खऱ्या अर्थाने आता पावसाळा सुरु झाला आहे. रिमझिम पावसाच्या सरीमुळे सगळीकडे ओलावा पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात फिरणाऱ्यांची व खवय्यांची वेगळीच मज्जा असते. परंतु, रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे बराच त्रास होऊ शकतो. पावसाच्या पाण्यामुळे कधी - कधी संसर्ग देखील होतो. विशेषतः पायांना जास्त त्रास होतो.
पाण्यामुळे जमिनीवर चिखल तयार होतो, चिखलामुळे पाय देखील घाण होतात. ज्यामुळे पायांना खाज सुटणे, जखम होणे, पायांच्या बोटांवर फंगल इन्फेक्शन होणे अशा समस्या निर्माण होतात. या पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून सुटका हवी असेल तर, पायांची अशा प्रकारे काळजी घ्या(Monsoon foot care: Count on these simple home remedies).
पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग कसा टाळावा
१. योग्य फुटवेअर निवडा
पावसाळ्यात योग्य फुटवेअर घाला. अशा मौसमात रबर किंवा प्लास्टिकचे फुटवेअर वापरणे उत्तम ठरेल. कापडी शूज किंवा चप्पल घालणे टाळा. कारण यामुळे चप्पल पाणी शोषून घेते. ज्यामुळे पायांमध्ये ओलावा जमा होतो. यासह बुरशीजन्य संसर्ग होतो.
फक्त २ चुकांमुळे आपले केस लवकर पांढरे होतात, गळतात! पाहा, त्या चुका कशा टाळायच्या..
२. नखे लहान ठेवा
पावसाळ्यात पायांची नखे लहान ठेवा. कारण पायांची नखे वाढवल्याने त्यात घाण व ओलावा जमा होते. जास्तही नखे छोटी कापू नका, कारण छोटा काटा, किंवा ओरखडाही फंगल इन्फेक्शनला आमंत्रण देऊ शकते.
३. शरीर कायम क्लिन ठेवा
पावसाळ्यात शरीराकडे जास्त लक्ष द्या. कारण पावसाळादरम्यान, शरीरात घाम साचल्याने फंगल इन्फेक्शन होऊ शकते. अशा स्थितीत नियमित आंघोळ व शरीर कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.
४. त्वचेची काळजी घ्या
पावसाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. नियमित आंघोळ करा. ओले कपडे, व ओले शूज घालणे टाळा. यामुळे फंगल इन्फेक्शन होते. व कपडे धुताना गरम पाण्याचा वापर करा, यामुळे कपड्यांमधील फंगस गरम पाण्यामुळे नष्ट होतील.
पावसाळ्यात केसांचं गळणं जास्त वाढतं, करा ५ रुपयांच्या तुरटीचा सोपा उपाय
५. मिठाच्या पाण्यात पाय धुवा
पावसाळ्यात पाय दिवसभर पावसाच्या पाण्यात भिजत असतात. यामुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे संसर्ग टाळण्यासाठी पाय मिठाच्या पाण्याने धुवा. यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घ्या, त्यात दोन चमचे मीठ टाका. सुमारे २० मिनिटे या पाण्यात पाय ठेवा, नंतर साध्या पाण्याने पाय धुवा. असे केल्याने पावसात संसर्गाचा धोका टाळता येतो.