Join us  

केस अकाली पांढरे झालेत? हेअर डाय-मेहेंदीचं झंझट सोडा, फक्त खोबरेल तेलात २ गोष्टी मिसळून लावा, मग बघा जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2023 2:21 PM

Mix These 2 Things In Coconut Oil To Prevent Grey Hair : केस नैसर्गिक काळे व्हावे असे वाटत असेल तर, खोबरेल तेलात २ गोष्टी मिसळून मालिश करा.

वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु आजच्या काळात लोकांचे केस वाढत्या वयात नव्हे तर, लहान वयातच पांढरे होऊ लागले आहेत. केवळ तरुण नाही तर लहान मुलांचेही केस पांढरे होत आहेत. पांढरे केस काळे करण्यासाठी बरेच जण केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करतात. यामुळे केस खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केमिकल प्रॉडक्ट्समुळे केस गळती, केस पांढरे होणे, केसात कोंडा या समस्या निर्माण होतात. काही जण केसांवर मेहेंदी लावतात. पण मेहेंदीमुळेही केसांचा पोत खराब होतो. केस नैसर्गिकरित्या ब्लॅक शाईन करावे असे वाटत असेल, तर खोबरेल तेलात दोन गोष्टी मिसळून लावा. यामुळे केसांवर नैसर्गिकरित्या कलर येईल, व केस पुन्हा पांढरे होणार नाही(Mix These 2 Things In Coconut Oil To Prevent Grey Hair).

नैसर्गिकरित्या केस काळे कसे करावे?

केसांसाठी खोबरेल तेल म्हणजे रामबाण उपाय. खोबरेल तेलाचा वापर केसांसाठी फायदेशीर ठरते. खोबरेल तेलात काही गोष्टी मिसळून केसांवर लावल्याने, केस नैसर्गिकरित्या काळे होऊ शकतील.

नॅच्युरल हेअर ऑइल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

खोबरेल तेल

काखेतील काळवंडलेल्या त्वचेमुळे त्रस्त आहात? खर्च टाळा - ४ घरगुती सोपे उपाय करा, काही दिवसात दिसेल फरक

कडीपत्ता

आवळा पावडर

नॅच्युरल हेअर ऑइल कसे तयार करावे?

एका छोट्या भांड्यात एक कप खोबरेल तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल कोमट गरम झाल्यानंतर त्यात कडीपत्त्याची पानं आणि आवळा पावडर घालून मिक्स करा. ५ मिनिटं तेल गरम केल्यानंतर गॅस बंद करा. त्यावर १२ तासांसाठी झाकण ठेवा. १२ तासानंतर तेल गाळून, एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करून ठेवा.

त्यानंतर केस विंचरून घ्या. केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत तयार तेल लावून मसाज करा. २ ते ३ तासानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. आपण रात्रभर देखील हे तेल केसांवर लावून ठेऊ शकता.

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? दह्यात एक पदार्थ मिसळून रोज खा,पाहा केसात सुंदर फरक

खोबरेल तेल अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्सने समृद्ध असतात. जे स्कॅल्पमधील रक्त परिसंचरण सुधारण्याचे काम करते. ज्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्येपासून सुटका होते. तर आवळा पावडर आणि कडीपत्त्याच्या गुणधर्मांमुळे फक्त केस काळे होत नसून, केस गळती, केसात कोंडा यांसारख्या समस्या सुटतील.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स