहे असं मेलिसा म्हणते. 

Image: Google

विना मेकअप सौंदर्य स्पर्धेला सामोरी जाणारी मेलिसा राॅफ म्हणते जर कोणाला  आपली  त्वचा ही नैसर्गिकरित्याच सुंदर वाटत असेल तर त्यांनी  मेकअप करण्याच्या दबावाखाली येऊन मेकअपच्या ओझ्याखाली आपला चेहेरा का झाकावा? आपल्या चेहेऱ्यावरचे दोष  आपण कोण आहोत याची खरंतर ओळख देत असतो. यामुळेच प्रत्येकजण वेगळा ठरतो. विना मेकअप आपण मिस इंग्लडची अंतिम स्पर्धा गाठली याने आनंदित झालेली मेलिसा आपण ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या  अंतिम फेरीतही विना मेकअप स्पर्धेला सामोरं जाणार असल्याचं आत्मविश्वासानं सांगते.

मी केलेला निर्धार हा धोकादायक असला तरी हा अतिशय वेगळा अनुभव असणार आहे असं म्हणणारी मेलिसा सांगते की आपण तारुण्यात आल्यानंतर मेकअप करायला सुरुवात केली . पण सौंदर्य स्पर्धांमधल्या या मेकअपच्या पंरपरेला मला खंडित करायचं असल्यानं आपण विना मेकअप स्पर्धेत उतरणार आहोत.  विना मेकअप सौंदर्य स्पर्धेला सामोरं जात असताना आपली त्वचा, आपलं सौंदर्य  सौंदर्य स्पर्धेतील सौंदर्याचे मापदंड पूर्ण करतं असं मेलिसाला खात्रीपूर्वक वाटतं. माझी त्वचा जशी आहे तशी ती सुंदर आहे हे मी स्वीकारलं असल्यानं आपण विना मेकअप सौंदर्य स्पर्धेत उतरणार असण्याचं ठरवलं असं मेलिसा म्हणते. विना मेकअप मी जशी आहे तशी छान आहे, आणि मी जशी आहे तशी जगासमोर येण्यात मला कसलीही भीती वाटत नाही. 

Image: Google

विना मेकअप मिस इंग्लड स्पर्धेत उतरणाऱ्या मेलिसा रौफच्या या निर्णयानं मिस इंग्लड स्पर्धेच्या आयोजकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्पर्धेच्या संचालक ॲंजी बिस्ले सांगतात की मागे मिस इंग्लड स्पधेत विदाउट मेकअप फेरी होती. पण या स्पर्धेच्या इतिहासात पूर्ण स्पर्धेत एखादी स्पर्धक  विना मेकअप उतरत अस्ण्याची ही पहिलीच वेळ आहे. बिस्ले म्हणतात आपण मेकअपच्या विरोधात नाही. उलट मेकअपमुळे आपलं नैसर्गिक सौंदर्य वाढतं . पण म्हणून तरुण वयातल्या मुलींनी इतका पण मेकअप करु नये की चेहेरा हे जणू एखादा मुखवटा वाटावा.  विना मेकअप स्पर्धेच्या अंतिम फेरीत उतरण्याचं धाडस करणाऱ्या  मेलिसा रौफचं त्यांनी कौतुक करुन तिला स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मेलिसा रौफच्या या निर्णयाचं कौतुक केवळ मिस इंग्लड स्पर्धेच्या आयोजकांनाच वाटत आहे असं नाही तर संपूर्ण जगाला आता मिस इंग्लड 2022 च्या अंतिम फेरीच्या निकालाची उत्सुकता वाटते आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलब्यूटी टिप्सइंग्लंड