हल्ली केसगळती, कोरडे केस, केसात कोंडा होणे आणि केसांची वाढ खुंटणे या समस्यांपासून अनेकजण त्रस्त आहे. (Chia seeds Benefits) यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते तरुणांचा देखील समावेश आहे. वाढते प्रदूषण, शरीराला पुरेसा पोषक आहार न मिळणे, जंक फूड आणि केसांची योग्य निगा न राखल्यामुळे आपल्याला या त्रासाला सामोरे जावं लागतं. (Best Time to Consume Chia Seeds for Hair Growth) अनेकदा केस वाढण्यासाठी आपण अनेक महागडे शॅम्पू किंवा केमिकल उत्पादनांचा वापर करतो. (Chia Seeds for Healthy Hair)
अनेकदा आपल्याला चिया सीडचा खाण्याचा सल्ला दिला जातो. (How Chia Seeds Help Stop Hair Fall Naturally) चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, प्रथिने अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे खनिजे आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी सुपरफूड समजले जाते. या सीड नियमित रुपात खाल्ल्याने केसांची वाढ होते असे म्हटले गेले आहे.परंतु, केस वाढीसाठी चिया सीडचे पाणी कधी प्यायला हवं? रात्री की,सकाळी जाणून घेऊया.
केमिकलयुक्त कंडिशनर कशाला, घरी ‘असे’ बनवा कंडिशनर! करायला सोपे-केस होतील सिल्की, येईल चमक
केसांच्या वाढीसाठी सकाळी चिया सीड्सचे पाणी पिण्याचे फायदे सकाळी चिया सीड्सचे पाणी प्याल्याने केस निरोगी होण्यास मदत होतात. तसेच या वेळी चिया सीड्स खाल्ल्याने दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते. यात असणारे फायबर शरीराला निरोगी ठेवतात. ऊर्जेच्या पातळीत वाढ झाल्याने आपल्याला सक्रिय राहाण्यास आणि टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. जे केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच आपली चयापचय सुधारते. अन्नातील पोषक तत्वे शोषली जातात. ज्यामुळे केसांच्या मुळांना मजबूत होण्यास मदत होते.
चिया सिड्स खाल्ल्याने शरीरात उच्च फायबर वाढून पोट अधिक काळ भरलेली राहाते. सकाळी खाल्ल्याने दिवसभर जंक फूड खाण्याची शक्यता कमी होऊ शकते. ज्यामुळे आपल्याला कमी भूक लागेल. यामुळे आपल्या आरोग्यासह केसांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. केसांच्या वाढीसाठी आपल्याला आहारात पौष्टिक, फायबर आणि प्रथिने असलेले पदार्थ खायला हवे.
चिया सीड्स आपल्या शरीरात पाणी टिकवून ठेवते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या कमी करते. केसांच्या वाढीसाठी हायड्रेशन महत्त्वाचे आहे. हायड्रेशन केसांची टाळू निरोगी राखण्यास मदत करते. सकाळी पाण्यात किंवा स्मूदीसोबत चिया सीड्स खाल्ल्याने फायदा होतो.
केसांच्या वाढीसाठी रात्री चिया सीड्सचे पाणी पिण्याचे फायदे रात्री चिया सीड्स खाल्ल्याने केसांची वाढ जास्त होण्यास मदत होते. रात्री शरीरामध्ये पेशी, ऊती आणि स्नायूंचे पुनरुज्जीवन होण्याची प्रक्रिया असते. यामध्ये प्रथिने,ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स आहे. जे शरीराला नैसर्गिक पद्धतीने दुरुस्त करण्यास मदत करतात. चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचे रात्री सेवन केल्याने पचन होण्यास मदत होते. आपली पचनसंस्था केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच जीवनसत्त्व आणि खनिजांचा परिपूर्ण स्त्रोत चिया सीड्समध्ये आहे.
चिया सीड्सचे पाणी कधी प्यावं?
केसांच्या वाढीस मदत करण्यासाठी सकाळी आणि रात्री दोन्ही वेळी चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने फायदे मिळतात. सकाळी पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा वाढू शकते. चयापचय सुधारुन तुमची दिनचर्या सुधारु शकते. तसेच शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. जर आपणी रात्री हे पाणी प्यायले तर शरीराची नैसर्गिक दुरुस्ती होऊ शकते. यामुळे शरीर पोषक तत्वांचे शोषण जास्तीत जास्त प्रमाणात करते. त्यासाठी रात्री चिया सीडसचे पाणी केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर असेल. यात असणारे घटक शरीराची पचनक्रिया सुधारेल.