Join us  

दिवाळीचा सण मोठा, पण तुमचा चेहरा कामानेच थकलेला? १ चमचा बेसनात ‘हे’ २ पदार्थ कालवून लावा, पाहा ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:18 PM

Mix These 2 Things In Besan And Apply On Face : बेसनाचा फेस पॅक त्वचेवर कसा लावता येईल ते समजून घेऊ.

त्वचेवर बेसन लावल्यानं बरेच फायदे मिळतात.  योग्य पद्धतीनं बेसनाचा वापर केला तर चेहऱ्यावरील डागांपासूनही सुटका मिळते यामुळे  त्वचेवर जमा झालेले डेड स्किन सेल्स निघून जाण्यास मदत होते. त्वचेवरची धूळ, घाण दूर होते. एक्स्ट्रा ऑईल निघून जातं, टॅनिंगही कमी होते. स्किनची पीएच  लेव्हल चांगली राहण्यास मदत होते. बेसनाचा फेस पॅक त्वचेवर कसा लावता येईल ते समजून घेऊ. (Mix These 2 Things In Besan And Apply On Face For Glowing Skin Besan Face Pack For Dark Spots)

बेसन आणि हळद

बेसनात गरजेनुसार दही आणि चुटकीभर  हळद मिसळून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला  १५ ते २० मिनिटं लावून ठेवा त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याला योग्य प्रमाणात मॉईश्चर मिळेल आणि डाग, टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल.

बेसन आणि एलोवेरा

एलोवेरात एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स,खनिजं असतात जी त्वचेसाठी उत्तम ठरतात. एक चमचा बेसन  घ्या आणि त्यात एक चमचा एलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्याला १० मिनिटं लावून ठेवा. नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास चेहऱ्यावर ग्लो येईल.

मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी

बेसन आणि मुल्तानी माती

तेलकट त्वचेसाठी हा फेसपॅक फायदेशीर ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑईल निघून जाण्यास मदत होते. एका वाटीत २ चमचे मुल्तानी माती घेऊन त्यात एक चमचा बेसन मिसळा. हे मिश्रण पाण्यासोबत मिसळून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक  चेहऱ्याला २० मिनिटं लावून ठेवा त्यानंतर चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्यानं चांगला परिणाम दिसून येईल.

विंचरताना केसांचे पुंजके निघतात-खूप पातळ झाले? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय, दाट होतील केस

बेसन आणि टोमॅटो

चेहऱ्याचं टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि बेसनाचा हा पॅक लावू शकता. हा फेस  पॅक बनवण्याासठी टोमॅटो वाटून यात बेसन मिसळा, नंतर फेस पॅक तयार करा. चेहऱ्याला लावून १० मिनिटं तसंच ठेवा नंतर हलक्या हातानं धुवून घ्या. ज्यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी