Join us  

केस धुतले की अख्खा दिवस गळतात? शॅम्पूत मिसळा 'हे' पदार्थ; १५ दिवसात केस दाट-लांब होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 11:13 AM

Mix These Things in Shampoo Before Washing Hair : कंगव्यात अडकून केस तुटतात अशी अनेकांची तक्रार असते.

आजकाल केस गळण्याची समस्या प्रत्येकालाच उद्भवते. व्यस्त जीवनशैलीत आपण स्वत:ला वेळ देऊ शकत नाही. सुंदर, काळे भोर केस प्रत्येकालाच आवडतात. (Hair Care Tips) वाढतं प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे केसांवर याचा परिणाम दिसून येतो. यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात. (How to stop hair fall) रोज विंचरताना भरपूर केस गळतात. कंगव्यात अडकून केस तुटतात अशी अनेकांची तक्रार असते. (Add these ingredients to your shampoo for healthy hair)

तर काहीजणांचे तेल लावल्यानंतर केस तुटून हातात येतात. केस धुताना केस गळणं हे फार कॉमन आहे. केसाचं गळणं कमी करण्यासाठी तुम्ही शॅम्पूमध्ये  काही पदार्थ मिसळ्यास चांगला परिणाम दिसून येईल. महागड्या उत्पादनांचा वापर केल्यानंतरही केस कोरडे दिसतात. हे टाळण्यासाठी वेळीच केसांची काळजी घ्यायला हवी. 

खूपदा असं होतं की, आपण जो शॅम्पू वापरतो तो  आपल्याला सूट करत नाही. याचा सतत वापर केल्याने केस गळू शकतात.  शॅम्पूमध्ये काही पदार्थ मिसळून केसांना लावल्यास २ ते ३ आठवड्यात केस लांब होतील आणि फार खर्चही करावा लागणार नाही. 

इसेंशियल ऑयलचा वापर

इसेंशियल तेलांचा वापर केसस गळणं थांवतो आणि केसांच्या मुळांमधील रक्त प्रवाह वाढतो. ज्यामुळे केसांची ग्रोथ चांगली होते. यात तुम्ही लेव्हेंडर, मेहेंदी, पुदीना आणि टि ट्री एसेंशियल ऑईलचा वापर करू शकता. याचा वापर करण्यासाठी इसेंशियल तेसाचे ३ ते ४ थेंब नियमित शॅम्पूत  मिसळा आणि सामान्य शॅम्पूप्रमाणे याचा वापर करा.

कांद्याचा रस

कांद्यात सल्फर असते. जे एंटीफंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुणांनी परिपूर्ण आहे. कांद्याचा रस केसांच्या मुळांसाठी फायदेशीर ठरतो. जेव्हाही तुम्ही केस धुवाल तेव्हा सगळ्यात आधी २ चमचे कांद्याचा रस मिसळा आणि त्यानंतर केस धुवा. यामुळे तुमचे केस दाट आणि लांब होतील.

चेहऱ्यावर तेज नाही, डल-उदास-निस्तेज दिसतोय चेहरा? ४ सोपे उपाय, आठवड्यातभरात येईल चेहऱ्यावर चमक

लिंबाचा रस

लिंबाच्या रसात भरपूर व्हिटामीन सी असते. केसांसाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. शॅम्पू लावण्याआधी शॅम्पूमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून केस धुवा. शेवटी साध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केस सिल्की आणि शायनी राहतील.

एलोवेरा

एलोवेराचा रस केसांसाठी फायदेशीर ठरतो. एक मोठा चमचा एलोवेरा ज्यूस घ्या आणि शॅम्पूत मिसळा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवा.  एलोवेरा ज्यूस केसांना डायड्रेट ठेवतो आणि कोंड्याची समस्या कमी होते.  एलोवेरामुळे केसांची वाढ चांगली होते. 

केस सतत पांढरे होतात? जावेद हबीबच्या खास टिप्स; कायम काळेभोर, शायनी राहतील केस

गुलाबपाणी

गुलाबपाणी, तांदळाचं पाणी, व्हिनेगर असे पदार्थ केसांसाठी गुणकारी ठरतात. गुलाब जल केसांना मॉईश्चराईज ठेवतं. यामुळे पीएच स्तर व्यववस्थित राहतो. यामुळे स्काल्पवरील अतिरिक्त तेल कमी होतं. याचा वापर करण्यासाठी  एक मोठा चमचा गुलाब पाणी घ्या आणि शॅम्पू मिसळून या मिश्रणाने केस धुवा. यामुळे केसांची वाढ चांगली होईल.

तांदळाचे पाणी

तांदळाचं पाणी एमीनो एसिड, व्हिटमीन, खनिज आणि एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असतात. ज्यामुळे केस मजबूत राहण्यास मदत होते. शॅम्पूमध्ये तांदळाचे पाणी मिसळून तुम्ही केस धुवू शकता.  तांदळाचं पाणी केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरतं. यामुळे केस गळती थांबते 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी