हळदीच्या गुणधर्म तुम्हाला माहीतच असतील. भाजीमध्ये हळद घातल्याने त्याची चव तर वाढतेच, पण आयुर्वेदिक औषध म्हणूनही तुम्ही हळदीचा वापर करू शकता. बरेच लोक विशेषत: स्त्रिया त्वचेला चमक आणण्यासाठी हळदीचा वापर करतात. पण हळदीचा वापर करताना काही चुका करणं त्वचेच्या समस्यांचे कारण ठरू शकते. (Haldi tips for skin in summer turmeric tips for skin)
साबण किंवा फेशवॉश वापरू नका
जर तुम्ही त्वचेवर हळद लावत असाल तर काही वेळाने ती पाण्याने धुवावी लागेल. पण ती कोरडी हळद धुण्यासाठी अनेकजण साबण किंवा फेसवॉशचा वापर करतात. तुमच्याकडूनही अशी चूक होत असेल तर आजच थांबवा. साबणाने चेहरा धुतल्यानंतर हळदीचा प्रभाव संपतो. त्यामुळे हळद लावल्याने कोणताही फायदा होत नाही.
मिश्रणाचा परिणाम पाहा
त्वचेवर लावण्यासाठी तुम्ही हळदीमध्ये आणखी काही पदार्थ टाकत असाल तर आधी त्याचा परिणाम पहा. शरीरात कुठेही त्या मिश्रणाची ऍलर्जी वाटत असेल तर लगेच ती जागा स्वच्छ पाण्याने धुवा. उशीर केल्यास तुमच्या शरीराच्या त्या भागात खाज, चट्टे येऊ शकतात. यासोबतच तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर समस्या देखील असू शकतात.
फक्त १५ दिवसात दिसाल स्लिम; क्विक डाएट प्लॅन- वजन होईल कमी, वाटेल दिवसभर एनर्जेटिक
जास्तवेळ हळद लावू नका
अनेक महिलांना शरीराची काळजी घेण्यासाठी हळद जास्तवेळ लावणे आवडते. हळद लावण्याची ही चुकीची पद्धत आहे. हळदीचा प्रभाव उष्ण असतो हे समजून घेतले पाहिजे. अशा स्थितीत त्वचेवर हळद बराच वेळ लावल्यानंतर तेथे चट्टे तयार होऊ शकतात. त्यामुळे काही वेळाने हळद सुकताच ती स्वच्छ पाण्याने धुवावी. असे केल्याने तुम्हाला अधिक फायदा होईल.
स्वयंपाक करताना कुकरचा करा स्मार्ट वापर, ५ सोप्या युक्त्या- गॅस आणि वेळ दोन्हीची बचत
गरमीच्या दिवसात कमीत कमी वापरा
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात हळद पेस्टच्या स्वरूपात शरीरावर तरी लावा. त्यात दही किंवा थोडे बेसन घालावे. असे केल्याने हळदीच्या गरम प्रभावामध्ये काही प्रमाणात शीतलता येते, जी उन्हाळ्यात टिकून राहते. यानंतर, ते मिश्रण काही काळ शरीरावर लावून तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता.