Teeth Whitening: दातांवरील पिवळेपणामुळे चारचौघात मोकळेपणानं हसता तर येतंच नाही, सोबतच व्यक्तीचा आत्मविश्वासही कमी होतो. पिवळ्या दातांमुळे बरेच लोक चारचौघात बोलणं आणि जाणंही टाळतात. पिवळ्या दातांमुळे तोंडाची दुर्गंधीही येऊ लागते. दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी जोर लावून दात घासले जातात. पण त्यानं काही फायदा होत नाही. अशात टूथपेस्टमध्ये एक गोष्ट टाकून तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करून दात चमकदार करू शकता. सोबतच तोंडाची दुर्गंधीही दूर होईल.
काय आहे उपाय?
दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी टूथपेस्टमध्ये थोडा बेकिंग सोडा टाकून दात स्वच्छ करू शकता. टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याचं मिश्रण दातांवरील पिवळेपणा दूर करतं आणि प्लाकही कमी होतो. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केला तर काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. या मिश्रणानं हलक्या हातानं दात घासा. जोर लावून घासू नका, तसेच बेकिंग सोड्याचा वापर फार जास्तही करू नका. जास्त प्रमाणात याचा वापर केला तर दात कमजोरही होऊ शकतात.
दात पिवळे होण्याची कारणं...
- दातांवर पिवळेपणा असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे दातांची योग्यपणे सफाई न करणं.
- अॅसिडिक फूड्स जास्त खाणं, कॉफी, चहा जास्त पिणं यामुळेही दात पिवळे होतात.
- जर काही कारणानं दातांच्या वरील थर खराब होतो, त्यामुळेही दाता पिवळे दिसू लागतात.
- काही खाल्ल्यावर पाणी न प्यायल्यानं देखील दातांवर पिवळेपणा दिसतो.
दात साफ करण्याचे इतर काही उपाय
- रोज एक चमचा खोबऱ्याचं तेल तोंडात टाकून फिरवा. यानं दात चांगल्याप्रकारे साफ होतील आणि दातांमध्ये अडकलेले कण आणि प्लाकही निघून जाईल.
- अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात टाकून गुरळा केल्यासही तोंडाची चांगली सफाई होते.
- पिवळे दात साफ करण्यासाठी केळीची साल दातांवर घासू शकता. यानं दात चांगले साफ होतील आणि पिवळेपणाही कमी होईल.
- दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी पेरूची पानं चावून खाऊ शकता. यानं तोंडाची दुर्गंधीही दूर होईल.