दही फक्त खाण्यासाठीच नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर असते. केसांचे चांगले आरोग्य आणि सौंदर्यासाठी दह्याचा वापर करणे गुणकारी ठरते. दही हे आपल्या केसांसाठी एक प्रकारचे उत्तम टॉनिक आहे असे मानले जाते. दह्यामध्ये अँटी - फंगल गुणधर्म हे फार मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यामुळे स्कॅल्प आणि केसांच्या अनेक समस्या दूर केल्या जातात. दही (Curd) केस सिल्की, चमकदार आणि हेल्दी करण्याचं काम करतात. त्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा तरी केसांमध्ये दही लावलं तर महिन्याभरातच तुम्हाला फायदा दिसून येईल. केसांचे कंडिशनिंग करण्यासाठी दह्याचा अतिशय चांगला उपयोग होतो(Mix just 4 ingredients in curd & hair will be shiny & soft).
दह्यामध्ये असणारे लॅक्टिक अॅसिड केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. केसांत खूप कोंडा झाला असेल, केस गळत असतील किंवा केस रुक्ष झाले असतील तरी दही लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. केसांसाठी दह्याचा वापर करताना केसांना अधिक पोषण मिळण्यासाठी त्यात आपण वेगवेगळे पदार्थ मिसळून देखील केसांना लावू शकतो. नैसर्गिकरीत्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपायांचा वापर करतो, ज्यामध्ये दह्याचा वापर केला जातो. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु काही खास गोष्टी दह्यात मिसळून लावल्यास नैसर्गिकरीत्या केसांची वाढ लवकर होऊ शकते त्याचबरोबर केसांचे आरोग्य आणि सौंदर्यात अधिक भर पडू शकते. यासाठीच दह्यात नेमके कोणकोणते पदार्थ मिसळून लावावेत ते पाहूयात(Mixing this 4 thing with curd & applying hair naturally increase hair growth).
दह्यात मिसळा हे खास पदार्थ...
१. दही आणि मेथी दाणे :- मेथी दाणे केसांच्या वाढीला चालना देतात आणि केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. यामुळेच दह्यात मेथीचे दाणे मिसळून ते लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि त्यांची वाढ वेगाने होते. २ चमचे दह्यात १ चमचा भिजवलेल्या मेथी दाण्यांची पेस्ट मिसळा आणि केसांच्या मुळांवर नीट लावून मसाज करुन घ्यावा. त्यानंतर अर्ध्या तासांनी केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
श्रावण स्पेशल : फक्त तासाभर लावा हातावर मेहेंदी, रंगेल लालचुटूक-रात्रभर न ठेवताही खुलेल रंग...
२. दही आणि मध :- मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जे केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. दह्यामध्ये मध मिसळून लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांच्या वाढीस गती मिळते. यासाठी २ चमचे दह्यात १ चमचा मध मिक्स करा आणि ही पेस्ट केसांच्या मुळांवर पूर्णपणे लावा. त्यानंतर ३० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा.
३. दही आणि आवळा पावडर :- आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या वाढीसाठी अधिक फायदेशीर असते. आवळा पावडर दह्यात मिसळून लावल्याने केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. २ चमचा दह्यात १ चमचा आवळा पावडर मिसळा आणि हे मिश्रण स्कॅल्पवर लावा आणि २० ते २५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवा.
४. दही आणि एलोवेरा जेल :- केसांच्या वाढीसाठी कोरफड हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. कोरफडीचे जेल दह्यामध्ये मिसळून लावल्याने केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो आणि त्यांची वाढ वेगाने होते. प्रत्येकी २ चमचे दही आणि एलोवेरा जेल मिसळा आणि हे मिश्रण केसांना लावा. ते मिश्रण ३० मिनिटे केसांवर लावून तसेच ठेवावे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवा.