'आई होणे' हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. आपण आई होणार ही भावनाच प्रत्येक स्त्रीला सुखः देणारी असते. या काळात आपण आई होणार या भावनेनेच ती आनंदी झालेली असते, आणि या आनंदाचा ग्लो तिच्या चेहेऱ्यावर दिसत असतो. प्रेग्नन्सीच्या काळात चेहऱ्यावर जरी प्रेग्नन्सी ग्लो आला असला तरीही स्किनची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असते(Deepika Padukone).
अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत असल्याचे दिसून येते. दीपिकाच्या सौंदर्यावर तिचे बरेच चाहते फिदा आहेत. दीपिका तिच्या प्रेग्नंन्सी दरम्यान काय - काय करते याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर फार मोठ्या प्रमाणात होत आहे. यातच दीपिकाच्या प्रेग्नंन्सी ग्लोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. असं मानलं जातं की प्रेग्नेंसी मध्ये महिला आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी अधिक खुश राहू लागतात, त्यांच्या या आनंदामुळेच चेह-यावर ग्लो येऊ लागतो. दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी ग्लो (Pregnancy Glow) तर आलाच आहे, परंतु या काळातही हा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी दीपिका स्किन केअर रुटीन फॉलो करते. सध्याचं एका मिडिया इव्हेंटमध्ये, दीपिकाने तिच्या प्रेग्नंन्सी काळातील स्किन केयर रुटीन शेयर केले आहे. प्रेग्नंन्सी काळातील हा ग्लो चेहऱ्यावर कायम टिकून राहण्यासाठी दीपिका नेमकं काय करते ते पाहूयात(Mom To Be Deepika Padukone Shares Her Pregnancy Skincare Regimen For Glowing Skin).
प्रेग्नन्सी ग्लो टिकवून ठेवण्यासाठी दीपिका नेमकं कोणतं रुटीन फॉलो करते ?
१. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढून मगच झोपा :- दीपिका आपला प्रेग्नन्सी ग्लो टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारे स्किनची काळजी घेते. यावेळी दीपिकाने तिच्या आईने तिला सांगितलेले खास सिक्रेट शेअर केले आहे. दीपिका म्हणते, कितीही उशीर झाला, किंवा मी कितीही थकलेले असेन तरीही झोपायला जाण्यापूर्वी मी माझा संपूर्ण मेकअप काढूनच झोपते. झोपायला जाण्यापूर्वी मी मेकअप काढून चेहरा स्वच्छ करते. चेहऱ्यावरील मेकअप काढून मग चेहरा स्वच्छ करण्याचा महत्वपूर्ण सल्ला दीपिकाच्या आईने दीपिकाला दिला आहे.
२. स्किनवर सनस्क्रीन लावत राहा :- दीपिका सांगते, आपल्या स्किनला उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन लोशन लावणे गरजेचे असते. स्किनला सनस्क्रीन लोशन लावल्याने बाहेरील ऊन, धूळ, माती यांपासून त्वचेचे संरक्षण केले जाते. एवढंच नाही तर दिवसातून किमान २ ते ३ वेळा स्किनला सनस्क्रीन लावण्याचा सल्ला ती देते.
केसांच्या अनेक समस्यांवर 'पोटली मसाज' एक उत्तम उपाय, केसांचे सौंदर्य राहील कायम...
३. दिवसांतून दोन वेळा चेहरा धुवा :- दीपिकाने स्किनची काळजी घेताना दिवसातून किमान दोन वेळा चेहरा पाण्याने धुण्याचा सल्ला दिला आहे. तिच्यानुसार, या साध्या, सोप्या टिप्स फॉलो करून आपण आपल्या चेहऱ्याचा ग्लो वाढवू शकतो.
४. CTM रुल :- CTM रुल म्हणजे क्लिंजर, टोनर, मॉइश्चरायझर. दीपिका तिच्या स्किन केअर रुटीनमध्ये नेहमी CTM रुल न चुकता फॉलो करते.चेहेरा स्वच्छ करून झाल्यानंतर आपण टोनर, मॉइश्चरायझर लावू शकता. दीपिका CTM रुल सोबतच CHP रुल देखील फॉलो करते. CHP म्हणजेच क्लीन, हायड्रेट आणि प्रोटेक्ट.
जास्वंदीच्या फुलांपानांचा ‘असा’ बनवा घरगुती हेअर मास्क, केस होतील दाट-काळेभोर, खर्च फक्त २० रुपये...
५. ओठांची काळजी :- दीपिका आपल्या स्किनसोबतच ओठांची देखील तितकीच काळजी घेते. आपल्या स्किन इतकीच ओठांच्या स्किनची देखील काळजी घेणे महत्वाचे असते, असे दीपिका सांगते. चेहऱ्याच्या स्किनला जसे आपण सनस्क्रीन लावतो तसेच ओठांच्या स्किनला देखील हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे असते. जर आपण फक्त आपल्या स्किनची काळजी घेत असाल आणि ओठांच्या स्किनकडे दुर्लक्ष करत असाल तर ते चुकीचे आहे, असे तिचे म्हणणे आहे. ओठांना लिप बाम किंवा लिप ऑईल ने मसाज करण्याची महत्वाची टिप दीपिकाने शेयर केली आहे.