उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे त्वचेची फार वाईट अवस्था होते. पावसाळ्यामध्ये गढूळ पाण्यामुळे त्वचा खराब होते. तसेच हिवाळ्यामध्ये थंडीने त्वचा कोरडी पडते.(Mix this one ingredient with multani mitti.. your skin will become very soft and clea) एकंदरीत काय तर त्वचेची कायमच काळजी घेणे गरजेचे आहे. ऋतू कोणताही असो त्वचा चांगली राहावी यासाठी उपाय करायलाच हवेत. आपण बाहेर जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट्स करतो. मात्र सगळ्यात उत्तम म्हणजे घरगुती उपाय. (Mix this one ingredient with multani mitti.. your skin will become very soft and clea)घरी असलेल्या पदार्थांचा योग्य वापर केला तर इतर उपायांची आवश्यकताच पडणार नाही.
वर्षानुवर्षे चालत आलेला एक पर्याय म्हणजे मुलतानी माती. त्वचेसाठी ही माती प्रचंड पोषक असते. वापरायलाही सोपी असते. अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये मुलतानी माती वापरली जाते. असे प्रॉडक्ट्स विकत घेऊन वापरण्यापेक्षा घरीच मुलतानी माती आणून तिचा फेस पॅक करा आणि वापरा जास्त फायद्याचे ठरेल. तसेच घरी तयार केलेल्या पॅक मध्ये रसायनेही नसतात. त्यामुळे दुष्परिणाम काहीच नाहीत.
आपण मुलतानी माती एक तर उगाळून चेहऱ्याला लावतो. किंवा बाजारातून पावडर आणतो आणि ती पावडर पाण्यात किंवा गुलाब पाण्यामध्ये मिसळून चेहऱ्याला लावतो. मात्र एक असा पदार्थ आहे, तो या मातीमध्ये मिसळून चेहऱ्याला लावला तर चेहरा मस्त मऊ आणि स्वच्छ होईल. तो पदार्थ म्हणजे साय. एखाद्याची त्वचा सुंदर असेल तर आपण त्वचा सायी सारखी मऊ आहे अशी उपमा देतो. ही साय फक्त उपमा देण्यासाठी नाही तर चेहरा खरच मऊ करण्यासाठी फायदेशीर ठरते.
एका वाटीमध्ये मुलतानी माती घ्या. पूड वापरलीत तरीही चालेल. सहाणीवर उगाळून वापरली तरीही चालेल. मुलतानी मातीमध्ये साय घाला. थोडेसे दुधही घाला. माती व साय छान मिक्स करून घ्या. व्यवस्थित मिक्स झाल्यावर थोडावेळ गार करत ठेवा. चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. अगदी छान कोरडा करुन घ्या. नंतर हा पॅक चेहऱ्यावर छान चोळून लावा. तासभर तसाच राहू द्या. पॅक सुकला की मग चेहरा पाण्याचे स्वच्छ धुऊन घ्या. चेहरा अगदी छान दिसेल. असे घरगुती उपाय केल्याने नक्कीच फायदा होतो.