आपल्यापैकी काहीजणांना केस विंचरताना ते अगदी पटकन तुटण्याचा किंवा गळण्याचा त्रास जाणवतो. केसांच्या अशा अनेक समस्यांना आजकाल सगळेच सामोरे जात आहेत. केस गळती ही आजकाल एक खूपच सामान्य समस्या झाली आहे. सतत केस गळतीच्या या समस्येने स्कॅल्पला व केसांना खूप मोठे नुकसान पोहोचवले जाते. यामुळे केसांचे नैसर्गिक सौंदर्य जाऊन ते अतिशय खराब दिसू लागतात. अनेकवेळा प्रदूषण, लाइफस्टाइलशी संबंधित समस्या, टेंशन, स्ट्रेस वा डिप्रेशनच्या कारणामुळे केस फक्त गळतच नाहीत, तर वेळेआधीच पांढरेही होत असतात. एवढेच नाही तर केस गळती, केस तुटणे, केसांची वाढ खुंटणे, केस रुक्ष निस्तेज दिसणे यांसारख्या असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो. या केसांच्या अनेक तक्रारींपासून सुटका करून घेण्यासाठी आपण अनेक घरगुती किंवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स करून घेण्याच्या तयारीत असतो.
केसांच्या अनेक समस्यांवर नेहमीच महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स करून घेण्यापेक्षा आपण काही घरगुती उपायांचा नेहमीच वापर करु शकतो. शेवग्याच्या शेंगा शरीराला महत्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळवून देतात यासाठी आपण आहारात शेवग्याच्या शेंगांचा नक्कीच वापर करतो. तसेच या शेवग्याच्या शेंगांच्या झाडांची पाने केसांच्या आरोग्यासाठी व त्यांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा आणण्यासाठी फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या शेंगांच्या पानांमध्ये संत्र्यापेक्षा ७ पट जास्त व्हिटॅमिन सी आणि दुधापेक्षा ४ पट जास्त कॅल्शियम असते. याचबरोबर, कॅरोटीनचे प्रमाण गाजरपेक्षा ४ पट जास्त आहे. म्हणूनच शेवग्याच्या शेंगांची पाने आपले केस गळणे आणि तुटणे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात(Moringa Leaves Hair Mask to Grow Your Hair Faster, Thicker, and Longer hair).
शेवग्याच्या शेंगांच्या झाडांची पाने केस गळणे नक्की कसे थांबवतात ?
ही पाने केस गळतीसाठी एक नैसर्गिक उपाय आहे जो पूर्वीपासून शतकानुशतके वापरला जात आहे. पानांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि केसांच्या मुळांना मजबूत करतात. या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे पेशींच्या उत्पादनात मदत करते आणि स्कॅल्प निरोगी ठेवण्यास प्रोत्साहन देते. त्यामध्ये आवश्यक फॅटी ऍसिड देखील असतात, जे निरोगी केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. याव्यतिरिक्त, या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा - ३, फॅटी ऍसिडस्, फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या मुळांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
शेवग्याच्या शेंगांच्या पानांचा हेअर मास्क कसा बनवायचा ?
जर आपले केस सतत गळत असतील तर शेवग्याच्या शेंगांच्या पानांचा वापर हेअर मास्क म्हणून करू शकता. त्याचा हेअर मास्क बनवायला खूप सोपा आहे. फक्त पान बारीक करून ती मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवा आणि त्यात खोबरेल तेल मिसळा. आता हा नैसर्गिक मास्क आपल्या केसांवर आणि स्कॅल्पवर लावा. हा मास्क किमान ५ मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर केस स्वच्छ धुवावेत.
१ चमचा मेथी दाणे आणि चमचाभर कोरफड जेल, केसातला कोंडा होईल कमी- खास उपाय...
शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी कसे तयार करावे ?
केसगळती रोखण्यासाठी शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी देखील एक प्रभावी उपाय आहे. यासाठी ताजी पाने पाण्यात उकळवून हे पाणी थंड होण्यासाठी ठेवा. प्रथम केस शॅम्पू करा, नंतर आपल्या केसांवर हे तयार केलेले पाणी ओतून टाळूची मालिश करा. केस पुन्हा स्वच्छ पाण्याने धुण्यापूर्वी १५ मिनिटे असेच राहू द्या.
१ कांदा- १ कप खोबरेल तेल- पाहा या तेलाची जादू; केस गळती ते कोंडा- केसांच्या समस्या गायब!
शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे तेल कसे बनवावे ?
शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे तेल बनवूनही केसगळती रोखू शकता. तेल तयार करण्यासाठी नारळाच्या तेलात या पानांची पावडर मिसळा. ते द्रव स्वरूपात येईपर्यंत व्यवस्थित गरम करा.आता टाळूला कोमट तेल लावून काही मिनिटे मसाज करा. रात्रभर केसांना तेल लावून सकाळी धुवा. असे काही आठवडे केल्याने केस गळणे थांबते.