Harmful morning habits : आपल्या दिवसांची सुरुवात जर चांगल्या पद्धतीने झाली तर आपला संपूर्ण दिवस आनंदात जातो. (healthy morning habits) पण सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपण काही चुका केल्या तर आरोग्यावर त्याचा परिणाम होऊन अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
निरोगी आरोग्य हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली ठरते आहे. (Checking your phone in morning) परंतु, बदलेल्या जीवनशैलीमुळे कामाची पद्धत आणि वाढता ताणामुळे यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवताना पाहायला मिळत आहे. (common morning habits that ruin health) चुकून किंवा ठरवून आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपली दिनचर्या खराब होते. जर तुम्हालाही झोपेतून उठल्यानंतर या चुका करण्याची सवय आहे तर वेळीच थांबायला हवे, जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर.
1. फोन तपासणे
सकाळी उठल्याबरोबर आपल्यापैकी अनेकांना फोन पाहण्याची सवय असते. सोशल मीडिया स्क्रोल करणे, चॅट करण किंवा मेल तपासत बसणे. डोळे उघडताच फोन घेऊन बसल्यावर त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. ज्यामुळे दृष्टी कमी होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे डोळ्यांवर ताण पडतो आणि चिंता वाढते. तसेच दिवसभर सुस्ती आणि थकवा जाणवतो.
2. पाणी न पिणे
अनेकांना सवय असते की, झोपेतून उठल्यानंतर सरळ ब्रश करण्याची. परंतु, तुम्ही झोपेतून उठल्यानंतर ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतील. सकाळी उठल्यानंतर पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होते. त्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि एकाग्रतेच्या समस्या येतात. सकाळी उठल्यानंतर किमान एक ते दोन ग्लास पाणी प्याला हवे.
3. ब्रेकफास्ट न करणे
काही लोक नाश्ता न करता थेट दुपारचे जेवण करतात. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते अधिक वाढते. नाश्ता न केल्यामुळे शरीरातील कॅलरीज दुप्पटपटीने वाढतात. तसेच छातीत जळजळ होते, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग सारख्या समस्यांचा धोका वाढतो.
4. व्यायाम न करणे
सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही शरीराची कोणत्याही प्रकारे हालचाल करत नसाल तर अनेक आजार तुम्हाला भेडसावतील. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा. ज्यामुळे तुमचे शरीर सक्रिय होईल. अन्यथा लठ्ठपणा, हृदयरोग आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचा धोका अधिक वाढेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमितपणे किमान अर्धा तास व्यायाम करा.