केस सुंदर, लांब, दाट, काळेभोर दिसावे असे कोणाला नाही वाटत. केसांमुळे प्रत्येकाच्या सौंदर्यात भर पडते. पण या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला केसांची निगा राखणं जमेलच असे नाही. प्रदूषण, योग्य आहार न घेणे, केसांची निगा न राखणे, हार्मोन्स असंतुलित होणे. अशा अनेक कारणांमुळे केसांची समस्या वाढते. केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे, अशा अनेक समस्यांमुळे महिलावर्ग त्रस्त आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही लोकं प्रोडक्ट्स किंवा आजीबाईंचे टिप्स फॉलो करतात. केसांना योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते.
यासंदर्भात त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ यांनी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''तेल केसांना कंडिशनिंग करण्यास मदत करतात. जर केस कोरडे, किंवा खराब झाले असतील तर, केसांना तेल लावल्याने फायदा होऊ शकतो. रात्रभर केसांना तेल लावल्याने केसांना पोषण मिळते, असे जवळपास सर्वांचेच मत आहे. मात्र, रात्रभर तेल लावण्याचा कोणताही फायदा नाही. आपण केसांना तेल लावून काही तासात केस धुवू शकता. यासाठी खोबरेल तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरेल"(Correct Way to Oil your Hairs).
ते पुढे म्हणतात, ''तेलामुळे केस निरोगी राहतात, पण याचा अर्थ असा नाही की केस गळणे कमी होईल, किंवा तेल लावल्याने केस वाढतात. तेल एक कंडिशनिंग एजंट म्हणून काम करतात. म्हणूनच तेल लावल्यानंतर केस मऊ आणि चमकदार दिसतात.''
एक चुटकी हळद की किंमत तुम क्या जानो.. लावा ३ प्रकारे, चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो
हेअर ऑइल लावण्याची पद्धत
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, ''केसांना तेल नेहमी केसांच्या मुळांपासून ४-५ इंच अंतरावर लावावे. कारण टाळूवर देखील नैसर्गिक तेल असते, ज्याच्यावर इतर तेल पोहचले नाही पाहिजे. तसेच केसांमध्ये अधिक कोंडा असेल तर, केसांना कमी तेल लावावे. तेल लावले तर अधिक काळ स्काल्पवर ठेऊ नये.''