Lokmat Sakhi >Beauty > पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनचा त्रास होतो? आंघोळीच्या पाण्यात घाला १ 'खास' पान; दिवसभर राहाल फ्रेश

पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनचा त्रास होतो? आंघोळीच्या पाण्यात घाला १ 'खास' पान; दिवसभर राहाल फ्रेश

Monsoon brings with it skin and fungal infection, neem leaves remedy for skin : पाण्यात एक हिरवे पान घालून आंघोळ केल्याने स्किन इन्फेक्शनचा त्रास दूर होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 05:46 PM2024-07-17T17:46:53+5:302024-07-17T17:47:34+5:30

Monsoon brings with it skin and fungal infection, neem leaves remedy for skin : पाण्यात एक हिरवे पान घालून आंघोळ केल्याने स्किन इन्फेक्शनचा त्रास दूर होतो

Monsoon brings with it skin and fungal infection, neem leaves remedy for skin | पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनचा त्रास होतो? आंघोळीच्या पाण्यात घाला १ 'खास' पान; दिवसभर राहाल फ्रेश

पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनचा त्रास होतो? आंघोळीच्या पाण्यात घाला १ 'खास' पान; दिवसभर राहाल फ्रेश

कडूलिंबाची पानं औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात (Monsoon). आयुर्वेदात कडूलिंबाच्या पानांचा उपयोग अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. कडूलिंबाची पानं त्वचा, केस आणि आरोग्यासाठी वापर केला जातो (Skin care tips). याच्या वापरामुळे स्किन अधिक टवटवीत आणि फ्रेश दिसते. पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनची समस्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते.

या ऋतूमध्ये पुरळ, खाज येणे, फोड येणे, यासह इतर समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनचा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर, आयुर्वेदिक डॉ. श्रेय शर्मा यांनी सांगितलेला एक उपाय करून पाहा. अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं घालून आंघोळ केल्याने जास्त फायदा होऊ शकतो(Monsoon brings with it skin and fungal infection, neem leaves remedy for skin).

कडूलिंबाच्या पानांच्या उकळलेल्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

स्किन इन्फेक्शनपासून सरंक्षण

पावसाळ्यात त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. कडूलिंबाच्या उकळलेल्या पाण्याने नियमित आंघोळ केल्याने स्किन इन्फेक्शन टाळता येतो. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या संसर्गापासून बचाव करतात. जर आपण मधुमेहग्रस्त रुग्ण असाल तर, कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचा फायदा नक्कीच होईल.

रोज रात्री चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे भन्नाट फायदे; रातोरात चेहरा चमकेल - मुरुमांचे डाग गायब

डास आणि चिलटांपासून सरंक्षण

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. डास किंवा माशी चावल्याने त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. ज्यामुळे आपण आजारीही पडू शकता. त्यामुळे या कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा. या पानातील गुणधर्मामुळे डास आपल्यापासून दूर राहतील.

पुरळ आणि खाजेपासून आराम

पावसाळ्यात रॅशेस आणि खाज येण्यासारख्या त्वचेच्या समस्या खूप सामान्य आहेत. या ऋतूत त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या वाढते. त्याचबरोबर त्वचेवर खाजही येऊ लागते. अशा स्थितीत आपण कडुलिंबाच्या पानांच्या पाण्याने आंघोळ केल्यास फायदा होईल.

केस इतके पांढरे की वयस्कर दिसू लागलात? चमचाभर हळदीचा 'करा' स्पेशल डाय; केस होतील काळेभोर

त्वचा स्वच्छ होते

निरोगी त्वचेसाठी स्किन क्लिन ठेवणे गरजेचं आहे. कडुलिंबाच्या पानांच्या उकळलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा खोलवर स्वच्छ होते. कडुलिंबाच्या पानांचे पाणी त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय, ते त्वचेचे डाग, मुरुम आणि मुरुमांचे डाग हलके करण्यास मदत करते.

Web Title: Monsoon brings with it skin and fungal infection, neem leaves remedy for skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.