Lokmat Sakhi >Beauty > गडबडीत चेहेऱ्यावर ब्लश जास्त लागले, ३ सोपे उपाय, मेकअप दिसेल अगदी नॅचरल....

गडबडीत चेहेऱ्यावर ब्लश जास्त लागले, ३ सोपे उपाय, मेकअप दिसेल अगदी नॅचरल....

3 Quick & Easy Way To Correct Blush Mistakes : जास्तीचे ब्लश ठिक करण्यासाठी नक्की काय उपाय करता येतील ते पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 10:17 AM2023-04-15T10:17:44+5:302023-04-15T10:17:44+5:30

3 Quick & Easy Way To Correct Blush Mistakes : जास्तीचे ब्लश ठिक करण्यासाठी नक्की काय उपाय करता येतील ते पाहूयात.

Most common blush mistakes and how to avoid them | गडबडीत चेहेऱ्यावर ब्लश जास्त लागले, ३ सोपे उपाय, मेकअप दिसेल अगदी नॅचरल....

गडबडीत चेहेऱ्यावर ब्लश जास्त लागले, ३ सोपे उपाय, मेकअप दिसेल अगदी नॅचरल....

आपल्याला सर्वानांच मेकअप करायला फार आवडतो. काही खास प्रसंग असला किंवा काही सण - समारंभ असला की आवर्जून आपण मेकअप करतो. मेकअप करण्यासाठी आजकाल बाजारांत वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स सहज विकत मिळतात. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस मेकअपचे ट्रेंड दररोज बदलत आहेत आणि सोशल मीडियावर मेकअपच्या नवीन ट्रेंडबद्दल रोज काहीतरी नवीन दिसत आहे. 

मेकअप करताना आपण तो विविध स्टेप्समध्ये करतो. मेकअप करतानाच्या प्रत्येक स्टेपचे स्वतःचे असे विशेष महत्व असते. मेकअपचे विशिष्ट्य प्रॉडक्ट्स चेहेऱ्यावर योग्य त्या प्रमाणातच लावले गेले पाहिजे, तरच मेकअप उठून दिसतो. काहीवेळा घाईगडबडीत आपल्या हातून चुकून मेकअप प्रॉडक्ट्स जास्तीचे लावले जातात. मेकअप जसा चेहेरा खुलवतो तसेच जास्त झाल्याने चेहेरा विद्रुप देखील बनवू शकतो. यामुळे मेकअप करताना थोडी खबरदारी घेऊन मेकअप करणे कधी उत्तम ठरते. मेकअप करताना कधी - कधी आपल्या हातून गालांवर ब्लश जास्तीचे लावले जाते. यामुळे गालांवरची नैसर्गिक लाली दिसण्याऐवजी ती आर्टिफिशियल मेकअपने रंगवली असल्याचे दिसून येते. अशावेळी जास्तीचे ब्लश ठिक करण्यासाठी नक्की काय उपाय करता येतील ते पाहूयात(3 Quick & Easy Way To Correct Blush Mistakes).

चेहऱ्यावर ब्लश लावताना, ते गरजेपेक्षा जास्त लागल्यास काय करावे ? 

१. कन्सीलरचा वापर करावा :- काहीवेळा मेकअप करताना घाईगडबडीमध्ये चुकून तुमच्या हातून चेहेऱ्यावर जास्तीचे ब्लश लावले जाते. अशावेळी तुम्ही स्वतःच्या स्किनटोनच्या शेडच्या कन्सीलरचा वापर करु शकता. यासाठी ब्युटी ब्लेंडरवर गरजेनुसार कन्सीलर घ्यावे. कन्सीलर घेऊन जिथे अतिरिक्त ब्लश लावले गेले  असेल तिथे डबिंग मोशनमध्ये चेहऱ्यावर लावा. लक्षात ठेवा की तुम्ही कन्सीलर चेहऱ्यावर त्याच ठिकाणी दाबून ब्लेंड करा आणि चुकूनही ड्रॅग करू नका. कारण ड्रॅगिंगमुळे चेहऱ्यावर लावलेला मेकअप एका जागी जमा होईल आणि लुक व चेहेऱ्यावरील मेकअप खराब होईल.

फेशियल करताना वारंवार होणाऱ्या ६ चुका टाळा, चेहरा दिसेल उजळ व चमकदार...

२. ब्रॉन्झरची मदत घ्या :- दुसरीकडे, जर चेहऱ्यावर लावलेला ब्लश खूप गुलाबी-गुलाबी किंवा गडद दिसत असेल, तर तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही ब्राँझरच्या मदतीने खराब झालेला ब्लश सुधारू शकता. यासाठी सर्वात आधी मोठ्या आकाराचा फ्लफी ब्रश घेऊन एक्स्ट्रा ब्लशवर ब्रॉन्झर लावा. ब्लशवर ब्रॉन्झर लावताना ते अतिशय हलक्या हाताने लावून घ्यावे. ब्रॉन्झर लावताना खूप हलक्या हाताने दाब द्यावा. याचे कारण असे की जर तुम्ही जास्त दाब देऊन चेहऱ्यावर ब्रॉन्झर लावले तर चेहऱ्यावर मेकअपचे पॅचेस पडतील, ज्यामुळे तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. 

भरीव, दाट पापण्या व भुवयांसाठी सोनम सांगते एक राज की बात, १ घरगुती उपाय... भुवया पापण्या होतील दाट..

३. कॉम्पॅक्ट पावडरने ब्लश सेट करा :-  कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करुन तुम्ही चेहेऱ्यावर लागलेले जास्तीचे ब्लश सेट करु शकता. जर तुम्हाला चेहेऱ्यावर लावलेले जास्तीचे ब्लश थोडे लाईट करायचे असल्यास त्यावर हलक्या हाताने कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यावी. चेहेऱ्यावर लागलेले गडद ब्लश फिकट कार्याचे असल्यास तुम्ही तुमच्या त्वचेच्या टोननुसार कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता. एका पफवर कॉम्पॅक्ट पावडर घेऊन जास्तीच्या लागलेल्या ब्लशवर लावल्याने गडद लागलेले ब्लश फिकट दिसेल. कॉम्पॅक्ट पावडर आवश्यकतेनुसार वापरावी कारण कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्यावर एक प्रकारचा थर बनवते. म्हणूनच मेकअप करताना चेहऱ्यावर कमीतकमी प्रॉडक्ट्स लावण्याचा प्रयत्न करावा.

Web Title: Most common blush mistakes and how to avoid them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.